‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! आई मला नेसव शालू नवा॥’
जरीचा उपयोग कुठे आणि कशासाठी करायचा? हे वरील लावणीत ठळकपणे सांगितले आहे. विशेष प्रसंगी वापरायची वस्त्रे जसे शालू, शेले, पठण्या, पितांबर आदी वस्त्रप्रावरणे सुशोभित करण्यासाठी जरीचा उपयोग केला जातो. अशा उपयोगाची भारतामध्ये किमान दोन हजार वर्षांची परंपरा आहे.
ज्याच्यापासून तार काढता येते अशा धातूपासून तलम, अखंड तंतू काढता येतो. असा तंतू कापसाच्या अथवा रेशमाच्या सुताभोवती गुंडाळून जरीची निर्मिती केली जाते. फुलांचे हार सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येणारी कलाबूत हा जरीचाच एक स्वस्तातला प्रकार आहे.
या कलेचा उगम भारतातच झाला असावा असे संशोधकांचे मत आहे. आठव्या-नवव्या शतकात बनारस व पठण ही शहरे या कामासाठी प्रसिद्ध होती. भारतातून मध्य-पूर्व आशियामाग्रे ही कला युरोपात पोहोचली. चौदाव्या शतकानंतर इटली हा देश या कामात अग्रेसर ठरला. जर निर्मितीची जुनी प्रक्रिया अंगमेहनतीवर व कौशल्यावर अवलंबून होती. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे स्वयंचलित यंत्रांचा शोध लागला आणि जरीचे उत्पादन वाढवणे शक्य झाले.
सोने, चांदी यांच्या वापरामुळे खऱ्या जरीचे कापड श्रीमंतच वापरू शकत होते. सामान्यांकरता नकली जर निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात पितळ, अ‍ॅल्युमिनियम इत्यादींचा वापर केला जातो. प्लास्टिकच्या उदयानंतर नकली जरीमध्ये प्लास्टिक जरीची भर पडली.
खऱ्या आणि नकली जरीचा उपयोग वस्त्रप्रावरणे सुशोभित करण्यासाठी केला जातो. किनारी, बुट्टे, पदर यांमध्ये जर वापरून कपडय़ाची शोभा वाढवली जाते. जरीचे प्रमाण खूप वाढल्यास ते वस्त्र वापरायला अडचणीचे ठरू शकते. उशांचे अभ्रे, गृहसजावटीचे पडदे, पस्रेस यांसारख्या वस्तूंमध्येही जरीचा वापर केला जातो. आज भारतात सुरत आणि बनारस ही शहरे जर निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत. सुरतमध्ये हा उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून त्यात यांत्रिक पद्धतींचा वापर अधिक होतो.

संस्थानांची बखर : रीवा संस्थानाची स्थापना
सध्या मध्य प्रदेशात ईशान्येकडे असलेले, अलाहाबादच्या दक्षिणेस १३० कि.मी.वर स्थित रीवा हे शहर स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध रीवा संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते. ३३,७०० चौ.कि.मी.चे विशाल राज्यक्षेत्र असलेल्या संपन्न रीवा संस्थानाला ब्रिटिश राजवटीने १७ तोफसलामीचा बहुमान दिला होता. अलीकडची रीवाची प्रसिद्धी दोन कारणांमुळे. रीवाला लागूनच असलेले पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध बांधवगड अभयारण्य आणि प्रसिद्ध सतारवादक रविशंकर यांचे जन्मस्थान म्हणून!
 मोगल बादशाह अकबर याच्या दरबारातील नवरत्नांपकी महान गायक तानसेन आणि मुत्सद्दी बिरबल हे दोघे रीवा संस्थानातूनच अकबराने नेले होते. गुजरातमधील वाघेला घराण्याच्या राज्यकर्त्यांची राजधानी अनहीलवाडा अल्लाउद्दीन खिलजीने उद्ध्वस्त केल्यामुळे वाघेलांची अनेक कुटुंबे बांधवगड येथे स्थायिक झाली. त्यापकी करणदेव याला लग्नात बांधवगड हे गाव हुंडा म्हणून मिळाले.
पुढे करणदेवने रीवा हा परगाणा घेऊन आपले छोटेसे राज्य स्थापून बांधवगड येथे राजधानी केली. पुढे मोगलांनी बांधवगडावर आक्रमण करून वाघेलांचा किल्ला हस्तगत केल्यामुळे तत्कालीन राजा विक्रमादित्य याने रीवा येथे आपल्या राज्याची राजधानी केली.
मराठे आणि िपढारी यांचे हल्ले आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या खंडणीमुळे बेजार होऊन रीवा शासक राजा मरतडसिंग याने १८१२ साली ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षण करार केला.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
man dies while smile surgery
मोहक हास्यासाठी केलेली शस्रक्रिया बेतली जीवावर; विवाहाआधी वरानं गमावले प्राण!
Ayurveda for Diabetes
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या