मानवनिर्मित तंतू – पॉलिएस्टर
पॉलिएस्टर तंतूचा शोध प्रथम १९४१ साली इंग्लंडमध्ये लागला. व्यापारी उत्पादन १९५५ साली सुरू झाले. टेरिलिन, टेरीन, डेक्रॉन या व्यावसायिक नावांचा वापर पॉलिएस्टरकरता केला जातो. पॉलिएस्टर तंतूंची निर्मिती दोन पद्धतीने केली जाते. पहिल्या पद्धतीत डायमिथाइल टेरिप्थॅलेट आणि मोनो इथिलिन ग्लायकॉल यांचा वापर केला जातो, तर दुसऱ्या पद्धतीत टेरिप्थॅलिक आम्ल आणि मोनो इथिलिन ग्लायकॉल हे घटक वापरतात. दुसरी पद्धत अधिक किफायतशीर, जलद आणि मजबूत तंतुनिर्मिती करते. त्यामुळे जास्त वापरली जाते.
पॉलिएस्टर निर्मिती करताना एस्टरीकरण आणि बहुवारिकीकरण असे दोन टप्पे पार पाडावे लागतात. वेगवेगळ्या नसíगक तंतूंत मिसळण्यासाठी वेगवेगळ्या तंतू लांबीचे पॉलिएस्टर तंतू निर्मिले जातात. तंतूच्या तलमतेबाबतही अशीच विविधता पॉलिएस्टरमध्ये ठेवतात. हा तंतू खूप चमकदार असतो. त्यामुळे त्याची चमक गरजेनुसार कमी केली जाते. नायलॉनसारखेच पॉलिएस्टरचे औष्णिक स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे आवश्यक त्या घडय़ा कायमस्वरूपी राहतात, म्हणून इस्त्री करणे सोपे जाते. तसेच या तंतूपासून तयार केलेल्या कपडय़ाला सुरकुत्या कमी पडतात. पॉलिएस्टरची पाणी शोषून घेण्याची क्षमता अगदी कमी असते. त्यामुळे ‘ाा तंतूंचे कपडे लगेच वाळतात. त्यामुळे हे कापड घाम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे कापसाबरोबर मिश्रण करून याचा वापर जास्त होतो. असे कापड टेरिकॉट या नावाने आपण ओळखतो. मिश्रणात ६७% पॉलिएस्टर आणि ३३% कापूस हे मिश्रण भारतात अधिक उपयुक्त ठरले आहे. दोन्ही तंतूंच्या आवश्यक गुणधर्माचा उपयोग करून ग्राहकाचा फायदा करणारे हे मिश्रण आहे.
पॉलिएस्टर तंतूवर बहुतांश आम्लांचा किंवा आम्लारीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे ब्लीचिंग प्रक्रिया सुलभपणे करता येते. पाणी शोषणाची शक्ती कमी असल्यामुळे रंगाई करताना अडचणी येतात. त्यामुळे नेहमीच्या रंगद्रव्याऐवजी वेगळी रंगद्रव्ये वापरावी लागतात. तसेच रंगाईची प्रक्रिया उच्च तापमानाला व उच्च दाबाखाली करावी लागते. गडद रंगात रंगवताना अडचणी येतात. हा तंतू फिनॉलमध्ये कमीअधिक प्रमाणात विरघळतो. त्यामुळे धुलाई करताना ही बाब ध्यानात ठेवायला हवी. पॉलिएस्टर कसर, बुरशी याला चांगला विरोध करतो.
दिलीप हेल्रेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
धर्म हे बाह्यसाधन नाही,  ती ‘पालना’ची बाब..
