शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये विकरं असतात. विकर पेशीतल्या वेगवेगळ्या अभिक्रिया घडवून आणतात. विकरं ही एक प्रकारची प्रथिनंच असतात. ती खरं तर स्वत: कुठल्याच अभिक्रियेत भाग घेत नाहीत; पण त्यांच्या केवळ अस्तित्वामुळे अभिक्रिया जलद गतीने घडते. रसायनशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर विकरं ही उत्प्रेरकाचं काम करतात.
प्रत्येक विकराचं कार्य अधिकतम वेगाने घडून येण्यासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. आपल्या पचनसंस्थेत आणि शरीरातल्या पेशींमध्ये कार्यरत असणारी विकरं आपल्या शरीराच्या सामान्य तपमानालाच अधिकाधिक कार्यक्षम असतात. एका विशिष्ट तापमानाच्या पुढे विकरांच्या संरचनेत बदल घडून येतात आणि साहजिकच त्यांचं कार्य थांबतं. आपल्या शरीराचं तापमान जर १०८ अंश फॅरेनहाइटपर्यंत वाढलं तर पेशींमधली विकरं अकार्यक्षम होतात आणि म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताप आला तर त्या व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो.
काही प्रकारची विकरं मात्र जास्त तापमानातसुद्धा कार्यक्षम असतात. उदाहरणार्थ, गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये जे जिवाणू आढळतात, त्यांच्यात असणारी विकरं ८० अंश सेल्सिअस तापमानातसुद्धा कार्यरत राहू शकतात. इतक्या जास्त तापमानात जिवाणू  जिवंत राहण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण आहे.
आपण जेव्हा एखादा अन्नपदार्थ जास्त तापमानाला गरम करतो तेव्हा त्यातल्या सूक्ष्मजीवांमध्ये असलेली विकरं उच्च तापमानाला नष्ट होतात. परिणामी, अन्नपदार्थ दूषित होण्यास कारणीभूत असणारे जिवाणू मरतात आणि अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यामागेसुद्धा नेमके हेच कारण आहे. फ्रिजमधल्या अतिशय कमी तापमानामुळे पदार्थामध्ये असलेल्या जिवाणूंमधील विकरांची अभिक्रिया मंदावते आणि त्यामुळे जिवाणूंच्या अन्नपदार्थ दूषित करण्याच्या प्रक्रियेला आळा बसतो, मात्र जेव्हा हे पदार्थ फ्रिजबाहेर ठेवल्यावर सामान्य तापमानाला येतात तेव्हा त्या तापमानाला सूक्ष्मजीवांमधली विकरं कार्यक्षम होतात आणि पदार्थामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांची प्रक्रिया सुरू होते.    
विकरं कार्यक्षम असण्यासाठी तापमानाप्रमाणेच आणि ठरावीक तीव्रतेच्या आम्ल किंवा अल्कली माध्यमाची गरज असते. उदाहरणार्थ, आपल्या जठरातली विकरं १.५ ते २.० सामूच्या आम्लतेला कार्यरत असतात, तर लहान आतडय़ातली विकरं अल्कधर्मी सामूला कार्य करतात.

प्रबोधन पर्व: लोकांना धर्मासोबत जोडून ठेवण्याची पात्रता नसलेला समाज
‘‘या व्यवहारी जगात आपल्या समाजाला एका आदर्श समाजासारखे उभे राहिले पाहिजे. पवित्रता, आत्मज्ञान, वेदांताचे तत्त्व यांचा संपूर्ण विश्वात प्रसार करून, संपूर्ण विश्वाला अंतिम सत्याच्या अनुभूतीच्या उद्देशाने प्रशिक्षित करणे, हे आपले जीवनोद्देश्य आहे. या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपल्याला आपले जीवन बनवले पाहिजे. आपल्या जीवनोद्देशाला साजेशी आपली प्रतिष्ठा बनली पाहिजे. जर आपण असे करणार नसू, तर मग आपल्या अस्तित्वाचा विश्वाला काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत आपण एका विशाल, शक्तिशाली, शिस्तबद्ध स्वरूपात संघटित होणार नाही, तोपर्यंत आपण या विश्वात सन्मान प्राप्त करू शकणार नाही.’’
