पनवेल महापालिकेत ५२ नगरसेवक ‘दहावी प्लस’

रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत शहरी मतदारांसह ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या असतानाच, पालिकेत आपला प्रतिनिधी निवडून देताना मतदारांनी उमेदवारांच्या शिक्षणावरही विशेष लक्ष दिल्याचे उघड होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ७८ नगरसेवकांपैकी ५२ नगरसेवकांचे शिक्षण दहावी व त्यापुढे झालेले आहे.

lok sabha elections in india 2024 adr report in Marathi
कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाकडे?
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

पालिकेच्या निवडणुकीचा निकाल गेल्या शुक्रवारी लागला. या निवडणुकीत ५१ जागा जिंकत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर, शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीला अवघ्या २७ जागांवर विजय मिळवता आला. पनवेलच्या शहरी भागातील मतदारांनी भरभरून मते दिल्याने भाजपचा विजय झाल्याचे बोलले जात आहे. या पाश्र्वभूमीवर, नगरसेवकांच्या शिक्षण, संपत्ती, गुन्हेगारी पाश्र्वभूमी आदींचा वेध घेतला असता, सुशिक्षित उमेदवारांना मतदारांनी जास्त पसंती दिल्याचे दिसून येत आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये पाचवी शिकलेले आठ, नववी शिकलेले १८ तर दहावी शिकलेले १० व बारावी शिकलेले १९ तसेच पद्युत्तर शिक्षण झालेले ३ पदवीधर १२ तर डॉक्टर ५ व अभियंता १ व वकिल २ आहेत.

महापालिकेमध्ये एकहाती सत्ता असणाऱ्या सत्तारूढ भाजपचे परेश ठाकूर हे सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र परेश यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना ९५ कोटी ४७ लाख रूपयांच्या संपत्तीची नोंद केली आहे. त्याखालोखाल भाजपचे रामजी बेरा यांची संपत्ती २७ कोटी ३९ लाख रुपये असून त्या खालोखाल शेकापचे प्रितम म्हात्रे (२६ कोटी ७१ लाख), भाजपचे अ‍ॅड. मनोज भुजबळ (२२ कोटी ५४ लाख), भाजपचे राजेंद्र शर्मा (२१ कोटी ९५ लाख) यांचा क्रमांक लागतो. पालिकेत १० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या नगरसेवकांची संख्या दहाच्या घरात आहे. निवडणुकीत मतदारांना जोरात पैसेवाटप करण्यात आल्याचा आरोप होत होता, हे विशेष! मंजुळा कातकरी या पालिकेत सर्वात ‘गरीब’ नगरसेवक असून त्यांच्या नावे सहा हजार रुपये संपत्तीची नोंद आहे.

१७ जण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे

पालिकेच्या सभागृहात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले १७ जण सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणार आहेत. अमर पाटील, गोपाळ भगत, संतोष शेट्टी, गोपिनाथ भगत, जगदीश गायकवाड, विकास घरत, मनोहर म्हात्रे, सिताबाई पाटील, प्रकाश बिनेदार, प्रितम म्हात्रे, परेश ठाकूर, चारुशिला घरत, संजय भोपी, संतोष भोईर, प्रविण पाटील, शत्रुघ्न काकडे या सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.