स्वादीष्ट रानफळाला उरणकरांची पसंती

पावसाचे आगमन होताच मानवी शरीराला आरोग्यदायी असलेल्या विविध प्रकारच्या नैसर्गिक रानभाज्यादेखील बाजारांमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यात जमिनीखाली येणाऱ्या कंदमुळांसह करंद्याच्या फोडींनादेखील बाजारात विशेष मागणी आहे.

coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
grape summer cooler juice recipe
Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर
Learn How To Cook instant rava kurdai At Home
रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती

काटेरी व काळ्या रंगाची कंदमुळे ही पावसाळ्यात येतात. त्यामुळे या करंद्याची चवही याचवेळी चाखता येते. रानातील करंदे खणून त्याची विक्री बाजारात केली जाते. करांदे अतिशय कडवड असतात. ते शिजवून खाण्याची पद्धत वंशपरंपरेने येत असल्याने ह फळ शिजवणे सर्वाना शक्य होत नाही.

पावसाळ्यात करंद्याच्या फोडी तयार केल्या जातात. मुळात चवीने कडवड असलेले करंद्या शिजविण्याची पद्धत गावरान आहे. प्रथम करंद्याच्या फोडी करून त्या धुवून नंतर त्याला चुलीतील राखडीचे आवरण लावून शिजविले जाते. त्यामुळे करंद्याच्या फोडींचा कडवडपणा दूर होऊन त्याची चव वाढते.

हा चविष्ट पदार्थ बनविण्याचे प्रमाण घटल्याने करंद्याच्या फोडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दहा रुपयांना चार ते पाच फोडीची विक्री करण्यात येते.

चिर्लेकर, कंदमूळ विक्रेत्या.