गोळवलकर गुरुजी (श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड-दोन) परकीय आक्रमणांविषयी म्हणतात – ‘‘आपल्या धर्मातून लोक बाहेर गेले याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे परकीय आक्रमकांनी त्यांना स्वत:च्या धर्मात खेचले, आणि त्याचे दु:ख न मानता हे लोक त्यांच्यात सामील झाले. त्यांनी या आक्रमकांचे कूळ स्वीकारले आणि त्यांच्यासोबत नाते जोडले. आणि दुसरे कारण म्हणजे, लोकांना आपल्या धर्मासोबत जोडून ठेवण्याची आपल्या समाजाने पात्रता ठेवली नाही. कित्येक लोक आपल्या धर्मातून चालते झाले, आणि आम्ही मुकाटपणे ते पाहत बसलो, काही सुधारणा नाही केल्या. हे बाह्य़ आणि आंतरिक आक्रमणाचे स्वरूप पाहून दु:ख होते की नाही? हृदयात वेदना होतात की नाही? जर संवेदना असतील तर जरूर वेदनाही होतील. भूमी तथा समाजाचा असा भयंकर ऱ्हास समाजकार्य करण्याची पुरेशी प्रेरणा देणार नाही. राष्ट्रजीवनाच्या धारणेची शिथिलता हे परकीय आक्रमणाला साहाय्यभूत होणाऱ्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. स्वार्थापायी आम्ही भूतकाळात केवळ आपापसात संघर्षच नाही केले, तर मदतीसाठी लाचारपणे परकीयांना बोलवण्यासाठी सुद्धा संकोच केला नाही. आपण आपल्या मातृभूमीवर संकटाला आमंत्रण देतो आहे, याचा सुद्धा आपण (पूर्वजांनी) विचार केला नाही. राष्ट्रभक्तीहीन, परस्पर संघर्षरत, असंघटित, छिन्न-विच्छिन्न समाजजीवन याचे कारण आहे.’’

मनमोराचा पिसारा: तुम अगर भूल भी जाओ..
लुधियानाच्या साहिरच्या गाण्यांच्या कविता कधी होतात, हे गाणं ऐकताना कळतही नाही. प्रत्येक गाण्यात एक विचार असतो, दृष्टिकोन असतो आणि मानवी स्वभावाच्या अव्यक्त पैलूचा आविष्कार असतो. उदाहरणं द्यायला लागलं तर शब्द पुरणार नाहीत एवढंच म्हणून १९५९च्या ‘दीदी’ नावाच्या चित्रपटातलं ‘तुम अगर भूल भी जाओ, तो ये हक है तुम को..’ हे सुधा मल्होत्रा आणि मुकेश यांचं गाणं घ्या. संगीताचा साज खुद्द सुधा मल्होत्रा यांचा आहे. पडद्यावर म्लान चेहऱ्याची शुभा खोटे दिसते. पूर्वीच्या चित्रपटात हटकून दिसणारी दृश्याची एक क्लृप्ती आहे.
शुभाबाई आपल्या निश्चयावर ठाम राहून गाणं म्हणतात, तर सुनील दत्तची प्रतिमा मस्तपैकी सूट घालून कधी जलाशयाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तर कधी आकाशात विहरताना दिसते. हे सोडून चित्रीकरणाबद्दल खास नाही.
साहिरनं या गाण्यात दोन स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत. रूढीप्रमाणे स्त्री बांधीलकी मानणारी, संवेदनशील आहे आणि पुरुष कर्तव्यकठोर, तर्कशुद्ध विचार करणारा आहे. तसं म्हटलं तर दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. नायिका म्हणते, मी तर स्वत:ला तुझ्या प्रेमात झोकून दिलंय, माझं स्वत्व सोडून तुझ्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले आहे.
तुझ्यावर मला प्रेम करायला मिळतंय, तुझ्यावर जीव ओवाळून टाकायचं भाग्य मला लाभलंय, यात मी समाधानी आहे असं नाही पण हे संधी मिळालीय याने मी धन्य झालेय. म्हणजे प्रेमातल्या समर्पणाची इतकी अत्युच्च उंची तिने गाठलीय की आपल्या प्रेमाची परतफेड तो करू शकत नाही, हे ती समजून घेत्येय. इतकंच नाही, तर माझ्यावर तू तसंच (किंवा कसंही) प्रेम केलं नाहीस, तर तसं वागायचा तुला हक्क आहे, हे मी मानते आणि स्वीकारते.
प्रेम म्हणजे परस्परांना प्रेमरज्जूंनी बांधून ठेवणं नसून, प्रेम म्हणजे बंधनातून मुक्ती, स्वातंत्र्य! अजब वाटतं ना!!
हे म्हणत असताना नायिका दु:खी आहे. कारण हे तिचं पहिलंच निरागस प्रेम असावं. ती दु:खानं विव्हळत नाहीये. हळूहळू या अवस्थेतून ती सावरेल, असं वाटतं.
नायक जरा त्यामानानं बापुडा वाटतो. दालरोटीका भाव त्याला कळलाय. आपल्यावर सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आहे या जाणिवेनं, कर्तव्यभावनेनं तो तिच्या प्रेमाला स्वीकारत नाहीये. तुझी जुल्फे, तुझ्या नर्म गालांवर खुली आहेत, तोच केवळ स्वर्ग नाही याची जाणीव त्याला आहे.
सुधाजींचा आवाज हा त्या गाण्याचा आत्मा आहे. कोवळ्या चंद्रासारखा आवाज आहे. त्यावर विपण्णतेचे डाग आहेत. पण खूप समज आहे. त्या काळातल्या तीक्ष्ण मुस्लीम (शमशाद) आवाजाला टक्कर देण्याची मनस्वी उत्स्फूर्त आर्तता त्या आवाजात आहे. हल्लीच्या स्टाइलमध्ये म्हणायचं तर सुधाजींकरता और तालियाँ..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com