बरेचसे शोध एखादी गोष्ट तयार होत असताना केलेल्या बदलामुळे किंवा कित्येकदा तर त्यात होणाऱ्या बिघाडामुळे लागत असतात. तसं शॅम्पेन या वाइन प्रकाराचं झालं. फ्रान्सच्या एपन्रे शहरातील शॅम्पेन परगण्यात एका क्लितो आडनावाच्या बाईने वाइन बनवून विकायला नेली. बाटल्यातल्या वाइनमध्ये काही साखर उरली असावी. बाटलीत भरल्यावर वाइनमध्ये असलेल्या वाइनचं परत किण्वन (मेर्टेशन) सुरू झालं. या किण्वन प्रक्रियेमुळे तयार झालेला कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या जोरानं बाटल्या फुटल्या. तेव्हा क्लितोनं भरलेली एक बाटली पिऊन बघण्यासाठी ग्लासमध्ये ओतली. त्या वेळी तळापासून हलके हलके हवेचे बुडबुडे वर येताना दिसले. सेडिमेटमुळे काहीशी गढूळ झालेली वाइन त्यातल्या कार्बन डाय ऑक्साइडमुळे तोंडात मिरमिरणारी चव देत होती आणि एकूणच छान लागत होती. या फसफसणाऱ्या नवीन वाइनला तिने तिच्याच परगण्याचं नाव दिलं शॅम्पेन .
पहिल्यांदा झालेल्या श्ॉम्पेनमध्ये बाटलीत किण्वन प्रक्रिया झाल्याने सेडिमेंट बाटलीतच राही आणि शॅम्पेन ओतायला लागल्यावर त्यातल्या कार्बन डाय ऑक्साइडच्या हालचालीमुळे खालच्या भागातली शॅम्पेन त्या गाळ्याशी मिसळून गढूळ होऊन जाई. आत साचलेला कार्बन डाय ऑक्साइड निसटून जाऊ द्यायचा नाही, पण गाळ काढायचा. ही क्रिया एकाच क्षणात व्हायला हवी असते. याला डिसगॉर्जिग म्हणतात. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार या बाटल्या उलटय़ा करून काही काळ ब्राइनमध्ये ठेवल्या जात. त्यामुळे त्यांच्या तोंडाशी असलेली वाइन आणि जमा झालेलं सेडिमेंट थंडपणानं गोठून जातं. उलटय़ा झालेल्या वाइनच्या बाटलीतला वायू कार्बन डाय ऑक्साइड वर जातो. त्या बाटलीचा तोंडाकडचा भाग गोठलेला असतो, त्यामुळे डिसगॉर्जिग करणाऱ्याला भरपूर वेळ मिळतो. त्यानंतर ते बूच आतल्या गॅसच्या दाबामुळे उडून जाऊ नये म्हणून ते तारेनं घट्ट फिरवून बसवलं जातं. हे सर्व होईतो, सर्वच बाटल्यांमधल्या शॅम्पेनची पातळी सारखी राहात नाही. ते लक्षात येऊ नये आणि बुचाला गुंडाळलेली तारेची गाठ दिसू नये म्हणून त्यावर बसवली जाणारी अ‍ॅल्युमिनिअमची टोपी वाजवीपेक्षा खालवर घेतली जाते. विव्ह क्लितो या नावानं शॅम्पेन बाजारात आली. त्यानंतर डॉम पेरिनो, मोये शँडन हे निराळ्या कंपन्यांचे ब्रँड आले आणि रसिकांच्या पसंतीला पडले.

