सध्याच्या फ्लोरेन्स शहराच्या उत्तरेस इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून एट्रस्कन या आदिवासींची टेकडय़ांवर वस्ती होती. त्यांच्या वस्तीला रोमन लोकांनी ‘टस्कनी’ हे नाव दिले. पुढे इ.स.पूर्व ५९मध्ये ज्युलियस सिझरने या प्रदेशात आपल्या निवृत्त सनिकांसाठी एक वसाहत स्थापन केली. ही वसाहत प्रथम छावणीच्या स्वरूपात होती. या वसाहतीला सिझरने ‘कॉलोनिया फ्लोरेन्शिया’ असे नाव दिले. ‘फ्लोरेन्शिया’ म्हणजे लॅटिनमध्ये फुलांचे शहर! मध्य इटलीतील राज्यांमधून उत्तरेकडे जाण्याच्या मार्गावर फ्लोरेन्शिया वसल्यामुळे तेथला विकास भराभर होत गेला. मूळ रोमन साम्राज्याचा अस्त आणि रानटी टोळ्यांचा सुळसुळाट यामुळे झालेल्या विध्वंसातून सावरायला फ्लोरेन्शिया आणि टस्कनीला अकरावे शतक उगवावे लागले. इ.स. १००० ते १११५ या काळात फ्लोरेन्सवर मार्ग्रेव्ह सरंजामशहाचा अंमल होता. १११५ साली अखेरची माग्रेव्ह राणी माटिल्डाचा मृत्यू झाल्यावर फ्लोरेन्सचे पहिले कम्यून बनले. या कम्यून सरकारात शंभर प्रबळ सिनेटर्स निर्णय घेत असत. या प्रजासत्ताकाच्या काळात लोकरी कपडय़ांचे विणकाम आणि त्याचा व्यवसाय वाढला. या काळात फ्लोरेन्सला नगर राज्याचे स्वरूप आले. लोकर व्यवसाय आणि सावकारी हे दोन प्रमुख व्यवसाय होऊन या व्यवसायातील व्यापाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. राजकीय नेतृत्वासाठी धनिकांमध्ये चढाओढ चालत असे. व्यापारी लोकांना राजकीय नेतृत्वात स्वारस्य नसे, परंतु ते अनेक वेळा सिनेटर्सवर काही निर्णयांसाठी दबाव टाकीत असत. फ्लोरेन्सचे प्रसिद्ध चलन फ्लोरिन, हे १२३५ साली प्रथम चांदीमध्ये पाडण्यात आले, पुढे फ्लोरिन सोन्यात पाडले गेले. सर्व युरोपियन राज्यांमध्ये त्या काळात फ्लोरिन हे प्रमाणित चलन झाले. १२९६ साली फ्लोरेन्सचे प्रसिद्ध कॅथ्रेडल डय़ूओमोचे बांधकाम वास्तुविशारद अरनाल्फो कॅम्बिओच्या देखरेखीखाली सुरू झाले. हे बांधकाम पुढे एकशे चाळीस वष्रे चालले. साधारणत: बाराव्या शतकापासून फ्लोरेन्सवासीयांची सुरेख आणि भव्य चच्रेस, प्रासाद बांधून त्यांच्या सभोवती पुतळे उभे करून बागांनी शहर सुशोभित करण्याकडे वाटचाल सुरू झाली.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लिंबू, मोसंबे, संत्रे

लिंबू मोसंबे, संत्रे, किनो ही स्रिटस जातीतली फळे आहेत. फळाच्या प्रकाराला ‘हेस्पिरिडीयम’ म्हणतात. ही सर्व फळे रसाळ व व्हिटॅमिन ‘सी’युक्त असतात. स्रिटस कुळातील फुलांना मंद पण आल्हाददायक सुवास असतो. बिजांडकोशात कप्पे असतात. हे कप्पे रसदार होतात. बारीक किडे, मधमाशा किंवा स्वपरागीभवानामुळे कप्पे असलेल्या बिजांडकोशाचे रूपांतर फळात होते. फळाचा आकार मोठा व घट्ट होत जातो. लिंबू, मोसंब्यात कप्प्याची आवरणे एकमेकांना खूप चिकटतात. एकमेकांत मिसळून जातात. ही फळे आडवी कापली की कप्पे वेगवेगळे दिसत नाहीत. फक्त कप्प्यांमध्ये आडवा धागा दिसतो. संत्रे आणि किनोमध्ये हे कप्पे एकमेकांपासून वेगळे दिसतात. पण ते फळांच्या तळाच्या बाजूला चिकटलेले दिसतात, त्यामुळे संत्रे आणि किनोच्या फोडी सहज करता येतात. लिंबू आणि मोसंब्याच्या फोडी करायच्या झाल्यास फळ कापावे लागते. फळाची साल तीन आवरणांनी बनलेली असते. संत्रे आणि किनो या फळाचे बाह्य़ आवरण तीन थरांनी बनलेले असते. बाह्य़ आवरण केशरी रंगाचे असते तर लिंबू, मोसंब्याचे बाह्य़ आवरण पिवळ्या रंगाचे असते. यांच्या आतल्या बाजूला पांढरट व जाड पण मऊ मध्य आवरण असते. या दोन्ही आवरणांना मंद आणि आल्हाददायक सुवास येतो. आतल्या सालीपासून दोऱ्यासारखे बारीक घागे निघतात, त्यात भरपूर रस असतो. हे धागे फळाच्या पांढऱ्या भागाला चिकटतात. तिथे बिजांडाच्या बिया चिकटलेल्या असतात. ही फळे आडवी कापली तर धागे मध्यभागी कापले जाऊन त्यातून रस येतो.

मध्य आवरणात ‘मोनोटíपन्स’युक्त तेलग्रंथी असतात. संत्र्याची साल पिळली की टíपन्स बाहेर येतात व डोळ्यातून पाणी येते. याशिवाय त्यात ग्लायकोसाइड्स पेक्टीन आणि पेक्टीक वितंचकामुळे साल कडू लागते म्हणून लिंबू-मोसंब्याचा रस जोर लावून काढल्यास कडू लागतो. संत्र्यात रसाच्या छोटय़ा पिशव्या एकमेकांत गुंतलेल्या असतात. संत्र्याच्या फोडीवर जे पांढरे घागे दिसतात ते मध्य आवरणाचे असतात. ही दोन्ही आवरणे एकमेकांपासून विभक्त असल्याने बाह्य़ आणि मध्य आवरण यापासून वेगळे काढता येते.

डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org