जागतिक पातळीवर चित्रकला क्षेत्रात नाशिकचे नाव उंचाविणारे राजेश व प्रफुल्ल या सावंत बंधूंना थायलंडचे पारितोषिक जाहीर झाले आहे. इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी ऑफ थायलंड या जागतिक कला संस्थेतर्फे बानसिलापीन येथे १ ऑक्टोबर रोजी आयोजित हुआहीन ब्लुपोर्ट वॉटरकलर आर्ट्स प्रदर्शनात चित्रकार सावंत बंधूंना सन्मानित करण्यात येणार आहे.

राजेश सावंत यांनी इटलीमध्ये जलरंग माध्यमात ऑन दि स्पॉट चित्रित केलेल्या ‘ग्रॅण्ड कॅनाल ऑफ व्हेनिस’ या निसर्गचित्राची या पारितोषिकासाठी निवड केली आहे. ज्या चित्रकारांनी जागतिक स्तरावर जलरंगाच्या चित्रणात आजपर्यंत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा विविध देशांतील निवडक २० चित्रकारांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. त्यात प्रफुल्ल सावंत यांचा समावेश आहे.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

२ ऑक्टोबर रोजी बँकॉक येथे गौरविण्यात येणाऱ्या चित्रकारांची कार्यशाळा होणार आहे. त्यात प्रफुल्ल सावंत जलरंगातील चित्रकलेचे धडे देणार आहेत.

तसेच कोह कलोक या ठिकाणचे निसर्गसौंदर्य चित्रबद्ध करण्याची संधी आयोजकांकडून चित्रकार सावंत बंधूंना देण्यात आली आहे. प्रदर्शनात ५० देशांच्या उत्कृष्ट २०० चित्रकृती सादर होणार आहेत. सावंत बंधूंच्या एकूण चार चित्रकृती प्रदर्शित करण्यात येणार असून प्रदर्शनाच्या जागतिक पुस्तिकेतही त्यांच्या चित्रांना स्थान देण्यात येणार आहे. सावंत बंधूंना चित्रकलेसाठी आजपर्यंत ४९ आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.