मनमोराचा पिसारा: सत् चित् आनंद
तुझ्याशी गप्पा गोष्टी करून, मनाच्या गजाली सांगून इतकं मस्त, शांत आणि फुल ऑफ एनर्जी वाटतं म्हणून सांगू! व्यक्त केल्याखेरीज आपले विचार आणि भावभावना सुस्पष्ट होत नाहीत. दुसऱ्यासाठी नाही, आपल्याच आपल्याला हे कळलं. तू बरोबर असलास ना की मला कोणाची कंपनी लागतच नाही.
परवा विचार करता एक कल्पना लक्षात आली. आपण आयुष्यभर जगतो ते काही तरी मिळवण्यासाठी! होय की नाही? पैसा अडका, धनसंपत्ती, चार सोईच्या आणि दोन चैनीच्या गोष्टी मिळवण्यासाठी. नि मिळालेल्या टिकवण्यासाठी! म्हणजे काही तरी कमावलं, मालकीच झालं की सुरक्षित वाटतं. असं आपण नेहमी म्हणतो. अगदी इस्टेटीसारख्या गोष्टी नाही तर विशिष्ठ व्यक्ती, मित्र, प्रियकर/प्रेयसी-जोडीदार आपल्याकडे असावा, आपण ‘पझेस’ करावा असं वाटतं. अमुक एक कमावलं की सुटलो बुवा असं आपण म्हणतो.
असा विचार करताना लक्षात आलं की ते फास्प क्षणिक असतं. एखादी गोष्ट कमावल्याचा आनंद नि समाधान टिकत नाही रे. कमावलेलं हातातून निसटेल का? आपल्यापासून हिरावून घेतलं जाईल का या विचारानं मन पोखरून निघतं. काही तरी ‘पझेस’ करण्याचा आनंद क्षणिक ठरतो हेच खरं.
वाटलं हे सारं नश्वर आहे असं आकांत करून सत्संगातले बुवा सांगतात. तेव्हा पटत नाही. कारण तसल्या टीव्हीवरच्या गुरुंकडून ऐकलं की त्यांच्या इतकंच खोटं वाटतं. आपलं भाषण विचार करून शोधून काढलं की विसरतही नाही. आता पुढचा विचार मनात, एखादं चांगलं काम करून, आपलं कर्तव्य पार पाडून आनंद मिळेल का, नक्कीच, हो नक्की! प्रत्यक्ष कृती करून समाधान मिळतं, ते खरं! डुईंग इज बेटर दॅन हॅविंग! कदाचित ज्ञानप्राप्तीचं काम करीत राहिलं तर त्यातून अखंड आनंद मिळेल. आपल्या कामाचा नि ज्ञानाचा इतरांना उपयोग होईल, त्यातून मिळणारं समाधान नि आनंद नक्कीच उच्च दर्जाचा. यात शंका नाही, असं म्हणता म्हणता लक्षात आलं की या गोष्टीमुळे अंहभाव निर्माण होतो. कर्ताकरविता आपण असं वाटू लागतं. अशा अहंकारी वृत्तीमध्ये दंभ आणि दंभ म्हणजे खोटेपणा, म्हणजे दु:खाला आमंत्रण.
अर्थात, स्वत:मध्ये खऱ्याखुऱ्या (नाटकी, दिखाऊ नव्हे) विनम्रतेची जाणीव ठेवली तर कर्मयोग आणि ज्ञानयोग यातून नक्कीच समाधान मिळेल. यापलिकडे अजून काही आहे? हॅविंग, डुईंग नंतर आपल्या खऱ्या माणूसपणाची, अस्तित्व आणि अस्मितेची जाणीव होते. ते  जाणीव आपल्या ‘बिईंग’ची आणि ही स्वत:ची स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आपल्याला खऱ्या आनंदाप्रत घेऊन जाते.
आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेतून इतरांपेक्षा आपण वेगळे हे समजतं आणि त्याचवेळी त्याची मर्यादाही लक्षात येते. स्वत:च्या, आत्मअस्मितेच्या जाणिवेतून, त्या सत्यामध्ये आपलं चित्त स्थिर झालं की जाणवतं आपण आणि इतर याना जोडणारं एकच चैतन्य आहे. आपण सारे एकाच ऊर्जेची विविध अंश आहोत. एकाच चैतन्य तत्वाची रूपं आहोत. हे चैतन्य म्हणजे आनंदात खरं स्वरूप. या जाणिवेतून फक्त आनंद निर्माण होतो. रिअल लाईफ इज इन बिईंग!! सत्चित् आनंद तो असा. हळूच कळलं मला, माझ्या नकळत. हे तुझं नि माझं गुपित, तुझ्या माझ्यात राहू दे..
तुझाच मी.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
        
प्रबोधन पर्व: मानवजातीचे डोळस संमीलन
‘‘समाजातील तंत्रविज्ञानाचा व अधिकतम प्रावीण्याचा विस्तार जोवर चालू असतो, तोवर प्रत्येक समाज बाहेरच्या समाजांच्या दडपणाला समर्थपणे तोंड देतो. किंबहुना तो फारच रसरशीत असला, तर दुबळ्या समाजांचे शोषण करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण याउलट तो एकदा घसरगुंडीला लागला की, त्याचा अन्य समाजांशी चाललेला संघर्ष अधिकाधिक कष्टप्रद आणि अपयशी होऊ लागतो. जरा वेगळ्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे एखादी संस्कृती अधिकतम प्रावीण्य प्राप्त करून घेईपर्यंत सतेज असते आणि तोपर्यंत ती जगातील एक उदयोन्मुख बलदंड सत्ता म्हणून मानली जाते. याउलट प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तिचे तेज मंदावत जाते व ती संस्कृती अन्य संस्कृतींचे भक्ष्य बनते. अशा रीतीने मानवी इतिहासात सत्ता व समृद्धीचे स्थलांतर अखंडपणे चालू आहे. म्हणून अंतर्गत व बाह्य़ घटकांचा व गतींचा एकत्र अभ्यास केला, तर असे दिसते की, आजवरचा सर्व मानवी इतिहास म्हणजे वर्ग व वर्ण यांची समाजांतर्गत अदलाबदल आणि सामथ्र्य व समृद्धी यांचे एका संस्कृतीतून व प्रदेशातून दुसऱ्या संस्कृतीत व प्रदेशात होणारे बाह्य़ स्थलांतर यांचा इतिहास होय, असे दिसून येईल.’’
राम बापट ‘परामर्श’ (मार्च २०११) या पुस्तकात मानवाच्या समग्र इतिहासाच्या मर्यादा सांगताना मानवी जीवनाच्या महत्त्वाच्या कामगिरीविषयी लिहितात – ‘‘.. मानवी जीवनामागे समता व न्याय याच्या जोडीला तिसरीही एक प्रेरक शक्ती आहे. मानवी जीवनात संमीलनाची म्हणजेच शारीरिक व सांस्कृतिक सामीप्य साधण्याची एक प्रक्रिया अखंड चालत आलेली आहे. मानवजातीला जसा यादवीचा, विघटनेचा व विध्वंसाचा इतिहास आहे, तसा संस्कृतिसंगमाचा, एकतेचा व सर्जनाचाही इतिहास आहे. आजवरच्या यच्चयावत सर्व संस्कृतींनी, त्यांची तुलनात्मक प्रत काहीही असो, मानवजातीच्या डोळस संमीलनाला यथाशक्ती हातभार लावला आहे. रक्त, भाषा, विचार, कल्पना, धर्म आणि उत्पादनाची साधने या अनेक सेतूंनी माणूस माणसाला जोडत गेला आहे.’’

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Surrogacy Rules Changed Marathi News
Surrogacy Rules : सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून बदल; डोनर गेमेट वापरण्याची मुभा, आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना काय फायदा?
वसई : मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ, बंदीनंतर काही बोटी रवाना
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…