बेकायदा बांधकाम प्रकरण
दिघा येथील बेकायदा बांधकामप्रकरणी रबाले एमआयडीसी पोलिसात बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना ३० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवर दिघा परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी ९४ बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या इमारतीवर हातोडा चालविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. यानुसार केरू प्लाझा, शिवराम, पार्वती आणि पांडुरंग अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केले होते. बांधकाम व्यावसायिकरमेश खारकर, किशोर कोळी, नितीश मोकाशी, मुकेश मढवी हे सध्या अटकेत आहेत.