रेडक्रॉस या जागतिक स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक ही हेन्री डय़ुना यांची ओळख आहे. १८२८ साली जीनिव्हात जन्मलेले हेन्री डय़ुना हे स्वित्र्झलडमधील व्यापाऱ्याचे पुत्र. पुढे हेन्री आपल्या वडिलांचा व्यापार पाहू लागल्यावर इटाली, फ्रान्स वगरे शेजारच्या देशांमध्ये व्यवसायासाठी वरचेवर जात असत. असेच इटलीच्या दौऱ्यावर असताना १८५९ साली सॉलफेíननो येथे नेपोलियन तृतीय आणि इटलीतील साíडनियाचा राजा व्हिक्टर इम्यानुएल द्वितीय यांच्या संयुक्त सन्याचे ऑस्ट्रियन सन्याबरोबर युद्ध झाले. दुसऱ्या दिवशी रणांगणाजवळून जाताना तिथले दृश्य बघून डय़ुनांना धक्काच बसला. तिथे चाळीस हजारांहून अधिक सनिक मृत आणि जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यापकी हजारो सनिक गंभीर जखमांनी विव्हळत, तळमळत मरणासन्न अवस्थेत पडून होते. त्यांना मदत करायलाही कोणी नव्हते हे पाहून अस्वस्थ झालेल्या डय़ुनांनी जवळच्या गावातल्या लोकांना मदतीला घेऊन तिथल्या चर्चमध्येच जखमींना प्रथमोपचार देण्याची व्यवस्था उभारली. पुढे  जीनिव्हाला परतल्यावर डय़ुनांनी ‘मेमरीज ऑफ सॉलफेíननो’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात त्यांनी युद्धांचे दुष्परिणाम कथन करून न थांबता युद्धग्रस्त सनिकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी एखादी जागतिक स्वरूपाची स्वयंसेवी संघटना असावी, असे आपले मत मांडले. पुढे त्यांनी युरोपभर प्रवास करून मानवतावादी, तटस्थ अशी आंतरराष्ट्रीय संघटना या कार्यासाठी तयार करण्याची आवश्यकता इतर देशांसमोर मांडली. १८६३ साली डय़ुना यांच्या नेतृत्वाखाली पाच लोकांची समिती नेमली गेली. १८८० मध्ये याच समितीचे नाव ‘आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती’ असे झाले. पुढे प्रचंड मोठा विस्तार झालेल्या रेडक्रॉस समितीचे मुख्यालय जीनिव्हात असून प्रत्येक देशात या समितीच्या शाखा आहेत. केवळ युद्धाच्याच नव्हे तर शांततेच्या काळातही आपत्तीत लोकांच्या वैद्यकीय मदतीला धावून जाण्यास रेडक्रॉस नेहमी सज्ज असते. शासकीय अनुदानं, सभासद देशांच्या वर्गण्या यातून या संस्थेचा खर्च चालतो. डय़ुनांच्या महान कार्याचा गौरव म्हणून १९०१ साली त्यांना शांततेसाठीचे पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले.

– सुनीत पोतनीस

Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?

sunitpotnis@rediffmail.com

 

 

वृक्षांचे स्थलांतरण

एखाद्या जागेचा विकास म्हणजे तिथल्या निसर्गाची मोडतोड असे एक समीकरणच झाले आहे. धरण बांधताना तिथल्या बाधित क्षेत्रातल्या रहिवाशांना हलवून सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतरण केले जाते पण मोठय़ा संख्येने असणाऱ्या वनस्पतींना मात्र जलसमाधी घेण्यावाचून गत्यंतर नसते. शहरी भागात रस्तेबांधणी वा असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण किंवा इमारतबांधणीच्या वेळी तिथे लावलेल्या, अस्तित्वात असलेल्या अचल वृक्षांचे काय करायचे हा मोठा कळीचा मुद्दा होऊन जातो. वृक्ष प्राधिकरण अशा प्रसंगी प्रकल्पाला परवानगी देताना वृक्षांच्या जातीनुसार काही वृक्ष तोडण्याचा, तर काही वृक्षांचे स्थलांतरण करण्याचा पर्याय देते. ज्याने आयुष्यभर साथसांगत दिली, छाया दिली, आपल्या सुंदर फुलांनी आनंद दिला त्या वृक्षावर कुऱ्हाड चालवणे किती क्लेशदायक असते याची अनुभूती सर्वानीच घेतली असेल. अशा वेळी विकासकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे स्थलांतरण करणे हाच खास उपाय ठरतो. आता हे कार्य कसे करायचे ते पाहू.

स्थलांतरित होणाऱ्या माणसांच्या गरजा जशा वेगवेगळ्या असतात तद्वतच वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्याही गरजा भिन्न असू शकतात. स्थलांतरण करताना त्यांनाही भावना असतात हे वृक्षायुर्वेदात उल्लेखिल्यानुसार लक्षात घेणे आवश्यक आहे. आजच्या भौतिक जगात माणसाला या गोष्टींचा सोयीस्कररीत्या विसर पडला आहे.

वृक्षांच्या स्थलांतरणासाठी सर्वसाधारण अशी पद्धत वापरली जाते. प्रथमत: जो वृक्ष हलवायचा आहे त्याचे चोहोबाजूंनी निरीक्षण करतात. वृक्षाच्या फांद्या कशा पसरल्या आहेत, त्यांचा आकार कसा आहे हे पाहून त्यातील काही फांद्या छाटतात. फांद्या छाटताना शक्यतो झाडाचा मूळ आकार कायम राहील, किंवा छाटणीचे प्रमाण कमीजास्त करून त्याचा आकार मर्यादित व समतोल राहील, सौंदर्यात भर पडेल हे बघणे जरुरीचे असते शिवाय त्यामुळे वृक्षाचे वजन कमी होण्यासही मदत होते. छाटणीसाठी वापरायची हत्यारे धारदार असावीत. त्यामुळे फांद्या छाटताना झाडाला कमीतकमी इजा होईल. तसंच छाटणी केल्यावर कापलेल्या जागी रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून जंतुनाशकाचा लेप लावतात.

– डॉ. विद्याधर ओगले

 मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org