पेट्रोलपंपावर होत असलेल्या ग्राहकांच्या फसवणुकीची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. सध्या सर्वत्र अत्याधुनिक इलोक्ट्रॉनिक पंप बसवलेले असतात. यातले बहुतांशी पंप नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले. आपल्याकडे बहुतेक तेलकंपन्या सरकारी. त्यांचे विक्रेत्यांवर पूर्ण नियंत्रण.. मग हे कसं घडलं?

आता या यंत्रात छेडछाड कशी होऊ शकते ते पाहू. चाकांवर बसवलेल्या एन्कोडर संवेदक दोन स्पंदनांच्या (पल्स) स्वरूपात विद्युत संदेश पाठवतो. ही दोन स्पंदनं म्हणजे एक मिलिलिटर, हे प्रमाणीकरण या पेट्रोल पुरवणाऱ्या यंत्रणेत कसं केलं जातं, गे आपण मागील लेखात पाहिलं.

समजा, कोणी तरी एक स्पंदन म्हणजे अध्र्या मिलिलिटरच्या ऐवजी ०.५५ मिलिलिटर असं चीपमधील आज्ञावलीत बदल करून त्यातील सूत्र बदललं. आता काय होईल? चाकांची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर, दोन स्पंदनांनंतर जेव्हा प्रत्यक्षात एक मिलिलिटर पेट्रोल पुढे फेकलं गेलेलं असेल, तेव्हा पडद्यावरील नोंद ही १.१ मिलिलिटर पेट्रोल पुरवलं गेल्याची असेल. म्हणजे दोन हजार स्पंदनांनंतर जेव्हा प्रत्यक्षात एक मिलिलिटर पेट्रोल पुढे फेकलं गेलेलं असेल, तेव्हा पडद्यावरील नोंद ही १.१ मिलिलिटर पेट्रोल पुरवलं गेल्याची असेल. म्हणजे दोन गजार स्पंदनांनंतर प्रत्यक्षात एक लिटर पेट्रोल पुरवूनही १.१ लिटर पेट्रोल पुरवल्याचं ग्राहकासमोरच्या पडद्यावर दिसून येईल. दुसऱ्या शब्दांत सांगयाचं तर ग्राहकाला जेव्हा एक लिटर पेट्रोल पुरवल्याचं पडद्यावर दिसेल तेव्हा त्याच्या गाडीत प्रत्यक्षात ०.९०९ लिटर म्हणजे नुसते ९०९ मिलिलिटर इतकंच पेट्रोल पडलेलं असेल. म्हणजे ग्राहकाला ९१ मिलिलिटर पेट्रोल कमी मिळालं असेल.

पेट्रोलच्या बाबतीत या कमी मिळालेल्या इंधनामुळं दर लिटरमागे सात-साडेसात रुपयांचं नुकसान झालेलं असेल. देशातील शेकडो पंप या फसवणुकीच्या उपद्व्यापात सामील होते असं लक्षात घेतलं, तर ग्राहकांचं एकूण कोटय़वधी रुपयांचं नुकसान झालं असणार. ग्राहकाने एक लिटर पेट्रोल विकत घेतलं, तर मीटरच्या अचूकतेवरील मर्यादा लक्षात घेऊन अध्र्या टक्क्यांपर्यंत म्हणजे प्रत्येक लिटरमागे पाच मिलिलिटर एवढं पेट्रोल कमी-जास्त दिलं तर चालतं. याचे नियम सरकारच्या वजनमापे विभागाने आणि पेट्रोल कंपन्यांनी ठरवलेले असतात.

पेट्रोलच्या वितरणात फरक पडण्यासाठी पेट्रोलपंपावरील यंत्रांतील चीप बदलण्यात आल्या. ही पद्धत अशी होती की सामान्य ग्राहकांच्या लक्षातच येणार नाही, की आपली एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फसवणूक होते आहे. आता यापुढे पेट्रोलपंपावरील या चीप सीलबंद करण्याची सक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत यात वादच नाही. पण तंत्रज्ञानाचादेखील गैरवापर होऊ शकतो.

श्रीकांत कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

गुरुदयाल सिंग- साहित्य

गुरुदयाल सिंग यांच्या ‘मढी दा दीवा’ (१९६४). ‘अणहोए’ (१९६६), ‘रेत दी इक मुठ्ठी’ (१९६७), ‘अध चांदणी रात’ (१९७२), ‘अहे घोडे दा दान’ (१९७६), ‘परसा’ (१९९९) इ. नऊ कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, तीन नाटके ‘पंजाब दे मेले ते त्योहार’ इ. चार गद्यलेखनसंग्रह, दोन भागांतील आत्मकथन, बालसाहित्य आणि ‘सग्गी फुल’ (१९६२), ‘चौणवियाँ कहानियाँ’ (१९८८), ‘बेगाना पिण्ड’ इ. ११ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

त्यांची पहिली कथा ‘भागोवाले’ ही ‘पंज दरिया’ या साहित्यिक मासिकात १९५७ मध्ये प्रकाशित झाली होती. ‘बलकम खुद’ हे मुलांसाठीचे पहिले पुस्तक १९६० मध्ये प्रकाशित झाले, तर पहिला कथासंग्रह ‘सग्गी फुल’ १९६२ मध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या कथांवर चित्रपटही तयार झाले आहेत.

पंजाबी कादंबरीलेखनात, गुरुदयाल  सिंग हे महत्त्वाचे नाव आहे. ‘मढी दा दीवा’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. एका दलित आणि विवाहित जाट महिलेच्या मूकप्रेमाची ही कथा आहे. आशय, व्यक्तिरेखाटन आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव यांचा प्रत्यय देणारी ही कादंबरी इतकी सहज, सरळपणे लिहिली आहे की या दु:खात प्रेमकथेने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. मनुष्यजीवनातील मूलभूत संवेदना त्यांच्या मनाला अस्वस्थ करते. सामाजिक आणि आर्थिक अत्याचाराची शिकार झालेली त्यांच्या कादंबरीतील अधिकांश पात्रे अन्यायाचा कडाडून विरोध करतात. पण परिस्थिती किती का विषम असेना, त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रांचे आणि भोवतालच्या परिस्थितीचे चित्रण सूक्ष्म, मनाला भिडणारे असते. कादंबरीतील पात्रांना परिस्थितीच्या आणि कालप्रवाहाच्या संदर्भात ते बघतात-पारखतात आणि त्यांच्या आंतरिक शक्तींना त्यांची स्वप्ने, त्यांच्या आकांक्षा, त्यांची अभावग्रस्त परिस्थिती- या जगण्याला जिवंतपणे प्रस्तुत करतात.  ‘अहे घोडे दा दान’ (अंध घोडय़ाचे दान) या त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे पाठविण्यात आला होता. पंजाबचे प्रश्न आणि भारतीय समाज या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. कॅनडा, यूके या देशांच्या दौऱ्यात त्यांनी इंडियातून त्या देशात गेलेल्या भारतीयांच्या आर्थिक आणि राजकीय अनेक प्रश्नांचा अभ्यास केला.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com