कपडे भिजवताना चमक येण्यासाठी वापरण्यात येणारा ऑप्टिकल ब्राइटनर प्रमाणाबाहेर जास्त घातल्यास किंवा हा ब्राइटनर इतर रसायनांशी संयोग पावणारा असेल तरी कपडे पिवळे पडतात. कपडे धुण्याकरिता वापरलेल्या निर्मलकात (डिर्टजट) लोहाची मात्रा जास्त असेल तर, तसेच निर्मलक आणि ऑप्टिकल ब्राइटनर एकत्र टाकले गेले तरीही कपडा पिवळा पडतो. ओल्या कपडय़ावर इस्त्री केल्यास, निर्मलकात जास्त प्रमाणात आम्लारी असल्यास, पाणी कठीण असल्यास कपडे पिवळे पडतात. अतिशय मळलेला कपडा इतर नेहमीच्या कपडय़ाबरोबर एकत्र भिजवला जाऊन धुवायला गेला तर काळपट पिवळे डाग पडतात, ते निघायला अवघड असतात. पांढऱ्या कपडय़ावर रंगीत बॉर्डर असेल तर किंवा पांढरे व रंगीत कपडे एकत्र धुतल्यास त्या रंगाचा परिणाम होऊ शकतो किंवा कपडे पिवळे/ काळपट पडू शकतात. नीळ जास्त प्रमाणात वापरल्यास तसेच चिखलाचे डाग कपडय़ावर पडल्यासही कपडे पिवळे पडतात. घामाने भिजलेले कपडे फार वेळ न धुतल्यास, खाण्याचे पदार्थ कपडय़ावर सांडल्यास किंवा रक्ताचा डाग कपडय़ावर पडल्याससुद्धा कपडे पिवळे पडू शकतात.
या खेरीज घाम येऊ न देण्याची रसायने वापरणाऱ्या व्यक्तींचे कपडे पिवळे पडू शकतात. तसेच सुगंधी फवारा कापडावर राहिल्यासही कपडे पिवळे पडू शकतात. याकरिता हे कपडे अंगावरून काढल्याबरोबर लगेच धुवावेत म्हणजे कपडे पिवळे पडण्याचा धोका कमी करता येतो. या सर्व बाबी लक्षात घेता निर्मलक, नीळ, ऑप्टिकल ब्राइटनर इत्यादी सर्व चांगल्या दर्जाचे आणि योग्य प्रमाणात वापरले पाहिजेत. रंगीत व पांढरे कपडे एकत्र भिजवू किंवा धुऊ नयेत. कठीण पाण्याचा वापर कपडे धुवायला करू नये. कपडय़ानुसार योग्य प्रकारे इस्त्री करायला हवी. खूप मळलेले कपडे आणि नेहमीच्या वापराने मळलेले कपडे एकत्र धुऊ नयेत. तसेच स्प्रेच्या वापरानंतर कपडे लगेच धुणे कधीही चांगले, म्हणजेच अशी काळजी आपण घेतली तर आपले कपडे पिवळे पडण्यावर नियंत्रण आणू शकतो. कोणताही डाग पडल्यास ताबडतोब त्या कपडय़ाची धुलाई केली तर बऱ्याच वेळा हे डाग निघून जातात, याकडेही लक्ष द्यायला हवे.

विजय रोद्द (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

 
संस्थानांची बखर

नबाब वाजिदअली शाह

फेब्रुवारी १८५६ मध्ये अवध संस्थानाचा नवाब वाजिदअली शाह याला पदच्युत करून कंपनी सरकारने संस्थान खालसा केले. लहानपणापासूनच जनानखान्यातील ऐषोआरामात वाढलेल्या वाजिदला सुखोपभोगाच्या सवयी लागल्या होत्या. वाजिदअली त्याच्या दुर्दैवाने १८४७ साली अशा काळात नवाबपदी आला, की जेव्हा कंपनी सरकारने संपन्न, सुपीक अवध राज्य हडप करण्याचा बेत नक्की केला. लहानपणापासूनच नृत्य, संगीताची आवड असलेला वाजिद नवाबपदी आल्यावर कारभारात, प्रशासनात लक्ष घालण्याऐवजी सुंदर स्त्रिया, गायनवादनपटू, विनोदकुशल खुशमस्करे आणि नर्तक-नर्तकी, गायन-नर्तनाच्या मफलींमध्ये दंग राहू लागला. एक कर्तव्यशून्य राज्यकर्ता अशी ओळख असणारा वाजिदअली एक महान संगीतकार आणि नर्तक, तसेच नर्तक आणि संगीतकारांचा आश्रयदाता म्हणूनही ओळखला जातो. शास्त्रीय िहदुस्थानी गायकीचे शिक्षण घेतलेल्या वाजिदने ठुमरी गायन प्रकाराला शास्त्रीय गायनाचा दर्जा देऊन अनेक सुधारणा केल्या आणि हा गायन प्रकार लोकप्रिय केला. ‘अख्तप्रिया’ या टोपणनावाने चाळीस बंदिशी रचल्या. दीवान-ए-अख्तर आणि हुस्न-इ-अख्तर या काव्यसंग्रहांमध्ये त्याने रचलेल्या ठुमऱ्या आणि ग्मजम्ला संग्रहित आहेत. वाजिदअलीच्या दरबारात संगीत आणि नृत्याचे जलसे रोज भरविले जात. िहदुस्थानी शास्त्रीय गायकीतील ‘जोगी’ आणि ‘शाहपसंद’ या रागांचा निर्माता वाजिदअलीच आहे. या काळात कथ्थक नृत्याच्या साथीला ठुमरी गायनाची पद्धत होती. स्वत: कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतलेल्या वाजिदने या नृत्यशैलीत अनेक सुधारणा करून विकास केला. त्याने स्वत: रचलेल्या काव्यांवर नृत्यनाटिका बसविल्या. वाजिदच्या काळात लखनऊ हे भारतातील महत्त्वाचे संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक केंद्र बनले. अनेक महान गायक, नर्तक कलाकारांची लखनऊमध्ये ये-जा चालत असे.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com