परवानगी न घेता शहरभर फलकबाजी; पालिकेचा महसूल बुडवून विद्रूपीकरण

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि पक्षांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असताना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बेकायदा फलक शहरभर लागले होते. विशेष म्हणजे पामबीच मार्गावर एकही फलक लावण्यात येऊ नये, असे वाहतूक पोलिसांनी जाहीर केल्यानंतरही तिथे म्हात्रे यांचे कटआऊट लावण्यात आले होते.

AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
ministry of women and child development internship program marathi news, two months internship program for woman marathi news
शासकीय योजना : स्वावलंबी भारतासाठी इंटर्न व्हा
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Teacher Recruitment
शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…

नवी मुंबईत फलकबाजी करणाऱ्यांना आता अनेक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यासाठी प्रभाग व मुख्यालय पातळीवर रीतसर शुल्क भरून परवानगी घ्यावी लागत आहे. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ हे फलक तिथे राहणार नाहीत, याची काळजी जाहिरात करणाऱ्यांना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काही स्थानिक नगरसेवक, संस्था व पक्ष बेकायदा फलकबाजी करत असल्याचे आढळले आहे, मात्र प्रभाग अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

शुक्रवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा ६०वा वाढदिवस शहरात भाजप कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी साजरा केला. त्याच्या शुभेच्छा देणारे फलक बेलापूर मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात लावण्यात आले होते. यातील ९० टक्के फलक लावण्यासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पालिकेला उत्पन्नावर पाणी तर सोडावे लागलेच, पण शहराचे विद्रूपीकरणही झाले.

पालिका आयुक्त प्रशिक्षणासाठी रजेवर असल्याने मुख्यालयाच्या समोर पामबीच मार्गावर लावण्यात आलेल्या बेकायदा फलकाकडे अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसले. नवी मुंबईचा मणिहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर अपघातांची संख्या जास्त आहे.

या मार्गावर एकही फलक लावण्याची परवानगी पालिकेने देऊ नये, असे वाहतूक पोलिसांनी पालिकेला कळविले आहे, मात्र मंदा म्हात्रे यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पामबीच मार्गावर जोरदार फलकबाजी केली.