मिलान हे सध्या इटलीतील सर्वाधिक महत्त्वाचे औद्योगिक शहर, फॅशनचे माहेरघर आणि स्थापत्यविषयक नवनवीन प्रयोगांचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेय. न्यूयॉर्क, पॅरिस आणि लंडनप्रमाणे मिलानसुद्धा जागतिक फॅशनची राजधानी समजले जाते. व्हॅलेन्टिनो, व्हस्रेस, प्रादा, अरमानी, डोल्स, गुस्ती, गाबाना अशा आंतरराष्ट्रीय फॅशनच्या विख्यात उत्पादकांची प्रमुख कार्यालये मिलानमध्ये आहेत. मिलानमध्ये मध्ययुगीन काळ आणि विशेषत: प्रबोधन काळापासूनच विविध प्रकारच्या वस्त्र-प्रावरणांचा उद्योग तेजीत आला. मिलानच्या चनीच्या आणि अतिमहागडय़ा वस्तू तसेच फíनचर, दागिने, वस्त्रे, हॅट्स इत्यादीमुळे या महागडय़ा वस्तूंना इंग्रजीत ‘मिलानर’ असा शब्द आला. हॅट्स उत्पादकाला ‘मिलिनरी’ हा शब्द आला. १९व्या शतकाच्या मध्यावर आशियातून रेशीम थोडे स्वस्त भावात आयात होऊ लागले. तेव्हापासून मिलानच्या परिसरात अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या. कापडाबरोबर तयार वस्त्रे उत्पादक आणि फíनचरच्या उत्पादकांचे मिलानमध्ये पेवच फुटले. मिलानमधील उंची वस्त्र-प्रावरणांचे भव्य असे पहिले डिपार्टमेंटल स्टोअर्स १८६५ साली बोकोनी बंधूंनी ‘ला रिनोसेंट’ या नावाने सुरू केले. या दुकानापाठोपाठ अशी नावीन्यपूर्ण वस्त्रांची अनेक दुकाने निघाली. तत्पूर्वी युरोपात फॅशनच्या जगात पॅरिस अग्रेसर होते. पण मिलानच्या वस्त्रांमधील साधेपणा आणि नावीन्यपूर्ण डिझाइनने पॅरिसवर बाजी मारली. १९७०च्या दशकात मिलानने फॅशनच्या क्षेत्रात जगात आपले स्थान अव्वल क्रमांकावर आणले. मिलानमधील जागतिक प्रसिद्धी लाभलेल्या फॅशन वस्त्र उत्पादकांपकी कनाली, एट्रो, आइसबर्ग, ले कोपेन्स, मिसोनी, मियू मियू, प्रादा, डोल्स इत्यादींनी मिलान फॅशन उद्योगाला प्रतिष्ठा मिळवून दिली. १९५८ सालापासून युरोपियन फॅशन जगातील पॅरिस, लंडन, मिलान आणि न्यू यॉर्क या शहरात वर्षांतून दोनदा ‘फॅशन वीक’ या नावाने फॅशन महोत्सव भरवले जातात.

सुनीत पोतनीस

Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

sunitpotnis@rediffmail.com

 

निलगिरी

सर्दी, पडसे, सांधेदुखी यात उपयोगी पडणारे म्हणून आपल्याला निलगिरी तेलाची ओळख आहे. निलगिरी ही मिर्टेसी कुळातील उंच, बहुपर्णी सदाहरित वनस्पती आहे. ‘यूकॅलिप्टस ग्लोब्युलस’ हे निलगिरीचे शास्त्रीय नाव. इंग्रजीत   ए४ूं’८स्र्३४२ ॠ’ु४’४२  हे नाव असले तरी ‘ब्ल्यू गम’ किंवा ‘गम ट्री’ या नावानेही निलगिरी ओळखली जाते. ही वनस्पती मूळची ऑस्ट्रेलियाची, पण तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वताच्या टेकडय़ांवर या वृक्षाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते म्हणूनच भारतात हा वृक्ष निलगिरी या नावाने ओळखला जातो. कागदनिर्मिती, तेलनिर्मिती, रेऑनचे धागे आणि िडक अशा निलगिरी झाडापासून मिळणाऱ्या उत्पादनांमुळे निलगिरी झाडाची लागवड वाढली आहे.

निलगिरी वृक्ष सुमारे ६० मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोड सरळ व मऊ असते. निलगिरीच्या खोडाची साल तुकडय़ा-तुकडय़ांत गळून पडते. बहुधा या कारणामुळेच ऑस्ट्रेलियात हे झाड िस्ट्रगीबार्क ट्री (तंतुमय साल असलेले झाड) या नावानेही ओळखले जाते. निलगिरीच्या रोपटय़ाची पाने समोरासमोर असतात, तर वृक्षात पानांची मांडणी एकाआड एक असते. पाने अणकुचीदार, लांब, रुंद, थोडीशी जाडसर आणि चंद्रकोरीसारखी वळणदार असतात. लहान पांढऱ्या पिवळसर रंगाची असतात. निलगिरीचे झाड जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणात शोषून घेऊन पानाद्वारे वातावरणात सोडते. पाणथळ, दलदलीच्या जागी निलगिरीची झाडे लावणे योग्य ठरते. कोरडय़ा प्रदेशात व कमी पावसाच्या प्रदेशात निलगिरीचे झाड लावले तर आजूबाजूच्या वनस्पतींना पाणी मिळणे मुश्कील होते. निलगिरी झाडाच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की, या झाडात एक सुप्त अंकुर असतो. जर वणव्यात हे झाड सापडले तर, वणव्याच्या उष्णतेमुळे हा अंकुर वाढतो आणि पुन्हा निलगिरीचे रोपटे तयार होते.

या वैशिष्टय़ांमुळे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात निलगिरीचे अस्तित्व टिकून आहे. पानांपासून तेल काढतात. पाने हातावर घेऊन चुरडली तरी निलगिरी तेलाचा वास लगेच जाणवतो. या तेलात ‘यूकॅलिप्टॉल’ हे संयुग असते. त्याला सिनीऑल असेही म्हणतात. सिनीऑलव्यतिरिक्त इतर रसायनेही निलगिरी तेलात असतात. निलगिरीच्या झाडापासून पाझरणाऱ्या स्रावामुळे टॅनिन हे रसायन मिळते. ते औषध व िडक तयार करण्यासाठी वापरतात.

अनघा वक्टे (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org