तळोजा फाटय़ाजवळ अपघातांची भीती

शीव-पनवेल महामार्गावर खारघर ते तळोजा फाटा येथील पुलांदरम्यान ४-५ इंच खोल लांबलचक भेग पडली आहे. ही भेग दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे महामार्गावरून रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. कारचा टोल रद्द केल्याने शीव-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आडमुठेपणाने वागत आहे, असे सांगत सार्वजिनक बांधकाम विभागाने हात वर केले आहेत.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
mumbai pune expressway marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

या भागात दिवे नसल्यामुळे रात्री अंधारातून वाहन चालविणे धोक्याचे ठरत आहे. महामार्ग असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.

महाड दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील महामार्गावरील सर्व पुलांची पाहणी करून प्रत्येक पुलाचा अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. तरीही शीव-पनवेल रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वीच पनवेल महामार्गाचे काम पूर्ण केले. खारघर टोलनाक्यापुढील तळोजा फाटा येथील खाडीवर असलेल्या पुलाचे बांधकाम १९७० ते १९८०च्या दरम्यान करण्यात आले आहे. महामार्गाचा विस्तार करण्यासाठी १९८० मध्ये दुसरा जोड पूल बांधण्यात आला. या दोन्ही पुलांच्या जोडणीत भेगा दिसत आहेत. तब्ब्ल ४५ वर्षांत पुलांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सावर्जनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते सतीश श्रावगे यांनी सांगितले, २०११ मध्ये आम्ही शीव-पनवेल महामार्गावरील ‘तळोजा’ जंक्शन ते ‘बीआरसी’ जंक्शनपर्यंतची मक्तेदारी ही सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडला दिली. रस्ता, महामार्ग, पूल त्यांची देखभाल, टोल वासुली हे सर्व त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वारंवार महामार्गाच्या समस्येविषयी कंपनीकडे पत्रव्यवहार करत आहे, मात्र ते जुमानत नाहीत.

आमच्याकडे निधीच नाही!

१२०० कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार केला आहे. खारघर टोल नाक्यावर कारला टोल माफ केल्याने आमचा महसूल बुडत आहे. आम्हाला तेथून निधी मिळत नसल्याचे सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी संजीत श्रीवास्तव यांनी सांगितले.

तळोजा जंक्शन ते बीएआरसी जंक्शन हा नोड सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. यामुळे येथील रस्त्याची, पुलाची देखभाल त्यांनीच करणे अपेक्षित आहे. आम्ही वारंवार याविषयी पात्रव्यवहार केला आहे. कामे करून घेणे हे त्यांच्या अख्यत्यारीत येते. आम्ही फक्त देखरेख करतो. पुलाच्या बाबतीत आम्ही पाहणी करून योग्य तो निर्णय घेऊ.

सतीश श्रावगे, अधीक्षक अभियंता, सार्वजिनक बांधकाम विभाग, शीवपनवेल महामार्ग