एखादं पीक जेव्हा वाया जातं तेव्हा सर्वसाधारणपणे शेतकरी दोन मार्ग स्वीकारतात. एक म्हणजे पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे किंवा ते पीक घेणंच बंद करणे. पण असेही काही शेतकरी आहेत की जे त्या समस्येच्या अगदी मुळापर्यंत पोहोचतात आणि त्या समस्येवर तोडगा काढतात. गुजरातचे धीरजलाल विरजीभाई थुम्मर हे अशाच काही प्रयोगशील शेतकऱ्यांपकी एक.
२००४ सालची गोष्ट. धीरजलालनी आपल्या शेतात ‘जीजी-२०’ जातीच्या भुईमुगाची लागवड केली होती. भुईमूग हे या भागातलं प्रमुख पीक. २००४ साली भुईमुगावर रोग पडला आणि त्यामध्ये धीरजलाल यांचं संपूर्ण पीक अक्षरश: नष्ट झालं. पण इतर शेतकऱ्यांप्रमाणे धीरजलाल खचून गेले नाहीत. रोग पडलेल्या पिकाचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर त्यांना अशी काही रोपं आढळली की ज्यांच्यावर या रोगाचा कोणताही परिणाम झालेला नाही. ही रोपं चांगली राहिली याचा अर्थ रोगावर प्रतिकार करण्याची शक्ती या रोपांमध्ये आहे, हे त्यांनी ओळखलं.
धीरजलालनी मग चांगल्या रोपांपासून मिळालेली बियाणं पुढच्या हंगामात पेरून त्यापासून रोगाला प्रतिबंध करणारी आणखी रोपं मिळवली आणि त्याची बियाणं पुढच्या हंगामात पेरली. अशा प्रकारे सतत तीन वष्रे हा उद्योग धीरजलालनी केला आणि शेवटी रोपांवर पडणाऱ्या बुरशीला प्रतिबंध करू शकेल असं बियाणं मोठय़ा प्रमाणात मिळवण्यात त्यांना यश आलं.
या बियाणांची चाचणी प्रत्यक्ष शेतात व्हावी यासाठी धीरजलालनी हे बियाणं सौराष्ट्रातल्या अमरेली, राजकोट आणि भावनगर जिल्ह्य़ातल्या शेतकऱ्यांना वाटलं. या शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया खूपच चांगल्या होत्या. कारण धीरजलालनी दिलेल्या बियाणांमुळे चांगलं उत्पादन आलं होतं.
हे बियाणं आता ‘धीरज- १०१’ या नावाने ओळखलं जातं. या बियाणांपासून ९५ ते १०५ दिवसांत पीक तयार होऊन प्रत्येक रोपाला सुमारे ३० ते ४० शेंगा लागतात आणि प्रतिहेक्टर सुमारे तीन ते साडेतीन हजार किलो इतकं उत्पादन मिळतं. बुरशी, तांबेरा या रोगांना प्रतिबंध करणारी आणि जास्त उत्पादन देणारी भुईमुगाची ही जात म्हणजे धीरजलाल यांच्या प्रयोगशील वृत्तीचं फलित आहे.  

