खोपोली, कर्जत, खालापूर, रसायनीच्या समावेशाची शक्यता

वाढत्या लोकसंख्येमुळे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील संपूर्ण उत्तर भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारीअखेपर्यंत हा क्षेत्रविस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खोपोली, कर्जत, खालापूर व रसायनी हे चार तालुक्यांतील पोलीस ठाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कक्षेत येणार आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी वाशी येथील भावे नाटय़गृहात याचे सूतोवाच केले होते.

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल

[jwplayer e2jd58H5]

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सप्टेंबर १९९४ मध्ये स्थापना करण्यात आली. या पोलीस आयुक्तालयात आता २० पोलीस ठाण्यांचा सहभाग झाला आहे. ठाणे व रायगड या दोन जिल्ह्य़ांतील कार्यक्षेत्र असलेल्या या पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई पालिका क्षेत्र, पनवेल व उरणच्या शहरी व ग्रामीण भागांचा समावेश आहे. राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयांच्या दृष्टीने छोटे असलेल्या या पोलीस आयुक्तालयाचा कार्यविस्तार करण्यात यावा, असा प्रस्ताव गेली पाच वर्षे गृहविभागाकडे आहे. यात कर्जत, खोपोली, खालापूर आणि रसायनीचा सहभाग करण्यात यावा, असा प्रस्ताव होता. भविष्यात रायगड जिल्हय़ात होणारे विमानतळ, जेएनपीटी विस्तार, रस्ते विकास महामंडळाची वसाहत, मेट्रो, शिवडी न्हावा-शेवा सागरी वाहतूक या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्य़ातील नागरी वसाहत वाढणार आहे. त्यात तीन महिन्यांपूर्वी पनवेल महापालिकेची स्थापना झाल्याने आता हा कार्यविस्तार आवश्यक झाला आहे.

पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाचीही मोठी कुमक मिळणार आहे.

अधिकारी संख्या वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक सतीश माथूर पोलिसांच्या मुद्देमाल परत करण्याच्या एका कार्यक्रमासाठी वाशीत आले असताना त्यांनीही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्र विस्ताराचा विषय मांडला होता. नवी मुंबई पोलिसांनी खोपोली-खालापूर घेण्यापेक्षा मानखुर्द, मुंब्रा हा संवेदनशील भाग घ्यावा, असे मत मांडले होते. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रायगड जिल्ह्य़ातील चार तालुके समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रविस्ताराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. त्यात खोपोली, खालापूर, कर्जत रसायनी या तालुक्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांनी घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्या प्रस्तावाबाबत काय सद्य:स्थिती आहे याची माहिती सध्या उपलब्ध नाही.

डॉ. सुधाकर पठारे, उपायुक्त (मुख्यालय) नवी मुंबई पोलीस

[jwplayer VKdWC27W]