पनवेल आगारातील डिझेल चोरीचे प्रकार वाढले होते, मात्र आता या स्वयंचलित डिझेल यंत्रणेने डिझेलचा अपव्यव टळणार असून चोरीला पूर्णत: आळा बसणार आहे. हि स्वयंचलित डिझेल यंत्रणा एसटी महामंडळाने इंडियन ऑइलच्या सहकार्याने कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्रभर हा प्रयोग राबविण्यात येणार असून पहिली स्वयंचलित यंत्रणा पनवेल आगारामध्ये बसविण्यात आली आहे. डिझेल भरणारी अत्याधुनिक यंत्रणेचा उदघाटन  गुरुवारी (दि. ३० ) रोजी  महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित देओल यांच्या हस्ते झाले .

पनवेल आगारातील हा पेट्रोल पंप हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त इंधनाचा खप होणार मुख्य पेट्रोलपंप आहे. या हायटेक यंत्रणेमुळे अनेक अनधिकृत कारभारावर चाप  बसणार आहे. कोणत्या एसटीमध्ये गरजेनुसार किती इंधन भरण्यात आले आहे. त्या एसटीचालक आणि वाहक यांच्या ओळखपत्र नावासहित सगळे माहिती नमूद करून एका क्लिकवर मिळणार आहे. सध्या हे काम हस्तलिखित स्वरूपात करावे लागत होते.  या आगारात सर्वात जास्त डिझेल भरले जात असल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. महिन्याला ८०० किलो लिटर तर दिवसाला २५ किलो लिटर एवढे इंधन वापरले जाते. पनवेल आगारातून २७०० बसेची वाहतूक होते.त्याच बरोरबर या ठिकाणी पनवेलसह ठाणे, मुंबई, रायगड इत्यादी एसटी येत असतात. त्यापैकी दररोज २५० एसटी बस याठिकाणी इंधन भरण्याकरिता येतात.

यंत्रणा अशी आहे?

या पेट्रोल पंपवार येणाऱ्या एसटीला एक सेन्सर रिंग आहे. पंपाच्या बाजूला एक मशीन बसविण्यात आलेली आहे. ती रिंग जायच्याकडे असेल त्यालाच  इंधन भरण्याची मुभा असणार आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक वाहक आणि चालक यांना ऑटोमेटेड मशीनद्वारे नोंदणी करणे गरजेचे आहे. या यत्रणेतून प्रति मिनिट ८० लिटर इंधन भरले जाणार आहे. तसेच कोणत्याही एसटी चालकाला आवश्यकतेपेक्षा जास्त  इंधन भरता येणार नाही.