वॉर अँड पीस     वातविकार : भाग २
लक्षणे- धातुक्षय – अतिरुक्षता, शोष, ग्लानी, श्रम, शब्द, सहन न होणे; शिराशैथिल्य, इंद्रियदौर्बल्य, सांधेदुखी, मांसक्षय, कंबर बधिर होणे, पांथरी वाढणे, अस्थिशूल; दात, केस, नखे विकृती व क्षय, पोकळ हाडे, चक्कर, वृषण वेदना, वीर्यक्षीणता. (२) उदरवात –
पोट फुगणे, अन्न पुढे न सरकणे, ढेकरा न येणे. (३)अंगमर्द – अंग जखडणे, आळसावणे, तापाची भावना. (४) मानेचे विकार – हाताला मुंग्या येणे, मान जखडणे, हात व मानेच्या थोडय़ाशा हालचालीने मानेला सूज, चक्कर. (५) कंपवात – सुरुवातीस हात किंचित कापणे, पुढे हळूहळू कळत न कळत कंप वाढणे. मानसिक, शारीरिक क्षोभाने कंपवात वृद्धी. (६) अर्दित – अर्धे तोंड, बोलणे, हसणे, पाहणे यांत वाकडेपणा, बोलताना अडखळणे, एका बाजूने लाळास्राव, एक डोळा मिटणे, एक उघडा राहणे, पाणी पितांना एक बाजूने बाहेर येणे. (७) वातकंटक – मुरगळलेल्य जागी अनियमित आकाराची सूज. (८) मुंग्या येणे – मुंग्या, बधिरपणा, संबंधित अवयव शिवशिवणे.
कारणे –  (१)धातुक्षय  – सातही धातूंचे पोषण करणाऱ्या पदार्थाच्या वापराऐवजी धातूक्षय करणाऱ्या पदार्थाचे अतिरेकी सेवन; मेदक्षय असताना थंड, रुक्ष आहारविहार. (२) उदरवात – भूक मंद असणे, जेवणावर जेवण, भूक नसताना जेवणे, बैठे काम, फाजील झोप, दुपारी झोप, गोड, थंड, तेलकट, तूपकट पदार्थाचे अतिरेकी सेवन. (३)अंगमर्द – फाजील श्रम, गार हवेत दीर्घकाळ वावरणे, विश्रांतीचा अभाव, तहान मारणे. (४) मानेचे विकार – ताकदीच्या बाहेर ओझे उचलणे, लिखाण, टायपिंगसारखे काम, उंच उशी. (५) कंपवात – अति मानसिक ताण, विचार, चिंता, श्रम; मानसिक क्षोभ, चुकीची औषधे. (६) अर्दित – मोठे ओझे, अतिहस्य, भीती, तोंडातून शिंक, शिंक अडविणे, उंच सखल उशी, कठीण पदार्थ चावणे, वातवृद्धी कारणे. (७)वातकंटक – घात अपघात अशी आगंतुक कारणे. (८) मुंग्या येणे – कफ, वायू बिघडवणारी कारणे, थंड हवा, थंड खाणे पिणे, अतिरेकी खाणे, स्थौल्य.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
What should be carefully considered while taking a car loan
Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

आजचे महाराष्ट्रसारस्वत   २४ जून
१८९२ > रविकिरण मंडळाच्या संस्थापकांपैकी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. ‘काळाच्या दाढेतून’ हे खंडकाव्य तसेच कवयित्री-पत्नी मनोरमा यांच्यासह ‘श्रीमनोरमा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध. ‘महाराष्ट्र रसवंती’ आणि ‘महाराष्ट्र गद्यवैभव’ या संग्रहांचे संपादन त्यांनी केले. कैक वर्षे पुणे आकाशवाणीच्या ‘गंमत जंमत’ कार्यक्रमातील ‘तिंबूनाना’ या भूमिकेतून रानडे यांनी मुलांचे मनोरंजन. तेथे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे ‘तिंबूनानांचा रेडिओ’ हे पुस्तक झाले. रानडे यांचे निधन १९८४ मध्ये झाले.
१९१४ > वासुदेव गणेश टेंबे तथा टेंबेस्वामी (वासुदेवानंद सरस्वती) यांचे निधन. त्यांनी वेदोक्त धर्म तसेच दत्तोपासना या विषयांवर मराठीत लिखाण केले होते.
१९७१ > लेखक, समीक्षक आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख माधव गोपाळ देशमुख यांचे निधन. ‘मराठीचे साहित्यशास्त्र’ हा प्रबंध पुस्तकरूप झालाच, शिवाय ‘भावगंध’, ‘वाङ्मयीन व्यक्ती’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. राज्यघटनेचे मराठी भाषांतर करण्याच्या समितीत ते होते. सीतास्वयंवर,  कवी दत्तात्रेय घाटे ऊर्फ दत्त यांची समग्र कविता अशी महत्त्वाची संपादनेही त्यांनी केली.
