इंग्लिश सूतांक पद्धतीमध्ये लांबी आणि वजनासाठी यार्ड आणि पौंड हे इंग्लिश पद्धतीमधील एकक वापरले जातात. मेट्रिक पद्धतीतील मीटर आणि किलोग्राम ही एकके वापरून सूतांक व्यक्त करणाऱ्या काही अप्रत्यक्ष पद्धतीसुद्धा प्रचलित आहेत. त्यापकी मेट्रिक सूतांक ही पद्धत युरोपमध्ये प्रसिद्ध होती. यामध्ये लांबी एक किलोमीटरच्या पटीत मोजली जाते आणि वजन किलोग्राममध्ये मोजले जाते. एक किलोमीटर लांबीच्या जितक्या तुकडय़ांचे वजन एक किलोग्रॅम भरेल त्या आकडय़ाला त्या सुताचा मेट्रिक सूतांक म्हणतात.
प्रत्यक्ष किंवा थेट सूतांक पद्धती (डायरेक्ट यार्न नंबिरग सिस्टीम) अप्रत्यक्ष सूतांक पद्धतीमध्ये सुताची जाडी आणि सूतांक हे परस्पर विरोधी प्रमाणात असतात. म्हणजेच सुताची जाडी वाढली तर सूतांक कमी होतो आणि जाडी कमी झाली तर सूतांक वाढतो. अशा पद्धती समजावयाला क्लिष्ट आणि गोंधळाच्या असतात. अप्रत्यक्ष सूतांक पद्धतींचा वापर प्रामुख्याने नसíगक तंतूंपासून बनविलेल्या सुतांसाठी केला जात असे. मानवनिर्मित तंतूंच्या उदयानंतर थेट किंवा प्रत्यक्ष सूतांक पद्धतींचा विकास झाला. थेट सूतांक पद्धतींमध्ये दोन प्रकारचे सूतांक सर्वात अधिक प्रचलित आहेत. या सूतांक पद्धतीमध्ये सूताची रेषीय घनता मोजली जाते आणि या घनतेचा आकडा हा त्या सुताचा सूतांक असतो. विविध थेट सूतांक पद्धतींमध्ये रेषीय घनतेचे वजन आणि लांबी यांची परिमाणे वेगळी असतात.
टेक्स सूतांक (टेक्स नंबर) :  या पद्धतीमध्ये रेषीय घनता मोजण्यासाठी लांबीचे परिमाण हे १००० मी. किंवा १ कि. मी. हे असून वजनाचे परिमाण ग्रॅम हे आहे. एक कि. मी. लांबीच्या सुताचे ग्रॅममध्ये जे वजन असते तो त्या सुताचा टेक्स सूतांक असतो. ही पद्धत प्रामुख्याने आखूड तंतूंपासून कताई प्रक्रियेने बनविलेल्या सुतासाठी वापरण्यात येते.
डेनियर सूतांक (डेनियर नंबर) :  या पद्धतीमध्ये रेषीय घनता मोजण्यासाठी लांबीचे परिमाण हे ९००० मी. किंवा ९ कि. मी. हे असून वजनाचे परिमाण ग्रॅम हे आहे. नऊ कि. मी. लांबीच्या सुताचे ग्रॅममध्ये जे वजन असते तो त्या सुताचा डेनियर सूतांक असतो. ही पद्धत प्रामुख्याने मानव निर्मित आखूड व अखंड तंतूंसाठी आणि अखंड तंतूंपासून बनविण्यात येणाऱ्या धाग्यांसाठी  वापरण्यात येते.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – बडोदा राज्याचा पूर्वेतिहास
सध्याच्या गुजरात प्रांतात असलेले बडोदा हे शहर ब्रिटिशराजच्या काळात महत्त्वाच्या पाच संस्थानांपकी एक होते. २१४०० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाला ब्रिटिश राजवटीने २१ तोफसलामींचा मान दिला. जुन्या ग्रंथांमध्ये या शहराचा उल्लेख ‘वटोदरा’, ‘वीरक्षेत्र’, ‘विरावती’ या नावांनी आढळतो. भारतात आलेले सुरुवातीचे परकीय व्यापारी व प्रवासी यांनी या शहराचा उल्लेख ‘ब्रोडेरा’ असा केला आणि त्याचे पुढे बरोडा, वडोदरा, बडोदा झाले. गायकवाडपूर्व काळात बडोदा आणि आसपासच्या प्रदेशावर मोगल बादशाहचे राज्य होते. या प्रदेशावर बाबी नवाब हे मोगलांचे सुभेदार होते. पुणे जिल्ह्य़ातील हवेली तालुक्यातील भरे या खेडय़ातील शेतकऱ्याचा मुलगा दमाजी गायकवाड हा बाजीराव पेशव्यांच्या लष्करात होता. मोगल बादशाहचा सुभेदार निजाम उल् मुल्क याचा पराभव केल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दमाजीला समशेर बहाद्दूर हा किताब आणि सरदारकी दिली. दमाजी हा मराठय़ांचा सेनापती खंडेराव दाभाडेच्या बरोबर गुजरातेत सेनाधिकारी होता. दमाजीच्या मृत्यूनंतर त्याला वारस नसल्याने त्याचा पुतण्या पिलाजीला सरदारकी मिळाली. १७२१ साली पिलाजीने मोगलांचे सोनगड घेतले आणि तिथे किल्ला बांधून आणि स्वत:चे छोटे सन्य राखून राहू लागला. पेशव्यांनी पिलाजीला गुजरातच्या काही प्रदेशांच्या महसुलीच्या वसुलीसाठीही नियुक्त केले. गुजरातमधील पट्टणच्या नवाबाच्या विभक्त झालेल्या दुर्वर्तनी, कारस्थानी बेगमने आपले ठाण बडोद्यात मांडले होते. तिचे लोक बडोद्यात जुलूम, अत्याचार करतात म्हणून काही नगरवासीयांनी पिलाजीला बेगम व तिच्या साहाय्यकांवर चढाई करण्यासाठी उद्युक्त केले. ही सुवर्णसंधी समजून पिलाजीने बडोद्यात आपले सन्य घुसवून बेगम आणि तिचे साहाय्यक यांचा बीमोड करून बडोद्यात वर्चस्व निर्माण केले.
सुनीत पोतनीस  – sunitpotnis@rediffmail.com