अहमदनगर जिल्ह्यातील चन्या बेग टोळीतील गुंड आणि शार्प शूटर असलेल्या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता स्वमालकीच्या सदनिकेत भाडेतत्वाचा करार करून आश्रय दिला; मात्र याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला न दिल्याप्रकरणी नाशिकमधील पार्वती अपार्टमेंटमधील रहिवासी घरमालक रमेश सावंत यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंत यांच्या सदनिकेतून पोलिसांनी रविवारी पहाटे कुख्यात गुंडांना ताब्यात घेतले.

नाशिक शहरातील पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरील १३ क्रमांकाची सदनिका रमेश सावंत यांच्या मालकीची आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून अहमदनगर येथील सराईत गुन्हेगार शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभिरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल, ४० जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. घरमालक सावंत यांनी या तिघांची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश