शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी उचललेली कठोर पावले, मैत्रेय कंपनीच्या फसवणूक प्रकरणात यशस्वी तपासाद्वारे गुंतवणूकदारांना परतावा देण्यास सुरुवात, सिंहस्थ कुंभमेळा शांततेत पार पडण्यात निभावलेली भूमिका.. या कामामुळे प्रकाशझोतात आलेले पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना शासनाने अपर पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे. पदोन्नतीनंतर ते नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत राहणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर जगन्नाथन यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या शाही पर्वणीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी नेटाने सांभाळली. पहिल्या पर्वणीच्या नियोजनाच्या मुद्यावरून भाविकांनी यंत्रणेला धारेवर धरले होते. कुंभमेळा यशस्वी पार पडल्यानंतर शहरातील वाढती गुन्हेगारी हे पोलिसांसमोरील मुख्य आव्हान ठरले. शहरात पोलिसांचा वचक नसल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी यंत्रणेला जबाबदार धरले. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी झाली.  राजाश्रय लाभलेल्या गुन्हेगारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला. गुन्हेगारी टोळ्यांतील साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली गेली. गुन्हेगारांना अर्थ पुरवठा करणारे, त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी एकाच वेळी या स्वरूपाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मैत्रेय कंपनीच्या प्रकरणात ठेवीदारांना अतिशय कमी कालावधीत त्यांचा परतावा देण्याची पहिलीच घटना आहे. शासनाने जगन्नाथन यांना अपर पोलीस महासंचालक पदावर पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना नाशिक पोलीस आयुक्त अशी राहणार आहे.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
MP Dhairyashil Mane should be in Delhi when Narendra Modi takes oath for the third time says Suresh Halvankar
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने दिल्लीत हवेतच- सुरेश हाळवणकर