वाशीमध्ये ३ व ४ जूनला ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाचे आयोजन
देशभरात कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस-बीडीएसला प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली असून ‘लोकसत्ता’ आयोजित ‘मार्ग यशाचा’मध्ये विद्यार्थ्यांची ही वाट सुकर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ठाणे व मुंबईतील यशानंतर हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात येत्या ३ व ४ जून रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. या ‘नीट’ परीक्षेत नेमके काय दडले आहे याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून ते विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींपर्यंतचा प्रवासही सुकर करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत होणार आहे.
वाशीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. ‘विष्णुदास भावे’ नाटय़गृहात रंगणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे करणार आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमांच्या दोन्ही सत्रांत सिक्रेट ऑफ ‘नीट’ या सध्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवेशिका येथे मिळतील
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवार, २९ मे पासून विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी आणि विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्पलेक्स, नेरूळ रेल्वे स्थानकासमोर, सेक्टर २१, नेरूळ (पू.) या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध होतील. याचबरोबर प्रवेशिका http://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९.

विषय आणि वक्ते
* कला क्षेत्रातील वळणवाटा – दीपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस
* वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमिर अन्सारी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
* ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
* विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

‘अ‍ॅमिटी युनिव्‍‌र्हसिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाला नवी मुंबई महापालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे.