पिकावरील किडींचे नियंत्रण जैविक पद्धतीने साध्य केल्यास पर्यावरणास धोका पोहोचत नाही. शेतमालात (फुले, फळे, पाने) कीडनाशकांचे अवशेष राहात नसल्यामुळे मानवी आरोग्य बिघडत नाही. जैविक कीड नियंत्रणामध्ये भक्षक कीटक, परोपजीवी कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू, सूत्रकृमी, परोपजीवी बुरशी आणि जिवाणू, प्रोटोझोआ इत्यादी घटकांचा समावेश होतो.
नसíगक मित्रकीटक शत्रुकिडीच्या अंडी, अळी किंवा कोष यांच्या आत राहून आपली उपजीविका करतात. सध्या यासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस या गंधेलमाशीचा उपयोग होत आहे. सगळ्या प्रकारच्या अळ्यांसाठी हे कीटक उपयोगी ठरतात. क्रायसोपेरला कारनिया या कीटकाची अळी शत्रुकिडीच्या शरीरातील रस शोषून घेते. त्यामुळे कीड मरते. हे कीटक बोंडअळ्या, तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडींचा नाश करते.
काही विषाणूंचा वापर बोंड अळ्यांवर उतारा ठरला आहे. अळीच्या पोटात हे विषाणू गेल्यावर जवळपास तीन ते पाच दिवसांत या अळ्या मरतात. मागील पाय झाडाच्या फांदीला व डोके खाली या अवस्थेत अळ्या शेतात आढळतात. बॅसिलस थुरिजीएंसिस (बीटी) हा जिवाणू जमिनीत वास करणारा असून अळ्यांसाठी परिणामकारक आहे.
जैविक बुरशी किंवा जिवाणू प्रखर सूर्यप्रकाशामुळे लवकर नष्ट होतात. सध्या बीटीचा वापर करून जेनेटिक इंजिनीअरिंगच्या माध्यमातून जनुक परिवíतत पिके उपलब्ध झालेली आहेत. संशोधनाद्वारे डीएनएला वेगळे करून विविध कारणांसाठी हे वेगळे केलेले जनुक वापरतात. या जनुकांमुळे अळ्यांच्या पोटात बदल घडून त्या सहजपणे मरतात.
संकरित वाणामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर जवळपास बंद झाला. वातावरणाला हानी पोहोचत नसल्यामुळे नसíगक भक्षक कीटक नष्ट होत नाहीत, परंतु मानवी आरोग्याला धोका पोहोचू शकतो, असा स्वयंसेवी संस्थांचा दावा आहे. त्यामुळे अन्नधान्यासाठी बीटी जनुक वापरावा की नाही हे अजून सरकारने निश्चित केलेले नाही. बीटी वांगी हे प्रथम भाजीपाल्याचे पीक या पद्धतीने विकसित करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी कंपन्या प्रयत्नशील आहेत.
-डॉ. रूपराव गहूकर (नागपूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – व्हॅलेंटाइन डे- स्त्रीवादी चिकित्सा
हल्ली हे एक फॅड (?!) आहे. एकदा ही म्हणाली ‘मला नाही तर निदान रुग्णालयात तुझ्या अवतीभोवती एवढय़ा बायका असतात त्यांना तरी घेऊन जा’ म्हणून फूल घेऊन गेलो तर जो परिणाम झाला तो बघून मी मनात म्हटले किती सोपं आहे यांना पटवणं. ही प्रथा रोममधली. मुलगे आपल्या आवडतीला भेटवस्तू पाठवत असत. १४ फेब्रुवारी हा दिवस, कारण तोवर वसंताची चाहूल लागत असे. पुढे चर्चने व्हॅलेंटाइन नावाच्या धर्मासाठी हुतात्मा झालेल्या एका संताच्या नावावर हा कार्यक्रम (वाह्य़ातपणा (!) कमी करण्यासाठी) बहाल केला. हल्ली याचे लोण भारतातही आहे. एका मुलीने तिला Valentine कार्ड आले नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे छापून आले होते. निवेदिता मेनन हिचे स्त्रीवादाच्या भूमिकेतून Valentine Day वर जे भाष्य आहे ते सारांशाने उतरवतो..
‘‘दिल्ली उच्च न्यायालयाने नागरिकांचे मूलभूत हक्क कुटुंबात शिरकाव करू शकत नाहीत, कारण मग ती व्यवस्थाच कोलमडेल असे नमूद केले आहे. याचे कारण कुटुंब ही गोष्ट पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. इथे वयात आलेला पुरुष त्याच्यापेक्षा वयस्कर, अनुभवी मातेचा किंवा इतर स्त्रियांचा निर्णय केवळ लिंगसत्तेच्या बळावर फिरवू शकतो. म्हणूनच आजमितीला कुटुंब ही संस्था जुलमी आहे. ‘मृत्युदंड’ या चित्रपटात दोन बहिणी एकाच घरात दिलेल्या असतात. मोठीचा नवरा नपुंसक असतो. पुढे इतर संबंधांतून हिला दिवस जातात तेव्हा धाकटी विचारते हे मूल कोणाचं, तेव्हा ताई म्हणते हे मूल माझे आहे. या संवादानंतर चित्रपटगृहात एवढी भयाण शांतता पसरते की सर्वत्र श्वासोच्छ्वास ऐकू येऊ लागतो. हे मूल माझेच आहे असे फक्त स्त्रीच म्हणू शकते. पुरुष जनुकाच्या चाचणीवरून तेवढय़ाच खात्रीने हे माझे नाही हे सिद्ध करू शकतो. परंतु त्याचे पितृत्व या चाचणीत सिद्ध होते तेव्हा जवळजवळ खात्री पटली तरी १०० टक्के निदान होऊ शकत नाही. Valentine Day बद्दल आमचा आक्षेप असा की यातले प्रेम फक्त स्त्री-पुरुषांमधलेच असू शकते. त्याला समलिंगी आकर्षणाचा विटाळ असतो. या प्रकरणात जोडपे अनुरूप असावे लागते. पुरुष वयाने मोठा तिच्याहून थोडा उंच आणि स्वायत्त असतो त्यातच या दिवसाला भेटवस्तूने घेरले आहे. हे आधुनिक भोगवादी भांडवलशाही पुरुषप्रधान संस्कृतीचे लक्षण आहे, इथे प्रेम नसून व्यवहार होतो. धर्ममरतडांना या Valentine  चे वावडे आहे, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण त्यात स्त्रिया स्वायत्त होऊ पाहात आहेत.’’
बापरे बाप! (इथेही बापच आला) या बाईच्या डोक्यात मेंदू आहे की Computer ? मला वाटायचे मीच खोलात शिरतो, ही तर दुसरीकडून आरपार बाहेर आली.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

वॉर अँड पीस – हृद्रोगी स्त्री रुग्णांचे वाढते चिंताजनक प्रमाण
महिलांच्या शरीरामध्ये त्यांच्या प्रजननक्षम वयात एस्ट्रोजिन हे हार्मोन मोठय़ा प्रमाणावर तयार होत असते आणि हे हार्मोन हृदयविकाराला प्रतिबंध करणारे असल्यामुळे महिलांना हृदयविकार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काहीसे समजण्याकडे लोकांचा कल आहे. भारतीय महिला त्यांच्या विलक्षण कष्टकरी जीवन व प्रचंड सहनशीलतेबद्दल वेगळीच कीर्ती मिळवून आहेत. दिवसेंदिवस केवळ मोठय़ा शहरातच नव्हे तर लहानसहान खेडय़ांतही भारतीय महिलांचे शरीरातील मधला भाग खूप वाढला आहे; हे सर्वानाच माहीत आहे.
