दिघा बेकायदा बांधकामे

दिघा येथील बेकायदा बांधकामे थाटलेल्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यांनतर रबाळे एमआयडसी पोलीस ठाण्यात ५६ बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यात स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांचाही समावेश आहे.  तर याप्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. दहा जणांवर  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय ४६ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक नवीन गवते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी अटक टाळण्यासाठी गवते यांनी ठाणे सत्र न्यायलयामधून जामीन मिळविला होता. बेकायदा इमारत नातेवाईकांनी उभारल्याचे प्रतिज्ञापत्र  ठाणे न्यायलयात सादर केले होते; पंरतु पोलिसांनी याविरोधात पुरावे सादर करीत गवते यांनी दिलेले पुरावे खोटे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी नव्याने पुरावे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने  गवते यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. अटकेविरोधात गवते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांना न्यायालयाने १० फेब्रवारीपर्यंत  जामीन मिळविला आहे, असे उमप यांनी सांगितले.

बेकायदा बांधकाम प्रकरणातील  उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही उमप यांनी या वेळी सांगितले.