कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील अग्रणी वनस्पती उद्यानाचे कार्य आणि त्या उद्यानाचे विशेष या लेखात सांगितले आहेत. कार्य :-  १. नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करणे.  २. भारताच्या विविध भागांतून वनस्पतीपासून मिळवलेल्या बियांचे व रोपांचे संवर्धन करणे आणि पादपालय (हब्रेरियम) च्या स्वरूपात मृत वनस्पतींचे जतन करणे.  ३. उती संवर्धन या आधुनिक पद्धतीचा वापर करून संवर्धन, संशोधन आणि विकास करणे.

अग्रणी वनस्पती उद्यानाचे काही प्रमुख विभाग असे आहेत. :- १. नेचेवर्गीय वनस्पती उद्यान : भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाच्या मदतीने २०१५ सालापासून नेचेवर्गीय वनस्पतींचे संवर्धन चालू आहे. ह्य़ामध्ये ६३ प्रजातींचे संवर्धन, ११ प्रदेशनिष्ठ आणि औषधी नेचे  यांचे संगोपन केले आहे.  २.अपुष्प वनस्पती उद्यान: वनस्पतीशास्त्र विभागाच्या समोर अपुष्पवनस्पतींचे उद्यान आहे.  Mesembryoxylem mahabalai,, पोडोकाप्रेसी, ह्य़ाचे जीवाश्म हे या उद्यानाच्या मध्यभागी उभारण्यात आले आहे.  ३. कंदवर्गीय वनस्पती : पश्चिम घाटात उपलब्ध असलेल्या ४० पेक्षा अधिक कंदवर्गीय वनस्पतींच्या प्रजाती या विभागात वाढवण्यात आल्या आहेत.  ४. जलीय वनस्पती : यामध्ये वैशिष्यपूर्ण वनस्पतींची वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी कृत्रिम तळी केली आहेत.  ५. औषधी वनस्पती उद्यान : अग्रणी वनस्पती उद्यानात ७५ पेक्षा अधिक औषधी वनस्पती जतन करण्यात आल्या आहेत.  ६. माड उद्यान : ६५ हून अधिक स्वदेशी आणि विदेशी माडांची लागवड करण्यात आली आहे.   ७. ऑíकड्स : जवळपास ८८ प्रकारच्या प्रजातींचे ऑíकड्स विशिष्ट खोल्यांत वाढवण्यात आले आहेत.  ८. औषधी वृक्षवाटिका : उद्यानामध्ये १०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती वाढवण्यात आल्या आहेत.  ९. दुर्मीळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या वृक्षांची वाटिका :  पश्चिम घाटात आणि अंदमान-निकोबार बेटावर सापडणाऱ्या विविध ६३ प्रकारच्या वृक्षांची लागवड अग्रणी उद्यानात करण्यात आली आहे.  १०. कीटकभक्षी वनस्पती : मुख्यत:  ड्रोसेरा, घटपर्णी आणि इतर वनस्पती काचेच्या खोलीत एका विशिष्ट तापमानात वाढवण्यात आल्या आहेत.  ११. वेलवर्गीय वनस्पती :  पश्चिम घाटातील २५ पेक्षा जास्त वेली उद्यानाच्या संरक्षण भितींवर वाढवण्यात आल्या आहेत.  १२. नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या वनस्पतींचे व प्रदेशनिष्ठ वनस्पतींची रोपवाटिका :  १३. खारफुटी वनस्पतींची रोपवाटिका : उदाहरणार्थ झ्र्स्ऋुंदरी

प्रा. श्रीरंग यादव (कोल्हापूर)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

इस्तंबूलचा वास्तुविशारद सिनान

मायमर सिनान हा इस्तंबूलचा राहणारा, ओटोमन काळातला प्रमुख वास्तुस्थापत्यतज्ज्ञ. ओटोमन सम्राट सुलेमान (इंग्रजीत सुलेमान द मॅग्निफिशंट), सलीम द्वितीय आणि मुराद तृतीय यांच्या कारकीर्दीत सिनानने इस्तंबूलच्या वैभव वाढवणाऱ्या तिनशेहून अधिक वास्तूंच्या रचना केल्या. त्यामध्ये ८० मशिदी, ३६ राजवाडे, ५५ शाळा आणि रुग्णालये, तसेच अन्य सार्वजनिक इमारतींचा समावेश होतो. इस्तंबूलजवळच्या एका खेडय़ात १४९० साली जन्मलेल्या एका ख्रिस्ती धर्मीय गवंडय़ाचा मुलगा असलेल्या सिनानने लष्करी तंत्रज्ञ म्हणून ओटोमन फौजेत नोकरी धरली. लष्करासाठी तटबंदी, रस्ते, पूल यांचे सिनानने उत्तम बांधकाम केल्यावर त्याची नियुक्ती सुलतान सुलेमानने राज्याचा प्रमुख वास्तुविशारद या पदावर केली. त्याने बांधलेल्या वास्तूंपकी सुलेमानी मशीद सर्वोत्तम समजली जाते. इ.स. १५५० ते १५५७ अशी सात वष्रे बांधकाम चाललेल्या या मशिदीचे काम पूर्ण झाल्यावर सुलतान अत्यानंदाने नाचू लागला! बायझंटाईन आणि ओटोमान इस्लामी स्थापत्यशैलींचा मिलाफ असलेली ही वास्तू इस्तंबूलमधील सर्वाधिक मोठी मशीद आहे. सुलेमानी मशिदीच्या प्रांगणात पहिल्या महायुद्ध काळात शस्त्रास्त्रांचा साठा केला होता. या साठय़ामध्ये लागलेल्या आगीमुळे मशिदीचे बरेच नुकसान झाले. सिनानने इ.स. १५६९ ते १५७५ या काळात एदीर्न येथे बांधलेले सेलिमिये (सुलतान सलीमच्या नावाने) मशीद संकुल हे इस्लामी वास्तुशैलीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. इस्तंबूल आणि परिसरात दिसणाऱ्या इतर मशिदींप्रमाणे एक मोठा आणि इतर लहान लहान अनेक घुमट या मशिदीच्या आराखडय़ात न ठेवता सिनानने अष्टकोनी प्रमुख इमारतीवर एकच मोठा घुमट बांधला आहे. सेलिमिये मशीद संकुलात, जोडून वाचनालय, शाळा, दवाखाना, हमामखाना, गरिबांसाठी अन्नदान व भोजनाची जागा, बाजार, स्मशान इत्यादींचा समावेश आहे. युनेस्कोने या मशिदीची नोंद जागतिक वारसास्थान म्हणून केलीय. सिनानचा मृत्यू १५८८ मध्ये झाला. सिनानच्या हाताखाली तयार झालेल्या अनेक शिष्यांनी पुढे स्थापत्यशास्त्रात मोठय़ा कामगिऱ्या केल्या. भारतातल्या प्रसिद्ध ताजमहालच्या बांधकामात आणि त्याचा आराखडा बनविण्यातही सिनानच्या एका शिष्याचा सहभाग होता!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com