पनवेल तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने यंदा महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जात, तसेच उत्पन्न आणि अधिवास दाखला तासाभरात देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी १७ आणि १८ जूनला दोन दिवसांचे शिबीर होणार आहे.
महसूल विभागातील नायब तहसीलदार कल्याणी कदम-मोहिते यांनी एका महिन्याच्या कालावधीत खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहरातील तक्का येथे शालेय प्रवेशासाठी जात, उत्पन्न, अधिवास असे विविध दाखले वाटपाची सात शिबिरे घेतली. या शिबिरामुळे सुमारे ४३२१ विद्यार्थ्यांना त्यांच्याच शहरात महसूल विभागाने दाखले वाटप केले.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दाखले मिळाल्याने परीक्षेच्या निकालानंतर शुक्रवार (ता. १७) व शनिवार (ता.१८) असे दोन दिवसांचे शिबीर राबवून त्यामध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना दाखले देण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने आखले आहे.

शिबिरात येताना हे आणा वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास
* शिधापत्रिका, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मूळ बोनाफाइड प्रमाणपत्र (त्यावर जन्म दिनांक, ठिकाण याचा उल्लेख हवा)
* पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, विजबिल, टेलिफोनबील, घरपट्टीची पावती, वास्तव्य दाखविणारा सरकारी पुरावा
उत्पन्नाचा दाखला
* शिधापत्रिका
* अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र, आयकर विवरण प्रमाणपत्र मागील आर्थिक वर्षांचे
* अर्जदार व्यावसायिक असल्यास मागील आर्थिक वर्षांचे विवरणपत्र
* अर्जदार शेतकरी असल्यास ८ अ, ब चालू तारखेचा सातबारा उतारा
* तलाठी अहवाल
* इतर पुरावे (वीज बिल)
जेष्ठ नागरिक दाखला
* शिधापत्रिका
* शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, सेवा पुस्तिका तसेच वय दर्शविणारा सरकारी पुरावा
* वय दर्शविणारा वैद्यकीय पुरावा, ३.५ सें.मी. साइजचे दोन फोटो, फोटो मागे नाव लिहावे