भूखंड देण्याबाबत सिडको संचालक मंडळाची आज बैठक

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
narendra modi
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर

श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती आध्यामिक केंद्र सीबीडी येथील सेक्टर-२१ मध्ये (पारसिक हिल) होणार आहे. सिडकोने या देवस्थानला भूखंड देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच तो शासननिर्णयासाठी पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या भूखंडावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी सिडकोला या भूखंडाची चाचपणी करण्याचे आदेश दिले होते. नेरुळ येथे टेकडीवर अशा प्रकारे एका खासगी संस्थेने बालाजी मंदिर यापूर्वी उभारले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी सिडकोला या भूखंडाची चाचपणी करण्याचे आदेश दिले होते.

आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे श्री वेकेंटश्वराचे (बालाजी) मंदिर हे जगातील हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान मानले जाते. या देवस्थानच्या विश्वस्तांनी एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून नवी मुंबईत विस्र्तीण अशा भूखंडाची मागणी केली होती. या विश्वस्तांमध्ये राज्याच्या एका माजी मुख्य सचिवांचा समावेश असल्याने या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन एकरचा भूखंड जाहीर केला होता, पण तसा विस्र्तीण भूखंडच सीबीडीत उपलब्ध नसल्याने सिडको गेली चार महिने विस्र्तीण भूखंडाचा शोध घेत होती. त्यानुसार सीबीडी पारसिक हिलवरील सेक्टर २१ मध्ये १९०० व २९०० चौरस मीटरचे दोन भूखंड या देवस्थानसाठी उपलब्ध असल्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर शासनाकडे विचारार्थ पाठविला जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ह्य़ा प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता असून देवस्थानला पाच हजार चौरस मीटर (जेमतेम एक एकर एक हजार मीटर) क्षेत्रफळाचा भूखंड कमी पडणार आहे. काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शिफारशीवरून खारघर येथे सत्यसाईबाबा ट्रस्टला पाच एकरचा भूखंड जाहीर करण्यात आला होता, पण त्यांना ह्य़ा भूखंडावर कर्ज न मिळाल्याने (हा भूखंड एक रुपये भाडेपट्टय़ावर देण्यात आला होता, त्यामुळे वित्तपुरवठा संस्थांनी कर्ज देण्यास असमर्थता दर्शवली.) नंतर हा भूखंड नाकारल्याचे समजते. सिडकोकडे आता सामाजिक उद्देशासाठी देण्यात येणाऱ्या भूखंडांची संख्या कमी असल्याने सिडको जाहिरात देऊन धार्मिक संस्थांना हे भूखंड देणार आहे, मात्र  देवस्थानासाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्याने भूखंड निश्चित केला.

सध्या धार्मिक भूखंडांसाठी बाजारभावापेक्षा ३०० टक्के दराने भूखंड देण्याची तयारी आहे. तिरुमल्ला तिरुपती देवस्थानला पैशाची कमतरता नाही, पण त्यांना हवा असलेला विस्र्तीण भूखंड सीबीडी परिसरात उपलब्ध नाही. त्यामुळे दोन भूखंड एकत्र करून हा एक भूखंड तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी बालाजीच्या छोटय़ा प्रतिकृती मंदिरासह ध्यान, भक्तनिवास व आध्यात्मिक केंद्र उभारले जाणार आहे. या ठिकाणाहून तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शनाचे आरक्षणदेखील केले जाणार आहे. याच पारसिक हिल टेकडीवर श्रीकृष्णाचे मंदिर उभारण्यात आले आहे.