नवी मुंबई टपाल कार्यालयातर्फे १ व २ डिसेंबर रोजी नेरुळ सेक्टर २४ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनामध्ये नवी मुंबई टपाल तिकीट महोत्सव २०१५ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये १८५४ पासून २०१५ पर्यंतची १ लाखापेक्षा अधिक टपाल तिकिटे पहाता येतील. महाराष्ट्र मंडलचे मुख्य पोस्ट मास्तर पी. एन. रंजित कुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
नवी मुंबई टपाल कार्यालय महसुलाच्या बाबतीत देशात आघाडीवर असून हिमालच प्रदेश, हरियाणा व झारंखड या राज्यांच्या महसुलापेक्षा या कार्यालयाचा महसूल अधिक त्यामुळे नवी मुंबईला प्रदर्शनाचा हा बहुमान मिळाला आहे. टपाल कार्यालयाचे कामकाज कसे चालते, पत्र गोळा करणे आणि पत्र वाटणे याशिवाय या कार्यालयात काय काम चालते, याचीही माहिती या महोत्सवात मिळणार आहे. यावेळी एक सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे.

expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
pune international centre, think tank, society, current affairs
वर्धानपनदिन विशेष : पीआयसी, देशविकासाचा सोबती
Shilpata road
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, प्रीमिअर मैदानातील बालाजी महोत्सवासाठी वाहतूक विभागाचा निर्णय