‘ ‘धर्म’ ह्याचा, प्रस्तुत संदर्भात, अर्थ थोडक्यात असा : माणसाने जसे वागणे योग्य असते तसे वागणे हा त्याचा धर्म. आता धर्म हा पुरुषार्थ आहे ह्य़ा म्हणण्यात असे अभिप्रेत आहे की माणसाने जसे वागावे तसे त्याने वागणे हे त्याच्या दृष्टीने इष्ट आहे. ते त्याच्या हिताचे असते. तसे वागणे हा त्याच्या कल्याणाचा घटक असतो आणि (किंवा) ते त्याच्या कल्याणाचे साधन असते. पण एवढेच नव्हे. जसे वागावे तसे वागणे, धर्माचे पालन करणे ही माणसाला स्वत:ला हवी असणारी गोष्ट आहे. माणसांनी जसे वागावे तशी ती अनेकदा वागत नाहीत, ती अनेकदा धर्माचे पालन करीत नाहीत ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि म्हणून माणसांवर धर्मपालनाची सक्तीही करावी लागते. असे असले तरी, धर्म हा पुरुषार्थ आहे असे म्हणण्यात धर्म ही स्वत:च इष्ट असलेली गोष्ट आहे, ते इष्ट वस्तू साधण्याचे केवळ बाह्य़ साधन नाही असेही अभिप्रेत आहे.’’
मेघश्याम पुंडलीक रेगे ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ (१९९४) या पुस्तकात धर्माच्या स्वरूपाविषयी लिहितात-
‘‘भारतीय परंपरेत धर्मासंबंधी, धर्माचा आशय काय आहे आणि धर्माचे ज्ञान कसे होते ह्यासंबंधी तीन भिन्न संकल्पना आढळतात. एक मीमांसाप्रणीत संकल्पना : वेदांमध्ये जी विधि-वाक्ये (किंवा निषेध-वाक्ये) आहेत-अमुक करावे (किंवा अमुक करू नये) असे सांगणारी जी वाक्ये आहेत-त्यांच्यापासून धर्माचे (आणि अधर्माचे) ज्ञान आपल्याला होते. कसे वागावे, कसे वागणे इष्ट असते हे वेदांत प्रकट झाले आहे. त्याप्रमाणे वागणे, आणि अनिष्ट म्हणून ज्याचा वेदांत निषेध करण्यात आला आहे त्याप्रमाणे न वागणे म्हणजे धर्म पाळणे.. तेव्हा वेदांतील विधि-वाक्यांपासून धर्माचे ज्ञान होते आणि विधि-वाक्यांचा आशय म्हणजे धर्म ही धर्माविषयीची फार संकुचित अशी कल्पना आहे असे प्रथमदर्शनी वाटते. परंतु ह्या कल्पनेमागे विश्वाविषयीचे आणि माणसाविषयीचे एक दर्शन आहे. हे दर्शन आपण ध्यानात घेतले नाही तर ह्या कल्पनेचा खरा आशय आपल्याला समजणार नाही.’’

Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  
stock markets rise for 3rd session sensex rises 190 points nifty settles at 22096
सलग तिसऱ्या सत्रात वाढ; ‘सेन्सेक्स’ची १९० अंशांची कमाई

मनमोराचा पिसारा
ऑपरेशन डे ब्रेक
‘युद्धस्य कथा रम्या:’ असं मनापासून वाटायचं तेव्हा कधी तरी हा चित्रपट पाहिला. पाहता पाहता, त्यात युद्धातला ‘रम्यपणा’ नाहीसा कधी झाला कळलंच नाही.
चित्रपटातला शेवट पाहताना, आवंढा गिळताना, डोळे मिटले आणि उघडले तेव्हा ‘युद्ध’ नावाच्या भयावह वास्तवाची जाणीव झाली आणि अंग शहारलं. नंतर कधी तरी थॉमस मॅननं लिहिलेलं वाक्य वाचनात आलं- ‘इथे ‘डी’ इज फॉर डेथ अ‍ॅण्ड जी इज फॉर ग्रेव्ह!’ (चूकभूल द्यावी घ्यावी).
कहाणी दोन झेक तरुणांची, प्रत्यक्ष घटनेवर आधारित. मूळ नाव ‘ऑपरेशन अंथ्रापॉइड’. राइनहार्ड हेन्रिश या नाझी एस एस अधिकाऱ्याला बोहेमिआ आणि मोराविआ प्रदेशांचं प्रमुख केल्यानंतरचा १९४२ चा काळ.
हेन्रिश ज्यूंचा कर्दनकाळ. त्याची हत्या करण्याखेरीज गत्यंतर नाही हे ठरविल्यानंतर यॅन क्युबिस (झेक) आणि जोजफ्गॅबिक (स्लोव्हाक) या छत्रीधारी झेक सरजटना दोस्त राष्ट्रांकडून प्रशिक्षण मिळतं. त्यानंतर ते ‘प्राग’मध्ये उतरतात. हेन्रिशच्या नियमित मार्गावरील एका कठीण वळणावर त्याची मर्सीडीझ वेग मंदावते. तिथेच स्टेनगनने त्याच्यावर हल्ला करून हत्या करायची, तिथून पळण्याचा मार्गही निश्चित केलेला असतो. परंतु, आयत्या वेळी स्टेनगर अटकते, बेत फसतो आणि मग पळापळ सुरू होते.
चित्रपटाची कथा यापुढे मांडत नाही, पण शेवट सांगितल्याशिवाय राहवत नाही.
प्रत्येक प्रसंगामधला तणाव, टिमथी बॉटम्स, अँथनी अँड्रय़ूज आणि मार्टिन शॉ यांच्या भावमुद्रा विलक्षण संवेदनशीलतेनं टिपल्या आहेत.
चित्रपट प्रागमध्ये चित्रित केलेला आहे. अँटन डिफ्रिंग या अभिनेत्यानं जर्मन ऑफिसर म्हणून अनेकदा काम केलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरले स्थिर भाव, उर्मट आत्मविश्वास आणि जणू काही घडलेलेच नाही असा आविर्भाव अधिक भेदक वाटतो. इथे क्रौर्य हिंसकपणे मांडलेलं नाहीये तर त्याचं वावरणं अतिशय नॉर्मल वाटतं. हीच गोष्ट मनाला छेडते, छळते.
चित्रपटाच्या अखेरीस तळघरात सापडलेल्या या तरुण सरजटना मारण्याचे अनेक मार्ग जर्मन सैनिक वापरतात. अखेरीस, तळघरात पाण्याचा प्रवाह सोडला जातो.
क्षणोक्षणी पाण्याची पातळी वाढत जाते. आता मरण केवळ अटळ असल्याच्या जाणिवेनं ती दोघं थरारतात. एका क्षणी पत्त्यांचा डावही मांडतात. पाणी गळय़ापाशी पोहोचल्यानंतर शत्रूपुढे शरणागती पत्करण्यापेक्षा एकमेकांनाच  गोळी घालून संपविण्याचा निर्णय नि:शब्दपणे घेतात. की चेहऱ्यावर अतिसूक्ष्म स्मितरेषा चमकते. दोघे गळाभेट घेतात आणि कॅमेरा तिथून सटकतो.
पिस्तुलाचा एकच आवाज आणि सारं संपल्याची जीवघेणी जाणीव करणारी शांतता पसरते. कॅमेरा पुन्हा तळघरात जातो, तेव्हा पाण्यावर तरंगणारे पत्ते फक्त दिसतात आणि चित्रपट संपतो.
मृत्यूचं तांडव, हॅण्ड ग्रेनेड, बंदुकांचे आवाज यांनी युद्धातली भीषणता जाणवते. इथे मात्र फक्त एकच आवाज आणि न दिसलेला मृत्यू!
आजही मन अस्वस्थ होतं आणि महाभारतामधल्या शोकमग्न पांडव-कौरवांची आठवण येते. सोडवायचे कसे हे प्रश्न? सुटका कशी करून घ्यायची माणसानं माणसावर लादलेल्या अत्याचाराची?
मनमोराचा पिसारा फुलायला फक्त ‘फील गुड’ नाही पुरेसं! विचारमग्नतेतूनच उगवतो एखादा आशेचा किरण..
डोण्ट मिस ‘ऑपरेशन डे ब्रेक’
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com