पालघर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शनिवारी सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. किरकोळ तणावाच्या घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली.
पालघर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष या युतीचे उमेदवार अमित घोडा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार व माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार व माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. टिघरेपाडाच्या (आंबेस्तवाडी) मतदान केंद्रावर शिवसेनेची काही बाहेरची मंडळी आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली. १६ तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल.