१९३२ साली इराक ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन बगदादमध्ये फाजल अलीची राजवट आली. या राजवटीविरोधी लोकांनी पुढच्या काळात सतत यादवी माजवल्यावर १९५८ मध्ये अब्दुल कासिम याच्या नेतृत्वाखाली लष्करी उठाव होऊन फाजल राजवट संपवून अब्दुल कासिमचे सरकार बगदादमध्ये स्थापन झाले. पुढे १९६८ मध्ये अरब सोशालिस्ट पार्टीने उठाव करून अहमद अल बक्र यांच्या अध्यक्षतेखाली बगदादमध्ये आपले सरकार स्थापन केले. १९७० च्या दशकात बगदादचे उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेले पेट्रोलियमच्या जागतिक किमतीत अचानक वाढ झाल्यामुळे आíथक भरभराट झाली. या काळात बगदादमधील पाणीपुरवठा योजना, रस्ते रुंदीकरण इत्यादी मूलभूत सुधारणा झाल्या. पुढच्याच वर्षी बगदाद सरकारने इराक पेट्रोलियम कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. १९७९ मध्ये पुढचा काळ गाजवणारा सद्दाम हुसेन हा इराक सरकारच्या अध्यक्षपदी नियुक्त झाला; परंतु १९८० मध्ये बगदादच्या बाथ सरकारने इराणवर बॉम्बफेक करून पुढे आठ वष्रे चाललेल्या इराणी युद्धाला तोंड फोडले. या युद्धाचे मूळ कारण इराण-इराकमधील प्रादेशिक आणि राजकीय वादांमध्ये होते. या दोन्ही देशांमधील सरहद्दीवरच्या शत अल अरब या नदीचे दोन्ही किनारे ताब्यात घेणे आणि इराणच्या सरहद्दीलगतच्या तेलसंपन्न प्रदेशाचा ताबा घेणे हे सद्दाम हुसेनचे दोन प्रमुख हेतू होते. सद्दामने आपल्या फौजा सप्टेंबर १९८० मध्ये इराणी हद्दीत घुसवून सुरू केलेले हे युद्ध १९८८ साली अनिर्णायक परिस्थितीत युद्धबंदी करार होऊन संपले. १९९० साली सद्दाम हुसेनने तेलसंपन्न कुवेतवर हल्ला करून पहिले ‘गल्फ वॉर’ सुरू केले. या युद्धात इराकच्या बाजूने इराणही युद्धात सामील झाले; परंतु १९९१ मध्ये अमेरिकेने कुवेतच्या मदतीला जाऊन बगदादवर जोरदार हवाई हल्ले करून सद्दाम हुसेनला आपल्या इराकी फौजा मागे घेण्यास भाग पाडले.

सुनीत पोतनीस

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

sunitpotnis@rediffmail.com

 

वेलची

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये गोड पदार्थाचे विशिष्ट स्थान आहे. लाडू, वडय़ा, खीर, बासुंदी या पदार्थाचा स्वाद वाढवणारा स्थायी घटक म्हणजे ‘वेलची’.

वेलची, वेलदोडा, इलायची किंवा एल्का अशा नावांनी परिचित असलेल्या वेलचीचे शास्त्रीय नाव ए’ी३३ं१्रं ूं१ेिे४े असे आहे. भारत, नेपाळ व भूतान या देशांत उगमस्थान असलेली वेलची आज व्हिएतनाम, मलेशिया, कोरिया, जपान या देशांत वापरली जाते. ‘मसाल्याच्या पदार्थाची राणी’ असणाऱ्या वेलचीची किंमत जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेलची उत्पादनात भारत अग्रगण्य असूनही अंशत: वेलची निर्यात होते. याचे कारण देशातील मोठय़ा प्रमाणावर असणारी मागणी. आमरस, खिरीसारख्या स्थानिक पदार्थापासून ते केक बिस्किटे तसेच फळांचे रस, सरबते व कॉफी अशा अनेक पदार्थात वेलची वापरतात. मुखवास व पान विडय़ामध्येसुद्धा वेलचीचे असे विशेष स्थान आहे.

दक्षिण भारतात वेलचीची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तामिळनाडू, केरळच्या डोंगराळ भागाला ‘कॅर्डमोम हिल्स’ नावाने ओळखतात. खडकाळ भागात वाढणारी वेलचीची झाडे २ ते ६ मीटर उंच वाढतात. पाने जमिनीस लागून सरळ ४० ते ५० सेंटिमीटर लांब असतात. वेलचीच्या झाडावर पांढऱ्या रंगाची एकच पाकळी असलेले नाजूक फूल येते. फळ कोनाकृती व शेंगांच्या स्वरूपात येते. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास या शेंगा काढून उन्हात किंवा भट्टीत सुकवतात. दोन प्रकारची वेलची भारतात वापरली जाते. हिरवी वेलची गोड पदार्थात व काळी वेलची सालासकट मसाल्यांत वापरतात. हिरव्या वेलचीचा दुसरा प्रकार म्हणजे पांढरी वेलची, जी कृत्रिम प्रक्रिया करून ब्लीच केली जाते. वेलचीच्या बियांमध्ये टíपनॉल, लिमॉनेन, सेबिनेन अशी अनेक आवश्यक तेले असतात, ज्यामुळे वेलचीला गंध आणि स्वाद प्राप्त होतो. वेलचीचे सेवन मुखशुद्धी व पाचक म्हणून केले जाते. याशिवाय दातांचे विकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण, रक्ताभिसरण तसेच मूत्रविकारावर उपाय असे अनेक फायदे या लहानशा बियांमध्ये दडलेले आहेत. पोषक द्रव्यांमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम  मॅग्नेशिअम, मँगनीज व लोहासारख्या खनिजांचा स्रोत आहे. अशा या बहुउपयोगी दाण्यांना ‘नंदनवनातील धान्य’ म्हणजेच ग्रेन्स ऑफ पॅरेडाइज हे नाव योग्यच आहे.

डॉ. अपर्णा दुभाषी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org