मूळव्याधीवरील इलाजासाठी अवाजवी शुल्क

मुळव्याधीवर अक्सीर इलाज करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. व्याधींवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्क आकारत असूनही तालुक्यातील स्त्री-पुरुष रुग्णांची त्याच्या दवाखान्यात गर्दी असायची. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसायासाठीचा कोणताच परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पनवेल नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत डॉक्टर बोगस असल्याचे स्पष्ट झाले.  नवीन पनवेल वसाहतीत सेक्टर-५ मधील ‘शिवशक्ती पाइल्स क्लिनिक’मध्ये डॉ. दीपक श्रीवास्तव याला गुरुवारी रात्री खांदेश्वर पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या पनवेल विभागीय अधिकारी डॉ. पद्मिनी येवले यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
bhiwandi highway robber marathi news
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

खांदेश्वर आणि नवीन पनवेल परिसरात काही दिवसांपासून बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्याकडे आल्या होत्या. समितीच्या सचिव डॉ. येवले, समिती सदस्य ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी ही कारवाई केली.

मूळव्याधीवर शस्त्रक्रिया न करता आजार बरा करण्याचा दावा श्रीवास्तव करीत होता. यासाठी त्याने विशिष्ट प्रकारचे औषध (मलम) तयार केले होते. ते औषध तो येणाऱ्या रुग्णांच्या जखमेवर लावत असे. यासाठी तो २० हजापर्यंत शुल्क आकारत असे.  याबाबत आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने ही कारवाई केली.

विशेष म्हणजे रुग्णांकडून हजारो रुपये घेणाऱ्या डॉक्टर श्रीवास्तव याच्या दवाखान्यात स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय नव्हती. नवीन पनवेलमधील अजून एका डॉक्टरचे वैद्यकीय व्यवसायासाठीचे विविध परवाने नसल्याने त्याच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगीतले.