व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीत वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावर यंत्रयुगाला सुरुवात झाली. अनेक प्रकारचे कारखाने सुरू झाले. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे लोंढे लंडनकडे येणे सुरू झाले. समाजात मध्यम आणि कामगार असे नवीन दोन वर्ग निर्माण झाले. टॉवर ब्रिज आणि बिग बेन उभे राहिले. गिरण्यांच्या धुराडय़ांमधून धुराचे लोंढे बाहेर पडू लागले. राणी व्हिक्टोरियाच्या नवऱ्याने म्हणजे प्रिन्स अल्बर्टने १८५१ साली १९ एकर जागेत लंडनमध्ये एक भव्य प्रदर्शन भरवले. देशोदेशींच्या वैज्ञानिकांनी लावलेल्या वैज्ञानिक शोधांचे प्रदर्शन. या प्रदर्शनामुळे २० लक्ष पौंडांची मिळकत झाली. अल्बर्टने या सर्व पशातून रॉयल अल्बर्ट हॉल, रॉयल कॉलेज ऑफ सायन्स, नॅचलर हिस्टरी अँड सायन्स म्युझियम उभे केले. जॉर्ज पंचम आणि जॉर्ज सहावे यांच्या काळात झालेल्या दोन्ही महायुद्धांमध्ये लंडनला नामशेष करण्याचा प्रयत्न केला गेला. ७ सप्टेंबर १९४० च्या दुपारी जर्मन बॉम्बफेकी विमानांनी लंडनवर केलेला हल्ला सतत ५७ दिवस चालला.
लंडनचे अनेक विभाग जमीनदोस्त झाले. बॉम्बिंग सुरू झाले की, लोक टय़ूब रेल्वेच्या बोगद्यांमध्ये लपून बसत. चíचलच्या वक्तव्यांवर विसंबून लोकांनी धर्याने या आपत्तीला तोंड दिले. युद्ध संपलं आणि अगदी
थोडय़ाच काळात लंडन परत नव्या जोमाने राखेतून उभं राहिलं!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

डॉ. जगदीशचंद्र बोस
३० नोव्हेंबर १८५८ रोजी बंगालमधील विक्रमपूर जिल्ह्य़ातील राणीखेत येथे जन्मलेले डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वष्रे ते भौतिकीशास्त्र शिकवत असतानाच त्यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले.विद्युत चुम्बकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकेर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांनी यश मिळवले होते. त्यानंतर मात्र ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्त्रेक्शन, अ‍ॅपरेट्स रेझोनंट रेकोर्ड्स दोन उपकरणे शोधून त्यांनी थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामाचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले.
सन १९१७ मध्ये त्यांनी कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिटय़ूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले. रिस्पॉन्स इन द लििव्हग अ‍ॅण्ड नॉन लििव्हग (१९०६), प्लांट रिस्पॉन्स (१९०६), इलेक्ट्रो फिजीओलॉजी ऑफ प्लांट्स, इरिटेबिलिटी ऑफ प्लांट्स, लाइफ मूव्हमेंट्स ऑफ प्लांट्स (भाग १ ते ४), दि फिजीऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, दि नव्‍‌र्हस मेकॅनिझाम ऑफ प्लांट्स, दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, ट्रॉपिक मूव्हमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ ऑफ प्लांट्स इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रीझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कम्पाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सग अ‍ॅपरेट्स उपकरणे तयार केली. डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.
. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org