वाशी गाव

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या गावांचे गावपण संपल्यात जमा आहे. हा वेग कमालीचा आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या राजकर्त्यांनी पर्यायी मुंबईचा आराखडा आखला आणि नवी मुंबई कागदावर अवतरली तेव्हा वाशी गावाचा समावेश प्रथम यात करण्यात आला. कधीकाळी मोत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाची  गोष्ट आज रंगवून सांगितली जाते. याच गावातून मोती मिळवून जसे ग्रामस्थ मोठे झाले. त्यापद्धतीने गावाबाहेरील लोकही मोत्यांच्या लोभाने या गावात आले आणि गब्बर झाले. अशा या मोत्याच्या गावाची ही रंजक कथा..

मुंबईला नवी मुंबईशी जोडणारे पहिले गाव म्हणजे वाशी. पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. गावाच्या चारही बाजूंनी पाणी. अडीच एकरचे एक छोटेसे बेट. वीस कुटुंबे. नात्यागोत्यातीलच माणसं. लोकसंख्या जेमतेम सव्वाशे लोकांची. कुडाची किंवा मातीची कच्ची घरे. समुदायाच्या लाटांचे पाणी पाचवीला पुजलेले. मासेमारी, बुडी मारून वाळू काढण्याचा व्यवसाय; पण गावातील काही तरुण भाऊचा धक्का, मुरुड-जंजिरा, मोरा बंदरापर्यंत मोठा होडका घेऊन जायचे. दिवसभर भर समुद्रात फिरायचे. ओहोटी लागल्यानंतर तयार होणारी समुद्रातील बेट शोधायचे. पोटाची भूक भागविण्यासाठी भाकरी आणि सुक्या मासळीची शिदोरीची सोबत आणि ती खाताना ओठी एखादे जुने गाणे वा कोळीगीत. पाण्याच्या मधोमध एखादे बेट लागले की हे सर्व भावबंध थाली शोधायचे. थाली म्हणजे काय मोठे शिंपले. एखादी थाली हाताला लागली की चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलायचे. भर समुद्रात आनंद व्यक्त केला जायाचा. एखादा तरुण कोळी गाण्यावर फेर धरायचा. सर्वाचाच आनंद गगनात मावेनासा व्हायचा. सापडलेल्या थालीत मोती असायचे. समुद्रातील रत्न. या मोत्यांना तेव्हा बाजारात चांगली मागणी होती. आजही आहे; पण त्या वेळी मिळणारा एक मोती त्या घराची आर्थिक स्थिती बदलवणारा ठरायचा. २० ते ३० रुपये तोळ्याने विकला जात होता. त्यासाठी ठाणे मुंबईतील व्यापारी थेट वाशी गाठायचे, तर काही हुशार ग्रामस्थ ठाण्याला जायचे. एका छोटय़ा बाटलीत हा मोती त्या व्यापाऱ्यांना विकला जात होता. बघता बघता त्या मोत्यांच्या लालसेने मारवाडी गावात आले. त्यांनी जमिनी घेतल्या. ग्रामस्थांना पैसे उधार देऊन काही नंतर हडप केल्या. मासेमारी, शेती, डुबीची वाळू काढणारे वाशीगावचे कोळी बांधव मोतीपण काढायचे. मोती काढणारे कोळी नंतर स्वत: व्यापारी झाले. स्वयंपूर्ण गाव म्हणून वाशीची ओळख उदयाला आली. शिक्षणासाठी खाडी पार करून तुभ्र्याला जाणारे तरुण आता चांगल्या पदांवर काम करीत आहेत. त्यांचे प्राथामिक शिक्षण आत्ताच्या जागृतेश्वर मंदिरात झाले. त्या वेळचे ते शिवमंदिर. कधी शाळा पूनवा शेठच्या वाडय़ातही भरायची. सर्वात आधीची वस्ती म्हणून वाशी. याच वाशीचे एक टोक धरून नवी मुंबईची निर्मिती झाली. त्यापूर्वी ठाणे-मुंब््रय़ाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वाशी तसे खिजगणतीत नव्हते. मानखुर्द-वाशी खाडी पुलाचे काम मे १९६४ रोजी सुरू झाले. त्या वेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण पायाभरणीला आले होते. सात वर्षांत पूल तयार झाला आणि वाशीचे भाग्य पालटले. मुंबई-नवी मुंबई अर्थात त्या वेळची बेलापूर पट्टी हाकेच्या अंतरावर आली. लोकांची ये-जा सुरू झाली. त्यापूर्वीही वाशीकर मुंबईत जायचे, पण बोटावर मोजण्याइतके. १९६४ ला मानखुर्दपर्यंत रेल्वे आली होती. होडीने खाडी पार करायची. होडी किनाऱ्याला लावून मुंबैला बाजारहाटासाठी जायचे. अंगावर लंगोट आणि बनियान. असा पेहराव बघून टीसीपण कधी तिकीट विचारायचा नाही. घाबरत होता म्हणून नाही, तर कोळी म्हणजे दर्यादिल, प्रामाणिक, आणि बिनधास्त माणूस अशी ओळख होती म्हणून. अख्खी मुंबईच कोळ्यांची म्हणून त्याचा आदर मोठा. मुंबादेवीला आत्ताच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले की स्वारी पुन्हा भरती यायच्या आत घरी परतायची. होडी, रेल्वेचा प्रवास न जमणारे ठाण्याला चालत खरेदीला जायचे किंवा बेलापूरहून सकाळ- संध्याकाळ सुटणाऱ्या एसटीने. त्यासाठी जुहूगाव, कोपरी, तुर्भे गावापर्यंत असणाऱ्या पाण्यातून पायवाट काढली जायची. पाणी गुडघ्यापर्यंत, कपडे भिजू नयेत म्हणून डोक्याला बांधायचे. आज त्याच तुर्भे गावाजवळ आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ उभी आहे ती मातीचा भराव टाकून. वाशीचा इतिहास चारशे वर्षांपूर्वीचा आहे. मुलुंड गव्हाणपाडय़ातील चार-पाच कोळी या बेटावर राहायचे म्हणे. मासेमारीसाठी रात्रंदिवस भटकणाऱ्या कोळ्यांनी या बेटाला पसंती दिली होती. त्यांना हुसकावून आत्ताची वसाहत वसविण्यात आली आहे. वासोबा ही ग्रामदेवता. त्याच्या नावानेही वाशी म्हणतात, असा एक मतप्रवाह. ही देवता रात्री घोडय़ावरून गावाची राखण करायची, अशी आख्यायिका आहे. त्याचा प्रत्यय आला आहे. देवाच्या घुंगरांचा आवाज यायचा असे सांगणारे आजही आहेत. ग्रामदेवतेच्या जत्रेसाठी अख्खे गाव लोटायचे. तेव्हा हेवेदावे नव्हते. आता जमिनीच्या तुकडय़ावरून वाद झाले. सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. एकत्र कुटुंब पद्धत मोत्यांच्या मण्यांप्रमाणे विखुरली आहे. पूर्वी संपूर्ण कुटुंब एका छताखाली राहात होते. आता जमिनीचे तुकडे घेऊन वेगळे झाले. कुटुंबच नाही तर गाईगुरंदेखील घरातच. त्यामुळे एकोपा होता, प्रेम होतं. गावाचा विस्तार झाला. अडीच एकरवरचे गाव अडीचशे एकरवर पसरले. समुद्राला लागूनच असलेल्या गावातील एकही ग्रामस्थ त्या समुद्राने गिळला नाही. हे सांगताना मात्र आजही वाशीकरांना अभिमान आहे.