जागतिक आर्थिक मंदीचा फटका; ३० हजार घरे विक्रीविना पडून
जागतिक आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात सुमारे तीस हजार नवीन घरे विक्रीविना पडून राहिली असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नवी मुंबई बिल्डर असोसिएशनने दोन महिन्यांपूर्वी लावलेल्या मालमत्ता प्रदर्शन केंद्रात दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण त्यानंतर वीस कोटी रुपयांचीदेखील गुंतवणूक ग्राहकांनी केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोने, वाहन आणि घर खरेदीसाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा मुहूर्त मानला जात नाही. त्यामुळे या दिवशी विकासक मोठय़ा प्रमाणात सवलत, बक्षीस आणि घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून विकासकांचे हे प्रयत्न वाया जात असल्याचे आढळून आले आहे. आर्थिक मंदी आणि काळ्या पैशावर लागलेला रोख यामुळे बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक रोडावली आहे. त्यामुळे तळोजा, पाचनंद, खारघर, कामोठे, द्रोणागिरी, उलवा या भागात तीस हजारापेक्षा जास्त घरे व गाळे विक्रीविना पडून असल्याचे दिसून येते, तर नवी मुंबईत सरकारने अडीच वाढीव एफएसआय देऊनही एकही प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. त्यामुळे सध्या एखाद दुसरा ग्राहक घर किंवा गाळा घेणार असल्यास तो खूप मोठय़ा प्रमाणात भाव तोडून घेत असल्याचे रुपारेल रियल्टीचे संचालक अश्विन रुपारेल यांनी सांगितले.

वाशी येथील एक विकासक मनीष भतिजा यांनी गुढीपाडव्याच्या चार दिवस अगोदर खारघर येथील आपल्या आलिशान प्रकल्पांचे सादरीकरण जनतेसाठी खुले केले होते. त्यात त्यांनी साई मन्नत प्रकल्पातील घर ताब्याअगोदर सोसायटीच्या क्लब हाऊसचा शुभारंभ केला असून आलिशान सुविधा या क्लब हाऊसमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांना ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद येणाऱ्या काळात समजणार आहे. भतिजा यांनी मंदीच्या काळातही तेजी आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा विकासक वर्तुळात व्यक्त केली जात होती. अनेक विकासकांनी तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात दिसणारी प्रकल्प उद्घाटने सध्या दिसून येत नाहीत.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान