लंडनच्या टेम्स नदीकाठी सिटी या भागात असलेला टॉवर ऑफ लंडन हा राजवाडा मध्ययुगीन इतिहासाचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार. १०७८ साली विल्यम द काँकररने बांधलेली ही वास्तू गेले सहस्रकभर जशी बांधली त्याच अवस्थेत महायुद्धे, यादवी युद्धे, वीज, वादळे यांना तोंड देऊन खंबीरपणे उभी आहे. सोळा एकर जागेपकी बारा एकरमध्ये बांधलेल्या या इमारतींपकी व्हाइट टॉवर ही प्रमुख इमारत आहे. चार मजली व्हाइट टॉवरची उंची आहे २७ मीटर. चिरेबंदी व्हाइट टॉवर बांधण्यासाठी वापरलेला दगड फ्रान्समधून आणला होता. या व्हाइट टॉवरशिवाय टॉवर ऑफ लंडन वास्तू समूहात महाल, सेंट जॉन चॅपेल, शस्त्रागरे, टांकसाळ, सनिकांच्या बरॅक, तबेले यांच्यासाठी इमारती बांधलेल्या आहेत. शाही निवासस्थान असलेल्या व्हाइट टॉवरचा वापर शाही खजिना, टांकसाळ, सरकारी नोंदसंग्रह, तुरुंग, यातना स्थळ, शिरच्छेदाची जागा म्हणून झाला. इ.स. ११०० ते १९५२ या काळात लंडनचा प्रमुख तुरुंग असलेल्या व्हाइट टॉवरमध्ये सध्याही शाही जडजवाहर ठेवण्याची सुरक्षित जागा आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना आणि राजकीय गुन्हेगारांना येथे आणले जाई. अशा कैद्यांना मृत्युदंड दोन प्रकारे दिला जाई. एकतर शिरच्छेद किंवा अंधार कोठडीत वर्षांनुवष्रे मरण येईपर्यंत खितपत पडून! फ्रेंच आक्रमक विल्यमने बांधलेल्या या किल्ल्याने जसा शेकडो गुन्हेगारांचा शिरच्छेद होताना पाहिले तसेच राजवटीचे विरोधक, साहित्यिक, राजकीय कैदी यांनाही राजद्रोहाच्या आरोपाखाली कठोर शिक्षांना सामोरे जाताना पाहिले. सर थॉमस मूर, सर वॉल्टर रॅली, राजा सहावा हेन्री, राणी अ‍ॅन बुलीन, राणी जेन ग्रे अशा शेकडो निरपराधांचे इथे शिक्षेच्या नावाखाली खून केले गेले. अशा शेकडो जिवांचे तळतळाट, शिव्याशाप ऐकलेल्या व्हाइट टॉवरच्या भिंतींना आणि परिसराला ‘पृथ्वीवरची सर्वात दु:खी जागा’ म्हटली जाते.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वनस्पतींचे संकलन आणि जतन
शैवाल ही अपुष्प वनस्पती गोडय़ा पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात आढळते. शैवालांच्या पेशीत रंगीत कण असतात. त्यांच्या रंगानुसार निळे, हिरवे, पिवळसर आणि लाल असे त्यांचे वर्गीकरण करता येते. तोच गुणधर्म वापरून अशा प्रकारची भेटकार्डे बनवता येतात.
त्यासाठी शैवालांचे संकलन करावे लागते. हे संकलन करताना भरती आणि ओहोटीची वेळ जाणून घेणे गरजेचे असते. कारण साधारणत: समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या खडकात ओहोटीच्या वेळी हिरव्या रंगाचे कारा, सपुष्प वनस्पतीच्या पानांच्या आकाराचे उल्वा, पिवळसर शैवालांमधील रिबीनीसारखे दिसणारे डिक्टीओटा तर लाल शैवालाच्या गटात मोडणारे ग्रासिलारिया इत्यादी रंगीत शैवाल मोठय़ा प्रमाणात आढळतात. शैवाल गोळा करण्याकरिता समुद्रात जाताना पायात बुट घालणे आवश्यक आहे. अन्यथा खडकावरील अणकुचीदार कालव्यांमुळे पाय कापू शकतो.
गोळा केलेले शैवाल एका मोठय़ा ट्रेमध्ये ठेवून स्वच्छ पाणी घेऊन त्यात काढावे. नंतर भेटकार्डाच्या आकाराचा व जाडीचा कागद त्या ट्रेमध्ये अशा प्रकारे ठेवावा की हे शैवाल अलगदपणे पाण्यावर तरंगेल. शैवालाची आपल्याला हवी तशी रचना करून त्याला कागदाच्या खाली आणि वर तलम वस्त्राने झाकावे. तलम वस्त्राच्या खाली आणि वर टीपकागद ठेवावा. कापडावर खालून आणि वर दाब देण्यासाठी दाब यंत्र ठेवावे. त्यात असलेले पाणी सुकल्यानंतर शैवाल पूर्ण कोरडे होते. शैवालामधील मुळातच असलेल्या चिकट द्रव्यामुळे ते शैवाल आपोआप कार्डपेपरवर चिकटले जाते. त्यासाठी फेव्हिकॉल किंवा गोंद वापरावा लागत नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरावे लागत नाही हे विशेष. जेव्हा या तलम कापडातील शैवालावर दाब यंत्राने दाब दिला जातो, तेव्हा त्याच्या पेशीतील रंगकण हे पेशीच्या बाहेर येतात व कार्डावर पसरतात त्यांचा मूळ रंग तसाच टिकून राहतो. जर शैवालाची योग्य रचना केली असेल तर किंवा निळ्या, हिरव्या, पिवळ्या, लाल शैवालाचे मिश्रण कागदावर पसरलेले असेल तर ती रचना ह्य़ा रंगांमुळे सुंदर आणि उठावदार दिसते. आणि शैवालचे जतन होते.

डॉ. राजेंद्र शिंदे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

gangster fired on police during chasing
मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
ram mandir ayodhya dham railway stion viral video
अरेरे! अयोध्या धाम रेल्वेस्थानकावरील ‘तो’ VIDEO पाहून संतापले युजर्स; म्हणाले, “थर्ड क्लास लोक…”