भारतीय पुरुषाला जरा धाप लागली; फांफू झाली की तो लगेच डॉक्टर वैद्य, हॉस्पिटल यांचेकडे धाव घेतो. पण आमच्या बहुसंख्य मायभगिनी आपले हृदयसंबंधी विविध लक्षणांकडे नक्कीच दुर्लक्ष करतात. पोट, नितंब, स्तन यांची बेसुमार वाढ, लिपिड प्रोफाइल तपासणीमध्ये चांगले कोलेस्टेरॉल-एचडीएल कमी होणे (ते नेहमी ४०-५० या प्रमाणात असावे ) याउलट वाईट कोलेस्टेरॉल व वजन प्रमाणाबाहेर वाढणे, आपण ‘चुरमुऱ्याचे पोते किंवा म्युन्सिपालटीचा रोडरोलर’ झालो आहे याची जाणीव; या महिलांना दुसऱ्यांनी करून द्यायला लागते. नुकतीच मुंबईमध्ये हृद्रोगग्रस्त महिलांची पाहणी करण्यात आली. आपल्याला हृद्रोग आहे हे कळूनही बहुसंख्य महिला डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. या विकाराने जगभर ८६ लाख महिला दरवर्षी अकाली दगावतात. यात भारतीय महिलांचा वाटा ३० लाख एवढा आहे. स्तनाच्या कॅन्सरपेक्षा भारतीय महिलांना हृद्रोगाचा धोका अनेकपट असतो. संबंधित स्थूल महिलांनी आपला रक्तदाब नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिन्यातून एकदा तरी तपासून घ्यावा.  वेळेवर रक्तशर्करा करावी. मांसाहार, मिठाई फाजील मिठाचे प्रमाण, शिळे अन्न, खूप गार पदार्थ कटाक्षाने टाळावेत. किमान १५ मिनिटे सकाळ-सायंकाळ चालण्याचा व्यायाम करावा. गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी,  चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंग, रसायनचूर्ण; अर्जुनारिष्ट घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २१ नोव्हेंबर
१९२९ > खुसखुशीत, नर्मविनोदी शैलीचे लेखक शंकर नारायण नवरे यांचा जन्म. सहा कादंबऱ्या, पाच ललितलेख संग्रह, २७ कथासंग्रह आणि ‘गुंतता हृदय हे’, ‘सूर राहू दे’, ‘वर्षांव’, ‘ग्रँड रिडक्शन सेल’ यांसह एकंदर १४ स्वतंत्र वा आधारित नाटके लिहिणाऱ्या शंनांनी, मुलांसाठीही दोन पुस्तके लिहिली होती. २५ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.
१९३०> नागीण, नदीपार, मामाचा वाडा या कथासंग्रहांचे लेखक ‘चारुता सागर’ म्हणजेच दिनकर दत्तात्रय भोसले यांचा जन्म.
१९५९ > कादंबरीकार राजन गवस यांचा जन्म. त्यांच्या ‘तणकट’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तर चौंडकं, भंडारभोग, कळप आदी त्यांच्या अन्य कादंबऱ्या. अनेक कथाही त्यांनी लिहिल्या आहेत.
१९६३ > निर्मळ विनोदकार, पाली भाषेचे व बुद्धकालीन साहित्याचे अभ्यासक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. चिमणरावांचे चऱ्हाट, गुंडय़ाभाऊ, वायफळांचा मळा, ओसाडवाडीचे देव, हास्यचिंतामणी, बोरी बाभळी, एरंडाचे गुऱ्हाळ आदी संग्रहांतून त्यांनी ‘विनोदी ललितकथे’चा बाज मराठीत आणला. ‘जातकांतील निवडक गोष्टी’, ‘शाक्यमुनी गौतम’ तसेच ‘बुद्धसंप्रदाय व शिकवण’ ही त्यांची अपरिचित मराठी पुस्तके!
– संजय वझरेकर