आंद्रे मारी अ‍ॅम्पिअर हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॉलिमियालिऑन येथे झाला. विद्युतगतिकीशास्त्र (इलेक्ट्रोडायनॅमिक्स) या भौतिकी शाखेचा पाया घालणारे संशोधक म्हणून ते ओळखले जातात.

अ‍ॅम्पिअर अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणीच त्यांनी प्रगत गणिताचा अभ्यास करून त्या वेळेपर्यंत सिद्ध झालेले सर्व गणित आणि विज्ञान आत्मसात केले होते. लॅटिन भाषा व निसर्गशास्त्रही ते शिकले होते. त्यांच्या वाचनात अनेक विषयांचा समावेश असे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Candidates Chess Tournament Russia Ian Nepomnia leads the way sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: नेपोम्नियाशीचे पारडे जड!
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?

इसवी सन १७९९ मध्ये अ‍ॅम्पिअर यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८०९ साली ते न्यू एकोल पॉलिटेक्निकमध्ये गणिताच्या प्राध्यापकपदी रुजू झाले. ते विलक्षण प्रतिभावान होते. अगदी झपाटल्यासारखे एखाद्या कल्पनेच्या मागे लागून प्रयोग करीत.

हॅन्स ओरस्टेड या डॅनिश शास्त्रज्ञाने तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती चुंबकक्षेत्र निर्माण होते असा निष्कर्ष प्रयोग करून काढला होता. अ‍ॅम्पिअरना हे समजताच त्यांनीही विद्युतप्रवाह आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध दर्शविण्यासाठी प्रयोग केले, भौतिकीय सिद्धांत मांडले, गणितीय स्पष्टीकरण दिले. विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या दोन सरळ, लांब, समांतर तारांमध्ये प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या बलासंबंधी नियम मांडला. जर दोन्ही समांतर तारांतील विद्युतप्रवाह एकाच दिशेने वाहत असेल तर त्यात आकर्षण निर्माण होते व विरुद्ध दिशेने वाहिल्यास प्रतिसारण निर्माण होते, असे अ‍ॅम्पिअरना आढळले. सर्व आविष्कारासंबंधी यथार्थ सिद्धांत व निष्कर्ष मोठय़ा प्रबंधाद्वारे फ्रान्सच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये सादर केले. अ‍ॅम्पिअर यांनी विद्युतप्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला गॅल्व्हानोमीटर असे नाव दिले.

कॉलेज डी फ्रान्समध्ये १८२४ साली अ‍ॅम्पिअर प्रायोगिक भौतिकशास्त्राच्या प्रतिष्ठेच्या अध्यक्षपदावर निवडून आले. तसेच १८२७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्यत्व प्राप्त झाले. १८२८ मध्ये त्यांची रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सभासद म्हणून निवड झाली. आंशिक अवकल समीकरणासंबंधीही (पार्शल डिफरन्शिअल इक्वेशन्स) त्यांनी संशोधन केले आहे. विद्युतशास्त्रातील महत्त्वाच्या संशोधनाच्या सन्मानार्थ विद्युतप्रवाहाच्या एककाला अ‍ॅम्पिअर हे त्यांचे नाव देण्यात आले आहे.

डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

निर्मल वर्मा- साहित्य

निर्मल वर्मा यांनी कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘परिन्दे’-१९५८ मध्ये प्रकाशित झाला आणि त्याबरोबरच एक असाधारण, संवेदनशील लेखक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. यानंतर ‘जलती झाडी’ (१९६४), ‘पिछली गर्मियोंमे’ (१९६९), ‘बीच बहसमें’ हा चार दीर्घकथांचा संग्रह १९७१ मध्ये, नंतर ‘कव्वे और काला पानी’ (१९८३) आणि ‘सुखा तथा अन्य कहानियाँ’ (१९९५) असे सहा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या ‘परिन्दे’ कथेत स्त्रीजीवनाच्या आंतरिक अनुभूती, संवेदना, वेदना, जीवनाकांक्षा यांचं ‘लतिका’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या माध्यमातून चित्रण आहे, तर ‘लन्दनकी एक रात’ या कथेत अनिवासी भारतीय, आशियाई लोकांची बेकारी, नोकरीचा शोध, अपमानास्पद जिणे व जीवनसंघर्षांची वैचारिक स्पंदने दिसून येतात. ‘धूप का टुकडा’, ‘डेढ इंच उपर’, ‘अंधेरे मे’, ‘जलती झाडी’, ‘जिंदगी यहाँ और वहाँ’ या त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत.

१९६४ मध्ये त्यांची पहिली कादंबरी ‘वे दिन’ प्रकाशित झाली. या कादंबरीत त्यांनी आपल्या युरोप प्रवासाच्या पाश्र्वभूमीचा वापर केला आहे. चेकोस्लोव्हाकियाच्या परिसरातील काही अनिवासी युरोपीय पात्रांच्या माध्यमातून त्यांनी युद्धोत्तर युरोपची, माणसांची मानसिकता चित्रित केली आहे. युद्धकाळात बालपण घालवलेल्यांना त्या दु:खद स्मृती जन्मभर त्रास देतात, हे वास्तव त्यांनी या कादंबरीत चित्रित केले आहे. या कादंबरीनंतर १९७४ मध्ये ‘लाल टीनकी छत’, १९७९ मध्ये ‘एक चिथडा सुख’, १९८९ मध्ये ‘रात का रिपोर्टर’ आणि २००० मध्ये ‘अंतिम अरण्य’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. निर्मल वर्मानी ‘तीन एकान्त’ (१९७६) हे नाटक लिहिले असून, तीन प्रवासवर्णनेही प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी ‘चीडोंपर चाँदनी’ (१९६२) आणि ‘धुंधसे उठती धुन्ध’, ही त्यांची एका वेगळय़ा, नव्या रूपात लिहिलेली प्रवासवर्णने खूप गाजली. त्यांची चार संकलने, अनुवादकार्यही प्रकाशित झाले आहे. ‘शब्द और स्मृती’ (१९७६), ‘भारत और युरोप : प्रतिश्रुती के क्षेत्र में’ (१९९१), ‘दुसरे शब्दों में’ (१९९९) हे त्यांचे निबंधसंग्रह विलक्षण वाचनीय आहेत. वर्मा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com