नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६, यादवनगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संध्या यादव या ७८६ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना, भाजप व काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संध्या यादव यांना २४३४, अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांना १६४८, अपक्ष उमेदवार दर्शना आंगणे २९ व नोटाला ४० मतदान झाले आहे.   जातीचे प्रमाणपत्र बोगस सादर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता यादव यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.