ऐरोली नाका येथील भुयारी मार्ग आता लांबणीवर पडणार आहे. आता पर्यत या भुयारी मार्गा साठी काढण्यात आलेल्या ५ निविदांना कंत्राटदार न मिळाल्याने रखडली आहे. मात्र आता महासभेमध्ये सहाव्यांदा आलेल्या  या भुयारी मार्गाची फेर निविदेला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न मिळाल्याने भुयारी मार्गाचा प्रश्न पुन्हा रेंगाळत पडणार आहे.  याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना रेल्वे की पालिका यातील नेमके जबाबदार कोण, असा प्रष्टद्धr(२२४)्ना उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते याविरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील चिंचपाडा आणि ऐरोली नाका या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वेरुळ  ओलांडावा लागतो. अनेकदा रुळ ओलांडतांना अपघातदेखील झाले आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.  प्रभाग क्रमांक १० च्या अंतर्गत हा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. या प्रस्तावाला महानगरपालिकेने मंजुरी देखील दिली आहे. मात्र मंजुरी मिळाल्यांनतर सदर कामासाठी ६ वेळा निविदा काढण्यात आल्या. पंरतु सदर काम अंत्यत किचकट असून रेल्वे प्रशानसनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे काम रखडले आहे.

याबाबतची फेरनिविदा काढून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावाा यासाठी चार वर्षांपासून महासभेत भुयारी मार्गाची निविदा विषय पत्रिकेवर येत आहे; पंरतु त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याने सलग सहाव्यांदा भुयारी मार्गाचा विषय रखडला आहे. सदर बांधण्यात येणाऱ्या या भुयारी मार्गामुळे ऐरोली नाका परिसर ठाणे बेलापुर मार्गाला जोडला जाणार आहे. स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेचे  पदाधिकारी भुयारी मार्गासाठी खासदार राजन विचारे यांना लवकरच पत्र देणार असल्याचे सांगितले. यांसदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अंभियता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

‘नियोजित अतिक्रमण’

ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका आणि चिंचपाडा परिसराला जोडणाऱ्या नियोजित भुयारी मार्गावर ऐरोली नाका परिसरातील काही भूमाफियांनी मोकळया जागेवर अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी सिमेंट रेती विटा चे दुकान टाकून जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. याकडे मात्र विभाग अधिकांऱ्याचा कानाडोळा होत आहे. यासंदर्भात विभाग अधिकारी मंहेद्र संप्रे यांच्याशी विचारणा केली असता. सदर ठिकाणी अतिक्रमण झाले असल्यास निष्कासित करण्यात येईल.