संजय वझरेकर

जे देखे रवी..      मोबदला
‘कायद्याचे बोला’ किंवा ‘काय द्यायचे ते बोला’ ही दोन वाक्ये खूप काही सांगतात. प्रत्येकाला मोबदला हवा असतो. कायदा पाळला तर मोबदला कमी होतो, असे हल्लीचे गृहीतक आहे. पण ही कल्पना फार जुनी आहे आणि प्रत्येक श्रीमंत माणसाने कोठला तरी कायदा मोडलेला तरी असतो किंवा वाकवलेला तरी असतो. फारच श्रीमंत असेल तर तो माणूस स्वत:च सोयीस्कर कायदे बनवितो आणि हे जगात सर्वत्र चालते.
अशी एक गोष्ट सांगतात की, जर एके दिवशी जगातले सगळे पैसे सम प्रमाणात सर्वत्र सारखे वाटले गेले तरी २४ तासांत ते समसारखे राहत नाही. एक दुसऱ्याला सांगतो, ‘तुझा रुपया मला महिन्याभरासाठी दे. मी तुला एका महिन्याने दीड रुपया देईन.’ कधी देणारा तर कधी घेणारा बुडतो आणि विषमता पसरते. घेणाऱ्याची आणि देणाऱ्याची एक मनोवृत्ती असते, त्याला स्वभाव म्हणतात. तो आपल्या शरीराला चिकटूनच जन्म घेतो. या स्वभावाला परिस्थितीचा सदरा असतो. त्यामुळे स्वभाव उठून दिसतो किंवा मरगळल्यासारखा भासतो, पण देवाण-घेवाण पोषण आणि शोषण काही थांबत नाही. याने मन विषण्ण होते.
 वैयक्तिक आयुष्यातली चढ-उतार आणि अवतीभोवती पसरलेली जीवघेणी स्पर्धा सगळेच सारख्याच तऱ्हेने सहन करू शकत नाहीत आणि मग पहिल्यांदा अर्जुन जन्मतो आणि मग श्रीकृष्ण पदार्पण करतो. प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर देणारा कसा निर्माण होणार? अर्थात या प्रश्नोत्तरांवर पिढय़ा पोसल्या जातात. मोबदला असतोच आणि असणारच. त्याचे तर्कट काय आहे आणि त्यातून निराश न होता बाहेर कसे पडायचे याचे उत्तर ज्या तऱ्हेने वैदिक विचारधारेने दिले, त्याला तोड नाही आणि हे उत्तर उत्क्रांत होत होत मिळाले आहे. यज्ञात गहू टाकले तर भरपूर पीक येईल किंवा बोकड कापला तर पशुवृद्धी होईल या जुन्या यज्ञाच्या कल्पना होत्या. अज्ञानाचे तूप जीवन नावाच्या यज्ञात जाळून टाक असे बहारदार विधान ज्ञानेश्वरांनी केले आहे. अज्ञान ही भानगड काय आहे? अज्ञान माणसाला हे विसरायला लावते की माणूस विश्वनिर्मितीच्या ओघात तयार झालेले एक कर्म आहे. हे कर्म चालते-बोलते आहे. हुशार किंवा चतुर आहे, पण शहाणे असेलच असे नाही. एक शहाणी ओवी म्हणते :
कर्म म्हणजे आपणच। असे जो उमगतो।
 तो येणार तरी कसा। कर्माच्या घेऱ्यात।।
एक थोडीशी कुरूप कालबाह्य़ ओवी म्हणते :
कुष्ठरोग्याच्या जखमांवर। घोंघावत माशा।
त्यांना देतो तो शिव्या। असा तो असहाय्य त्रागा।।
त्या काम्य कर्माच्या जखमेबद्दल उद्या.

 रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com