सामान्यपणे भौतिक राशींचे ‘मोजमापन’ केले जाते. त्यापकी लांबी आणि वस्तुमान या राशींची आपण माहिती घेऊ.

लांबी –

रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न िबदूंना जोडणारी एक आणि एकच रेषा असते. रेषा हा अनंत िबदूंचा संच आहे, तर रेषेवरील कोणत्याही दोन िबदूंमधील भागाला रेषाखंड असे म्हणतात. रेषाखंड हा रेषेचा उपसंच असतो. रेषाखंडाला दोन अंत्यिबदू (किंवा टोके) असतात. रेषाखंडाच्या दोन अंत्यिबदूंमधील अंतर म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी होय. लांबी ही एक मूलभूत भौतिक राशी आहे.

एकाच अणूच्या अणुकेंद्रातील दोन न्यूट्रॉनमधील अंतर अत्यंत सूक्ष्म असते, तर एकाच आकाशगंगेतील दोन टोकांच्या ताऱ्यांमधील अंतर अतिप्रचंड असते. अंतरे मोजण्यासाठी फार प्राचीन काळापासून निरनिराळी एकके वापरली जातात. कमल-परागाचा व्यास, गाईच्या शेपटीच्या एका केसाची जाडी, आळशीच्या बीची जाडी, जवसाचा दाणा, अंगुळे, कटक, पुरुष, योजन अशी अनेक प्राचीन एकके आता लुप्त झालेली आहेत.

ब्रिटिश काळात भारतात इंच, फूट, वार (किंवा यार्ड), फर्लाग, मल या एककांचा उपयोग होत होता. एप्रिल १९५७ पासून भारतात लांबी मोजण्यासाठी सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर या एककांचा उपयोग करण्याचे ठरविण्यात आले. त्याची कार्यवाही १ ऑक्टोबर १९३८ पासून सुरू झाली. फार मोठी मोठी अंतरे मोजण्यासाठी ‘प्रकाशवर्ष’ या एककाचा उपयोग केला जातो. या एककांचा तपशील आपण समजावून घेणार आहोत.

वस्तुमान-

आपल्याला माहीतच आहे की, प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो आणि त्याला वस्तुमान असते. पदार्थातील कणसंचयाला ‘वस्तुमान’ असे म्हणतात.

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. प्राचीन काळी मासा, तोळा, छटाक, शेर, खंडी, मण अशी वस्तुमान मोजण्याची एकके होती. ब्रिटिश काळात पौंड, स्टोन, हंड्रेड वेट, औंस, ग्रेन, गुंज अशी एकके होती. युरोपमध्ये या एककांचा उपयोग मध्ययुगापासूनअनेक देशांमध्ये होत होता. भारतात १ ऑक्टोबर १९५५ पासून वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम, किलोग्रॅम, मेट्रिक टन इत्यादी एकके उपयोगात आणली जाऊ लागली.

आपण मात्र वस्तुमान या शास्त्रीय परिभाषेतील शब्दापेक्षा ‘वजन’ अशा सोपा सुटसुटीत शब्द उपयोगात आणतो.

प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गणदेवताची वैशिष्टय़े

‘गणदेवता’ ही बंगालच्या ग्रामीण जीवनावर आधारित अशी कादंबरी आहे. सुमारे ६०० पानांची ही दीर्घ कादंबरी म्हणजे जणू भारताच्या नवजागरण काळावरील एक महाकाव्यच आहे. शेतीवर आधारित ग्रामजीवनातील प्राचीन सामाजिक परंपरा, पाश्चात्त्य औद्योगिक क्रांतीमुळे हळूहळू नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यांच्या श्रद्धामूल्यांची मोडतोड, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, नैतिक, धार्मिक धोरणांचा बदलता प्रवाह यामुळे अगतिकपणे जीवन घुसळून निघाले आहे.

भारताच्या कुठल्याही प्रदेशातील जनजीवनाचे, त्यांच्या समस्यांचे, त्यांच्या आशा-आकांक्षाचे, त्यांच्या सुखदु:खाचे, त्यांच्या श्रद्धामूल्यांचे, त्यांच्या आचार-विचार धारणांचे, जणू प्रतििबबच थोडय़ा फार फरकाने येथे उमटले आहे. महाजन शेतकरी, पराकोटीचा स्वार्थ आणि त्याला छेद देत मधूनच प्रकटणारी दयाळू वृत्ती, यांचे अविश्वसनीय वाटणारे मिश्रण स्वभावात धारण करणारा छिरू पाल ऊर्फ श्रीहरी घोष, अन्यायग्रस्त जनतेसाठी सतत संघर्ष छेडणारा आदर्शवादी तरुण शिक्षक देवनाथ घोष, अत्यंत धाडसी, व्यसनी, कसबी कारागीर अनिरुद्ध लोहार, गिरीश लोहार, चांभार पातू, फटकळ पण मोठय़ा मनाचा तिनकौंडी, नाममात्र पैसे घेऊन औषधोपचार करणारा जगन डॉक्टर, सर्वस्व नागवलेली अगतिक पद्मा, वारांगनेचा व्यवसाय करणारी पण सज्जनांबद्दल आदर बाळगणारी दुर्गा, भडक डोक्याचा रहीमचाचा, शांत सहनशील बिलू, स्वार्थी दौलत शेख, आशावादी गौर- अशा असंख्य व्यक्तिरेखा कादंबरीत वावरतात आणि तत्कालीन ग्रामीण जीवनाचं जिवंत वास्तववादी चित्र वाचकांसमोर उभं करतात.

ठाकुरदेवता विकणे, पद्ममणीने जोसेफ रॉयशी लग्न करणे आणि खुद्द देवनाथने बालविधवा सोनाशी- भल्ल जातीच्या सुशिक्षित युवतीशी विवाह करणे, रमेश चटर्जीने चर्मव्यवसाय करणे, विश्वनाथने यज्ञोपविताचा त्याग करून समाजवाद जवळ करणे अशा तत्कालीन बंगाली समाजाला न पटणाऱ्या, न रुचणाऱ्या कितीतरी गोष्टी लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांनी कथानकच्या ओघात मोठय़ा धाडसाने चितारल्या आहेत. सामाजिक ढोंगाचा, प्रतिष्ठेचा बुरखा फाडला आहे. बदलू पाहणाऱ्या, नवजागरणाच्या मार्गावर जाऊ पाहणाऱ्या तत्कालीन समाजस्थितीचं दर्शन समर्थपणे घडवलं आहे. या कादंबरीला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार न मिळता, तरच नवल!

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com