शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात महत्वाची भूमिका निभावणारे नाशिकचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची सोमवारी बदली करण्यात आली. या पदावर यापूर्वी नाशिक जिल्ह्यात काम केलेले रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगन्नाथन यांच्या कार्यकाळात राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांवर धडक कारवाई झाली होती. त्यातून भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्यांची सुटका झाली नाही. वर्षभरापूर्वी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेल्या जगन्नाथन यांच्या बदलीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
महिनाभरापूर्वी जगन्नाथन यांना अपर पोलीस महासंचालक पदावर बढती मिळाली होती. त्यावेळी त्यांना नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले. भारतीय पोलीस सेवेतील सहा अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय गृह विभागाने घेतला. त्यात जगन्नाथन यांची बदली मुंबईच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी मुंबईच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंघल यांनी यापूर्वी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून काम केले आहे. २००३-४ च्या सिंहस्थात ते नाशिकमध्ये कार्यरत होते. नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात राखण्याचे आव्हान सिंघल यांच्यासमोर आहे. गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख मागील तीन महिन्यात पोलिसांनी धडक कारवाईद्वारे नियंत्रणात आणला. अवघी यंत्रणा रस्त्यावर उतरली. अनेक गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द मोक्कांतर्गत कारवाई झाली. शिवाय, त्यांना आर्थिक सहाय्य पुरविणाऱ्याना मोक्का लावला गेला. त्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाचाही समावेश होता. महापालिका निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात चालविलेले धडक कारवाईचे सत्र पुढील काळातही कायम राहणे आवश्यक असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?