हायड्रोजन आणि कार्बन हे रबरातील मुख्य रासायनिक घटक. रबर हे एक बहुवारिक आहे. रेणू तयार होताना दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकमेकांशी विशिष्ट पद्धतीनं जोडलेली असतात. जेव्हा या रेणूंची लांब अशी साखळी तयार होते. तेव्हा त्याला ‘बहुवारिक’ म्हणतात. मायकेल फॅरडे यांनी रबराच्या झाडाचं विश्लेषण केलं. चिकाचं अपघटन केल्यावर आयसोप्रीन नावाचा एक पदार्थ मिळतो. आयसोप्रीनमध्ये  कार्बनचे ५ आणि हायड्रोजनचे ८ अणू दुहेरी पद्धतीनं एकमेकांशी जोडलेले असतात. साधारण ८० वनस्पतींच्या कुलातील चिकापासून नसíगक रबर मिळवता येतं. हेविया ब्राझीलिअस, कॅस्टिला इलास्टिका, फायकस इलास्टिका या त्यापकी काही निवडक वनस्पती. वनस्पती साधारण सात ते आठ वर्षांच्या झाल्यावर वनस्पतीच्या खोडावर छेद देऊन चीक गोळा केला जातो. गोळा केलेला चीक पहिल्यांदा गाळला जातो. गाळलेला चीक अ‍ॅल्युमिनिअमच्या टाकीत ठेवतात. त्यात अ‍ॅसेटिक आम्ल घालून रात्रभर ठेवतात. चीक साकाळतो. त्यातील घट्ट पदार्थ आणि पाणी वेगवेगळे होतं. हा चोथा म्हणजेच रबराचं प्राथमिक रूप. हा चोथा टाकीतील पत्र्यावर जमतो आणि त्याच्या लाद्या तयार होतात. त्यानंतर त्यात गंधक किंवा सिलिनियम, बेंझॉइल पेरॉक्साइड असे इतर पदार्थ वापरून व्हल्कनीकरणाची प्रक्रिया केली जाते. व्हल्कनीकरणाची क्रिया लवकर होण्यासाठी त्यात नायट्रोसो डायमिथिल अ‍ॅनिलीन, डायमिथिल ग्वलिडीन असे कार्बनी पदार्थ आणि मॅग्नेशिअम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड असे अकार्बनी पदार्थ वापरतात. काजळी, सिलिका, काही काबरेनेट्स हे पदार्थ रबराला मजबुती येण्यासाठी वापरतात. हवेतील ऑक्सिजनचा रबरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्यात फिनिल बीटा नॅप्थिल अमाइन हा पदार्थ वापरतात. हे सर्व करीत असताना रबर प्रमाणापेक्षा जास्त कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी वनस्पती तेलं, खनिज तेलं, मेदाम्लं अशा काही पदार्थाचा उपयोग केला जातो.
टायर किंवा खोडरबरासारख्या वस्तूंचं घर्षण जास्त होतं. अशा वस्तू तयार करताना पमिस, सिलिका असे पदार्थ वापरले जातात. रबरापासून रंगीत आकर्षक वस्तू तयार करताना त्यात टिटॅनिअम डाय-ऑक्साइड, झिंक सल्फाइड आणि इतर काही कार्बनी पदार्थ वापरले जातात.
सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – बोकीच्या पोरी वयात येतात..
‘बोके, ऐक जरा, तुझी छकुली आणि बकुली या दोन्ही पोरी मोठय़ा होतायेत. पूर्वीचा अल्लडपणा कमी होतोय नि त्यांच्या वावरण्यात आता वेगळाच अवघडलेपणा दिसतोय. म्हणजे धड लहान पिल्लासारखी मस्ती नाही की तुझ्यासारखी धीमी सतर्क चाल नाही.’ कुकूर बोकीला म्हणाला, कुकूर आणि बोकी दोघे सकाळच्या उबदार उन्हात बसले होते.
‘क्काही सांगू नकोस मला, त्या पोरीचं वागणं. अकला म्हणून नाहीत त्यांना. जराही समजत नाही. परवा, आम्ही तिघी आपल्या बिल्डिंगच्या भिंतीवर बसलो होतो, संध्याकाळच्या वेळी..  तेव्हा आला समोरून पलीकडच्या वाडीतला बोका, निर्लज्ज आहे. काही वेळ नाही, काळ नाही बघत बसला दोघींकडे टक लावून, आळीपाळीनं त्यांना खुणा करीत होता. मी जोरात शेपटी आपटली, आता आमच्यात शेपटी आपटली, रोखून पाहिलं तर तो इशारा असतो की, आम्हाला हे चाळे बिलकूल नापसंत आहेत. तू निघून जा, तू नाही गेलास तर शेपटी फुलवून मी जाईन. ढिम्म बसून राहिला. अरे तू कोण, कुठला? आणि या पोरी दोघी त्याच्याकडे बघून लाजताएत. आपले कान मुरडून मुरडून बघताहेत.’
कुकूर मिशा हलवून हसला, त्याच्या कपाळावर कौतुकाच्या आठय़ा उमटल्या.
‘हसतोस काय? हं. तुला नाही रे असली चिंता, तू पुरुष,’ बोकी फणकारून म्हणाली.
कुकूर तिच्याजवळ सरकला, आणि बसला पुढचे पाय सोडून, नि मान वर करून म्हणाला.
