पनवेल तालुक्यातील तळोजा गावामधील हेक्स वर्ल्ड सीटीमधील तीनशे गुंतवणूकदारांनी रविवारी एकत्रित जमून राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांनी सामान्यांचा विश्वासघात केल्याची संतप्त भावना व्यक्त केली.

२००८ सालापासून या गृहप्रकल्पामध्ये सुमारे २३०० गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते; परंतु चार वर्षे उलटल्यावर हक्काची घरे परत न मिळाल्याने या गृहप्रकल्पातील सामान्यांना भाडय़ाच्या घरात राहावे लागत असल्याचे सांगून या गुंतवणूकदारांनी भुजबळ हे मंत्री असल्यामुळे आणि त्यांचेच कुटुंबीय हा गृहप्रकल्प उभारत असल्यामुळे आम्ही निर्धास्तपणे या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्याचे जमलेल्या गुंतवणूकदारांनी स्पष्ट केले. हेक्स वर्ल्ड सिटी गृहप्रकल्पाला रस्ता मिळाला नसेल तर भुजबळ कुटुंबीयांनी या गृहप्रकल्पाची बुकिंग सामान्यांकडून का घेतली तसेच या बुकिंगच्या रकमेतून हेक्स वर्ल्ड सिटी गृहप्रकल्पाच्या जमिनी खरेदी केल्यामुळे या जमिनींचा हक्क फसवणूक झालेल्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी जमलेल्या गुंतवणूकदारांनी येथे केली. भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीच्या चौकशीचे प्रकरण ईडी प्रशासनाकडे सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन गृहप्रकल्प ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे ती जागा सामान्यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली.

infosys q4 results infosys returns 1 1 lakh crore to shareholders in 5 fiscal years
इन्फोसिसच्या भागधारकांना पाच वर्षात १.१ लाख कोटींचा धनलाभ!
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन