अभियानअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी
नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय ‘सागर कवच अभियान’ राबविण्यात आले. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबीवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्ट-गार्ड, मेरीटाइम बोर्ड, मरीन पोलीस, राज्य पोलीस, जेएनपीटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा सहभाग होता.
पोलीस आयुक्तालयाकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता चार स्पीड बोट, सागरी सुरक्षा शाखेचे १६ अधिकारी, ५६ कर्मचारी, ३ कंत्राटी कर्मचारी तसेच पोलीस ठाणे स्तरावर ११६ अधिकारी ५२६ कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.
सागर रक्षक दलाचे ४११ सदस्य, ग्राम रक्षक दलाचे ८२३ सदस्य आणि २२०१ पोलीस मित्रांनी देखील सहभाग घेतला होता. अभियानादरम्यान ६६ बोटींमधील १२५० प्रवाशांची या वेळी तपासणी करण्यात आली.

* शहरातील सागरी हद्दीतील आणि किनाऱ्यावरील अतिमहत्त्वाची ठिकाणे लँडिग पॉइंट, जेट्टी, चेकपोस्ट या परिसरांत प्रभावी गस्त
* रेड फोर्सच्या जवानांना नवी मुंबई हद्दीत प्रवेश करण्यास दोन वेळा प्रतिबंध करताना नवी मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क.
* वाशी खाडी पुलाजवळील संशयित बोटीबाबत मिळालेल्या माहितीवर पोलिसांनी तात्काळ त्या बोटीवर ताबा.
* नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मोरा, जेएनपीटी व घारापुरीसारख्या संवेदनशील ठिकाणांवर रेडफोर्सकडून दोन वेळा केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर .