नवी मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचे शुक्रवारी नेरुळ येथील वंडर्सपार्क उद्यानामध्ये महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्र्दशनाच्या निमित्ताने अनेक दुर्मिळ वनस्पती बघायला मिळत आहेत. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी आणि त्यांना एकाच ठिकाणी निसर्गाच्या विविधेतचा अनुभव घेता यावा या दृष्टीने नऊ वर्षांपासून आयोजित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. झाडे, फले, फळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास नवी मुंबईचे महापौरांनी व्यक्त केला.
पालिका वृक्षप्राधिकरणाच्या वतीने नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्क मध्ये २१ फेब्रुुवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. वृक्ष लागवडविषयी जागृती आणि निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे या वेळी आयोजकांनी सांगितले. सहभागींचा उत्साह वाढावा या दृष्टीने विविध स्पर्धाचे व उद्यान स्पध्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. मोठया संख्येने वृक्षप्रेमीनी या ठिकाणी भेटी देत आहे.
या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे, भाजीपाला, यांची विविधता एकाच छताखली पहावयास मिळत असून यामध्ये शैक्षणिक विद्यालय व महाविद्यालय, एमआयडीसी क्षेत्रातील नामंवात कंपन्या तसेच सोसायटयानी उद्यान स्पध्रेमध्ये सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनामध्ये सुर्यप्रकाशातील झाडे, सावलीतील झाडे, कुडयांतील झाडे, निवडुंग, झुलत्या फुलांच्या परडया, रस्त्याच्या कडेला लावावयाची फुलझाडे, औषधी वनस्पती, फुलांची रांगोळी, भाज्या, फळे, फुले यांची कलात्मक रचना, शोभिवंत झाडे, वटवृक्ष यांचे वैविध्य यामध्ये अनुभवता येत आहे. ५०० हुन अधिक स्पर्धकांनी यामध्ये उत्सफुर्त पणे सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते वापी तयार करण्यापासून ते अगदी पाण्याची मोट, शेत नांगरणी, मळणी ते भाकरी तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया बघायला मिळत आहे. या प्र्दशनात झाडे फुले,फळ आणि भाजीपाल्याचे २००० हून अधिक प्रकार बघालया मिळत आहेत.
प्रदर्शनात झाडे, फले, फळे, भाजीपाला यांच्या कलात्मक रचनांसह विविध वृक्षरोपे, कुंडया, खते आदि झांडासाठी आवश्यक साहित्याचे तसेच बागबगीच्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे व खेळण्यांचे स्टॉल्स आहेत. नागरिकांना वृक्ष फुलविण्यासाठी आवश्यक साहित्याची माहिती तसेच ते साहित्य लगेचच सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती लावण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यत सर्वासाठी खुले असून नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.