योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येथील योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांनी योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर, सलग १०३ तास योगासने करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. जगात सर्वाधिक काळ योगासने करणाऱ्या पाटील यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

आतापर्यंत महिलांमध्ये तामिळनाडूच्या के. पी. रचना यांच्या नावावर ५७ तास योगा करण्याचा विक्रम होता. तत्पुर्वी, कॅनडाच्या यास्मिन गो यांनी ३३ तासांचा विक्रम केला होता. तर पुरुषांमध्ये डॉ. व्ही. गणेशकरण यांनी सलग ६९ तास योगा करण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व विक्रम प्रज्ञा पाटील यांनी मोडीत काढले.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

मानवाला पूर्ण बदलण्याची शक्ती योगामध्ये आहे. त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १०० तास योगा करण्याचा संकल्प केला होता. पाटील यांनी १६ जून रोजी पहाटे साडे चार वाजता इगतपुरीस्थित रिसॉर्टच्या सभागृहात या उपक्रमाला सुरूवात केली. बैठक, शयन, विपरित शयन आदी स्थितीतील जवळपास २५ आसने त्या रात्रं-दिवस करत होत्या.

या काळात द्रव स्वरुपात अन्न ग्रहण करताना त्यांनी उपस्थितांशी फारसा संवाद साधला नाही. सततच्या जागरणामुळे चौथ्या दिवशी झोप येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. याच दिवशी त्यांचे योगगुरू विश्वासराव मंडलिक यांनी भेट घेऊन १०० ऐवजी १०१ तास योगासने करण्यास सुचविले. त्यानुसार मंगळवारी सकाळपर्यंत नेटाने १०३ तासाचा टप्पा गाठत त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला. गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

या विक्रमाद्वारे योगा घराघरात पोहचेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पाच दिवसात तासाभराची झोप न घेता सलग योगासने करणे आव्हान होते. ते यशस्वीपणे पेलू शकले याचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. महिनाभरापासून केवळ द्रव अन्न पदार्थाचे सेवन करत होते. तीन दिवसांचा प्रवास पाहून मुलांना काळजी वाटायला लागली. परंतु, योगासनांमधील शक्ती माहीत असल्याने आपण निर्धास्त होतो. कुटुंबिय आणि मैत्रिणींचे सहकार्य नसते तर हा विक्रम करणे अवघड होते, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.