बर्लिन ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी म्हणजे जर्मन राज्यसंघाची राजधानी. जर्मनीची पार्लमेंट म्हणजे बुंडेनस्टाग आणि सरकारचा प्रमुख नेता म्हणजे फेडरल चान्सलर. त्यांचे मुख्यालय १९ व्या शतकाच्या अखेरीस बांधलेल्या इमारतीत, राइस्टागमध्ये भरते. बर्लिन शहर आणि उपनगरे यांचा प्रमुख प्रशासक म्हणजे गव्हìनग मेयर हाच बर्लिन प्रांताचा मुख्यमंत्रीही असतो. गव्हìनग मेयरचे मंत्रिमंडळ आठ सिनेटर्सचे असून त्यापकी एक सिनेटर हा शहराचा मेयर म्हणजे बुर्गरमिस्टर असतो. प्रशासकीय व्यवस्थेसाठी बíलन १२ बरोजमध्ये विभागले असून प्रत्येक बरोच्या प्रशासनासाठी एक निर्वाचित बरोमेयर आणि त्याला पाच नगरसेवकांचे मंडळ म्हणजे काऊन्सिल असते. बíलन शहरातील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था फेरकेअर्सफेरबुंड बेíलन-ब्राँडेनबर्ग (व्हीबीबी) या सरकारी संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी बíलन शहराचे तीन विभाग ए, बी, सी केलेले आहेत. व्हीबीबीतर्फे उ-बान आणि एस-बान या दोन नागरी रेल्वेसेवा, बससेवा, ट्रामसेवा आणि बोटसेवा दिली जाते. या सेवांपकी उ-बान ही नागरी भूमिगत रेल्वे सेवा १९०२ साली सुरू झाली. १४७ किमी लांबीच्या दहा रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या या भूमिगत रेल्वेची एकूण १७३ स्टेशन्स आहेत. जर्मनीची विभागणी झाली त्या वेळी बर्लिन शहराचीही पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली. त्या वेळी असलेल्या पाच रेल्वेमार्गापकी चार रेल्वेमार्ग पश्चिम बíलनमध्ये अंतर्भूत होते. एस-बान या जमिनीवरून धावणाऱ्या रेल्वेसेवेचे एकूण १५ मार्ग आहेत. एकूण ३३१ किमी लोहमार्गावरून धावणाऱ्या या रेल्वे सेवेची १६६ स्टेशन्स आहेत. बीव्हीजी या संस्थेच्या नियंत्रणाखाली बर्लिनची नागरी बससेवा काम करते. एकूण १३५० बसगाडय़ा १६७५ कि.मी. रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करीत असतात. हवाई वाहतुकीसाठी बíलनमध्ये टेगेल आणि श्योनेफेल्ड हे दोन विमानतळ आहेत.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
what is isis khorasan
विश्लेषण : रशियातील हल्ल्याची जबाबदारी घेणारी ‘इस्लामिक स्टेट खोरासन’ संघटना नेमकी आहे तरी काय?
Russia Moscow Terrorist attack
रशियाच्या राजधानीत ISIS चा दहशतवादी हल्ला; हल्ल्यामागे आयसिसचा नेमका उद्देश काय?

 

भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ प्रो. एम. जे. थिरुमलाचार
प्रोफेसर थिरुमलाचार यांचा जन्म १४ सप्टेंबर १९१४ रोजी मल्लेश्वरम (बंगलूरू) येथे झाला. त्यांनी बी. एस्सी. आणि एम.एस्सी. पदवी म्हैसूर विद्यापीठातून मिळविली. विषय होता मायकॉलॉजी.
डॉ. बी. बी. मुंडकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मसूर विद्यापीठाची डी. एस्सी. प्राप्त झाली. त्यानंतर अमेरिकेला जाऊन त्यांनी विस्कानसीन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. त्यासाठी त्यांचा विषय होता प्लॅन्ट पॅथॉलॉजी अ‍ॅड मायक्रोबॉयलॉजी भारतात आल्यावर सर्व प्रथम त्यांनी म्हैसूर विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम करायला सुरुवात केली. या विद्यापीठात त्यांनी सात वर्षे काम केले. त्यानंतर दोन वर्षे बनारस िहदू विश्वविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम केले. चीफ प्लॅन्ट पॅथॉलॉजीस्ट सेंट्रल पोटॅटो इन्स्टिटय़ूट, पाटणा येथे १९५० ते १९५८ या काळात काम केले. पुणे येथील िहदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स लिमिटेड या कंपनीत चीफ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम केले. निवृत्त होईपर्यंत ते त्याच कंपनीत सुपरींटेंडंट या पदावर काम करत होते.
िहदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्समध्ये त्यांनी अनेक अ‍ॅन्टिबायोटिक्सचे शोध लावले, उदा. हॅमायसीन, आरिओफुंजेन, अ‍ॅन्टिआमायबीन इत्यादी. त्यांनी राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये ३८२ शोध निबंध प्रसिद्ध केले. बुरशीच्या ३० नवीन प्रजाती आणि ३०० जातींचा शोध लावला. माणसामध्ये आणि वनस्पतीमध्ये होणारे अनेक विकार दूर करण्यासाठी त्यांच्या या संशोधनाचा उपयोग झाला.
त्यांना १९६९ मध्ये त्यांच्या कामासाठी सुंदरलाल व्होरा पदक मिळाले. त्याच प्रमाणे १९६७ साली एस. एस. भटनागर मेमोरियल अ‍ॅवार्ड फॉर ‘ऑऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन इन डेव्हलिपग थियराप्युटिकल युजफूल अ‍ॅन्टिबायोटिक्स’ मिळाले. ते आंतराराष्ट्रीय अ‍ॅन्टिबायोटिक्स जर्नल जपान याच्या संपादक मंडळाचे सदस्य होते. खालील सन्मान त्यांना मिळाले होते.
फेलो दी इंडियन अ‍ॅकॅडमी १९६६, उपाध्यक्ष इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेस १९५९. फेलो ऑफ इंडियन फायटोपॅथॉलॉजीकल सोसायटी १९६४. मेंबर बायलॉजी रिसर्च कमिटी ऑफ सी.एस.आय. आर. एडिटोरियल बोर्डाचे सदस्य ‘सायडोव्हीआ’. एनल्स ऑफ मायकोलाजी. जर्नल ऑफ इंडियन मायक्रोबायालॉजिकल सोसायटी, दोन वेळा इंडियन फायटोपॅथॉलॉजिकलचे अध्यक्ष व प्रमुख संपादक होते. १९९९ साली त्याचे अमेरिकेत निधन झाले.
– डॉ. सी. एस. लट्टू (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org