पोलीस आयुक्तांना महापालिकेचे पत्र; भूमाफिया, विकासक, वास्तुविशारद, दलाल कचाटय़ात

नवी मुंबईतीस गावांत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवण्याचे काम महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने सुरू ठेवले आहे. गोठवलीतील तीन बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. यात एक चाळ, एक तीन मजली इमारत व दोन जोत्यांपर्यंतच्या बांधकामांचा समावेश आहे. गावात बेकायदा इमारती बांधून ग्राहकांना फसविणारे भूमाफिया, विकासक, वास्तुविशारद आणि दलाल यांना संघटित गुन्हेगारीप्रकरणी मोक्का लावण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे, तसे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

नवी मुंबईत २९ गावे आहेत. या गावांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. दिघा येथील ९९ इमारती तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही हे बेकायदा बांधकामांच लोण पसरतच चालले आहे. पालिकेने या बांधकामांच्या विरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून करावे दारावे, घणसोलीनंतर आता ऐरोली व गोठवली गावांकडे मोर्चा वळविला आहे. यात ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. गुरुवारी ही घरे विकण्यासाठी दलालीचे काम करणारे दलाल व या इमारतींचा कच्चा आराखडा तयार करून देणाऱ्या वास्तुविशारदांचाही समावेश करण्यात येणार आहे.

स्वत:च्या मालकीची जमीन नसताना काही ग्रामस्थांनी ती जमीन विकासकांना विकली आहे. त्यात बोनस स्वरूपात काही रक्कम घेऊन इमारतीत अर्धा वाटा कायम ठेवला आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक या बेकायदा इमारती बांधण्यात सारखेच दोषी असल्याचे पालिकेचे मत आहे. काही नामांकित वास्तुविशारदांनी जमिनी अधिकृत नसताना पैशाच्या हव्यासापोटी कच्चे नकाशे तयार करून दिले आहेत. त्यांनाही या गुन्ह्य़ात आरोपी केले जाणार आहे. त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी पालिका पाठपुरावा करणार आहे. पालिकेने अशा ४० ते ४२ इमारतींची यादी तयार केली असून ३१ डिसेंबपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.

सर्वसामान्यांना घर देण्याचे आमिष दाखवून बेकायदा घर विकणाऱ्या विकासकांसह जमिनीचे खोटे दस्तावेज देणारे ग्रामस्थ, वास्तुविशारद आणि दलाल यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वेय गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे भूमाफियांना चाप बसेल.

– डॉ. कैलाश गायकवाड, उपायुक्त (अतिक्रमण), नवी मुंबई पालिका