‘बोके, मी तुझा दादाय. छकुली नि बकुलींना मी खेळवलंय. अगं वयात येतायेत पोरी तुझ्या. त्यांच्याकडे बघ, म्हणजे कळेल तुला. नवखेपणा नाही आणि पोक्तपणा नाही, अधलं मधलं वय आहे त्यांचं. त्यांना चार गोष्टी समजावून सांगायच्या की त्यांच्यावर फिस्कारायचं? त्या जवळपास आल्या की तू त्यांना हल्ली प्रेमानं चाटत नाहीस. मान वळवून, शेपटी ताठ करून निघून जातेस. हां, त्यानंतर जातेस त्यांच्याजवळ, म्हणजे त्या झोपलेल्या असल्या की, त्यांना प्रेमानं हुंगतेस आणि बिलगून बसतेस. अशा वेळी त्यांना तुझा राग आलेला असतो. त्या मुळीच उठत नाहीत. डोळे मिटून झोपल्याचं नाटक करतात. तुझा राग त्यांच्यापर्यंत पोहोचतो, पण तुझं प्रेम पोहोचत नाही. त्यांना थोडा अवकाश हवा असतो. त्या बाहेर गेलेल्या असल्या की, तू बालकनीत बसून त्यांची वाट पाहतेस. यू केअर फॉर देम. पण त्या जरा उशिरा आल्या तरी केवढी फणकारतेस. अगं त्यांना स्वतंत्रपणे जग हुंगून पाहायचंय, परिसराचा अंदाज घ्यायचाय. इकडे तिकडे कुठे उंदीर मिळतात का? उडत्या चिमण्यांना पकडायचा प्रयत्न करायचाय! अगदी स्वाभाविक आहे.’
बोकी विचारात पडली, ‘कुकूरदादा, तू म्हणतोयेस ते खरंय रे! अरे, आईच्या पोटात प्रेम आणि ओठात काळजी असते. त्या बोक्याच्या नादी लागू नये, हीच इच्छा आहे. आणखी काही नाही!!’
कुकूरनं मोठी जांभई दिली आणि म्हणाला, ‘माणसांबरोबर राहून आपल्याला त्यांचे दुर्गुण चिकटले हेच खरं गं बोके. ही माणसं येता जाता सेक्स एज्युकेशनवर परिसंवाद भरवतात आणि चोरून चोरून सेक्सचे उथळ आणि गलिच्छ सिनेमा पाहतात. त्यांच्यासारखे आपण नाही. आपण शहाणे आहोत ना? मग नैसर्गिक जीवन जगू.. हे बघ, त्या पोरींशी बरोबरीच्या नात्याने गप्पा मार, तुझे अनुभव सांग. त्यांचे ऐक. शहाणपणा नको शिकवू, मैत्रिणीसारखं वागव.’
‘खरंच रे दादा,’ दोघेही शांतपणे कूस बदलून झोपले.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

प्रबोधन पर्व – ‘वाहवा’ करणारे जाणकारच असतात काय?
‘‘दुसऱ्याच्या कामाविषयी आपली पसंती दर्शवण्यासाठी (काहींच्या मते महाराष्ट्रीयांना असे प्रसंग कमी आढळतात!) मराठीत खास शब्द रूढ आहेत. ‘वाहवा’ हा त्यातलाच एक. मूळ फारसी. मुख्य लक्षण असे की, ‘वाहवा’ समुदायात करावयाची. जाहीर रीतीने दुसऱ्यांना दाद देण्यासाठी ‘वाह वाह’ म्हणावयाचे आणि सोबत माफक पण दृश्य हावभाव. एखादी परंपरा खऱ्या अर्थाने व्यापक, समृद्ध वगैरे झाली हे कसे समजावे, तर परंपरा साकार करणाऱ्या सर्व घटकांचा तीत विचार झाला की. गाणे-बजावणे, नाटक, नृत्य वगैरे प्रयोगकलांचे मुख्य घटक तीन. प्रयोग सादर करणारा कलाकार हा पहिला घटक. जे सादर होत असते ती कृती हा दुसरा घटक. सादर केलेल्याचे जो ग्रहण करतो तो तिसरा घटक. भारतीय संगीत परंपरेत तिन्ही घटकांकडे तपशीलवार लक्ष दिले आहे. सादर केलेल्या कलेचे ग्रहण करणाऱ्याने आपली पसंती जाहीरपणे, तत्काळ आणि संमत मार्गाने व्यक्त करावी म्हणून ‘वाह वा(ह)ची प्रथा पडली.’’
संगीताचार्य अशोक दा. रानडे योग्य ठिकाणी कशी दाद द्यावी (संगीत संगती, ऑक्टोबर २०१४) याचा वस्तुपाठ ठरावा अशी पथ्ये सांगताना लिहितात – ‘‘‘वाहवा’ करणाराही जाणकार असावा लागतो. कलाकार काय काय करतो, त्याच्या प्रयत्नांची गुणवत्ता काय, गुणवत्तेची एकंदर पातळी काय इत्यादी बाबींचे ‘वाहवा’ करणाऱ्यास भान हवे. काही वेळा तर प्रत्यक्ष सादरीकरण फसले, तरीही प्रयत्नांची झेप मोठी असल्यास ‘वाहवा’ अधिक व्हायला पाहिजे! तशी जाणकारांकडून अपेक्षा असते. चांगला जाणकार जणुकाही मूक कलाकाराच असतो! कलाप्रकाराबरोबर तोही मनातल्या मनात गातो/ वाजवतो. या कारणाने कलाकाराच्या यत्नांची थोरवी त्याला पटू लागते. चांगला रसिक बनण्याचीही साधना करावी लागते.. एकाच वेळी वाहवा ही कलाकाराला मिळणारी पसंतीची पावती आणि श्रोत्याने द्यावयाची परीक्षा ठरू पाहते! आपली ‘वाहवा’ जाणकाराची ठरावी, अशी मनीषा बाळगणाऱ्याने तीन गोष्टी, त्याच क्रमाने कराव्या- खूप ऐकावे, प्रत्यक्ष शिकावे आणि त्याविषयी वाचावे.’’