कापडाचा स्पर्श हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो. कापड विक्रीमध्ये त्याला अनन्यसाधारण असे स्थान आहे. हा स्पर्श कापड यांत्रिक पद्धतीने वाकवून, घासून किंवा ताणून बदलता येतो. तद्वतच रासायनिक पद्धतीत कापडाचा स्पर्श मुलायम करणारे पदार्थ नेहमी वापरले जातात. जवळपास सगळ्याच फिनििशग प्रक्रियेमध्ये मुलायम करणारे पदार्थ वापरले जातात. खासकरून मानवनिर्मित तंतूच्या कापडाला असलेला खरखरीतपणा फिनििशगच्या टप्प्यावर घालवला जातो, किमान कमी केला जातो. कापड उद्योगात फिनििशग करताना वापरले जाणारे असे पदार्थ दीर्घकाळ टिकतात, तर घरगुती वापराकरिता तयार केलेले पदार्थ एखाददुसरे धुणे टिकतात. त्यामुळे त्याचा वापर वारंवार करावा लागतो.
घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या स्थिर विद्युतचा परिणाम कमी करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांमुळे कापड वापरत असताना निर्माण होणारी स्थिर विद्युत तयार होण्यास अटकाव केला जातो. ही काळजी मोटार उद्योगातील वस्त्रे, अंतराळ क्षेत्रातील वस्त्रे आणि भूवस्त्रे तयार करताना प्रामुख्याने घ्यावी लागते. अन्यथा या विजेमुळे आग लागते किंवा तत्सम अपघात होऊ शकतात. या फिनििशग प्रक्रियेद्वारे तंतूंची वीजवाहकता वाढवली जाते. त्यामुळे अशी स्थिर विद्युत निर्माण व्हायला प्रतिबंध घातला जातो. तसेच तंतूंच्या अंतर्गत होणारे घर्षणही कमी केले जाते.
कापडात पाणी शोषले जाणार नाही आणि तेल शोषले जाणार नाही अशाही फिनििशगच्या प्रक्रिया केल्या जातात. त्या वेळी विशिष्ट गुणधर्माच्या रसायनांचा वापर केला जातो. कापडाचा पृष्ठीय ताण या बाबतीत अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या प्रक्रियेत त्यामध्ये बदल करणे अनिवार्य आहे. वापरायला सुलभ आणि टिकाऊ अशी इस्त्री असलेल्या प्रक्रियांना ग्राहकांची पहिली पसंती आहे. सुती किंवा सुती व पॉलिस्टर मिश्र तंतूच्या कापडासाठी याचा वापर प्रामुख्याने केला जातो. कपडा वापरताना वारंवार इस्त्री करायला लागू नये असे वाटते. स्कर्टच्या प्लेट आणि पॅन्टची घडीवरील इस्त्री जास्त महत्त्वाची ठरते. धुण्यामध्ये कपडा आटतो, त्यामुळे पडणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यासाठी सुती कापडातील तंतूबरोबर रासायनिक क्रिया होणारी सेल्युलोज असलेली बहुवारिके वापरली जातात. अर्थात नुसत्या सुतीऐवजी सुती आणि पॉलिएस्टरचे मिश्र तंतू वापरण्यामागे हाच उद्देश महत्त्वाचा आहे.

 सतीश दिंडे (इचलकरंजी)

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

निजामशाहीची अखेर

ब्रिटिश िहदुस्थान सोडून जात आहेत तेव्हा आपणास स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळणार आणि आपण सार्वभौम राजे होणार असे िहदी संस्थानिकांना वाटू लागले. या सर्व संस्थानिकात हैदराबादचा निजाम हा ब्रिटिश साम्राज्याचा अत्यंत निष्ठावान सेवक होताच. निजाम उस्मान अलीखान स्वत एका मोठय़ा इस्लामी राष्ट्राचा अधिपती बनून ऑटोमन सम्राटांप्रमाणे खलीफा म्हणजे इस्लामचा सर्वोच्च नेता बनण्याची स्वप्ने पाहात होता. फाळणीनंतर संस्थान, भारत वा पाकिस्तानात सामील न करता स्वित्र्झलडप्रमाणे स्वतंत्र देश म्हणून राखण्याचा निजामाचा हट्ट होता. हैदराबाद संस्थानातील जनतेने याच काळात लोकशाही राज्यव्यवस्था व स्वतंत्र भारतात राज्याचे विलीनीकरण यांच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी निजामाने रझाकार संघटनेकरवी केलेल्या अमानुष, अनन्वित अत्याचारांनी कळस गाठला. अखेरीस स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘पोलीस अ‍ॅक्शन’ ही सनिकी कारवाई करून हैदराबाद संस्थान खालसा केले. ‘ऑपरेशन पोलो’ असे नामकरण झालेली ही सनिकी कारवाई १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजता सुरू झाली. भारतीय लष्कराच्या फौजा एकाच वेळी पाच ठिकाणी पाच दिशांकडून हैदराबाद संस्थानात शिरल्या. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला अदिलाबादकडून, दक्षिणेला कुर्नूलकडून तर आग्नेयेला विजयवाडय़ाकडून. या लष्कराला हवाई दलाचे आणि रणगाडय़ांचे साह्य होते. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेच्या पहिल्या दिवशी भारतीय फौजांनी नळदुर्ग, तुळजापूर, लोहारा, होस्पेट ही गावे रझाकार व निजामसेना यांचा विरोध मोडून घेतली. दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद, जालना, औरंगाबादही भारतीय फौजांकडे आले. निजामाचे १८,००० सन्य व रझाकारांच्या दोन लाख गुंडांचा प्रतिकार मोडून भारतीय फौजा सिकंदराबादच्या पंचक्रोशीत हजर झाल्यावर १७ सप्टेंबरला निजामाने युद्धबंदी जाहीर केली आणि निजामाचा अरब कमांडर अल इद्रुस याची शरणागती भारतीय जनरल चौधरी यांनी स्वीकारली.

सुनीत पोतनीस
: sunitpotnis@rediffmail.com