मध्य इस्रायलमध्ये ६००० वर्षांपूर्वी वसलेले जेरुसलेम हे इस्रायलमधील सर्वाधिक लोकवस्तीचे शहर. जगातील प्राचीन शहरांपकी एक असलेले जेरुसलेम. ज्युडाइझम, ख्रिश्चानिटी आणि इस्लाम या तिन्ही धर्मानी जेरुसलेम हे आपले पवित्र शहर मानले आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही धर्म एकेश्वरवादी आहेत. असंख्य वेळा उत्कर्ष आणि उद्ध्वस्त झालेल्या या शहरावर ५२ वेळा परकीयांची आक्रमणे आणि ४४ वेळा सत्तांतरे झाली. इ.स.पूर्व सुमारे चार हजार वर्षांपूर्वी गिआन झऱ्याच्या परिसरात, टेकडय़ांवर वसलेल्या जेरुसलेमची वस्ती ‘रुसलीमम’ किंवा ‘उरुसलीम’ या नावाने ओळखली जाई. इजिप्तच्या प्रबळ साम्राज्याच्या शेजारीच असलेले जेरुसलेम पुढे त्या साम्राज्याचा भाग बनले. या काळात पश्चिम किनारपट्टीकडचे फिलिस्ताईन या दर्यावर्दी टोळ्यांचे लोक अधूनमधून जेरुसलेमच्या वसतीवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करीत. इजिप्तचे नियंत्रण सल झाल्यावर ज्यूंचा राजा डेव्हिड याने या प्रदेशात आपले इस्रायलचे राज्य स्थापन करून जेरुसलेम येथे राजधानी केली. राजा डेव्हिडची कारकीर्द इ.स.पूर्व १०१० ते इ.स.पूर्व ९७० अशी झाली. ज्यूंचे राज्य स्थापन करणारा डेव्हिड याचे नाव ज्यू समाजात आदराने घेतले जाते. पुढे इ.स.पूर्व ९३१ मध्ये या राज्याचे दोन भाग झाले. उत्तरेकडचा इस्रायल आणि दक्षिणेकडचा जेरुसलेमच्या परिसरातला ज्यूडाह. इ.स.पूर्व ५३७ ते ३३२ या काळात जेरुसलेमवर पíशयन राजांची सत्ता होती, तर इ.स.पूर्व ३३२ ते इ. स. पूर्व ६३ या काळात इथे अलेक्झांडर आणि नंतर इजिप्तच्या राजाचा अंमल राहिला. त्या पुढची ४०० वष्रे म्हणजे इ.स. ३२४ पर्यंत जेरुसलेम रोमन साम्राज्याचा भाग बनून राहिले. पुढची ३००वष्रे हे शहर बायझंटाईन साम्राज्यात होते तर त्या पुढची ४५० वष्रे इ.स. ११०० पर्यंत खलिफांची सत्ता या शहरावर राहिली. पुढची ४०० वष्रे इथे क्रुसेड्सचे नेतृत्व करणारा गॉडफ्रे डी बुलॉन, कुर्दीश सुलतान सलादीन आणि इजिप्तचे मामलुक सुलतान यांचा अंमल राहिला. तुर्की ओटोमान सुलतानांनी इ.स. १५१७ ते १९१७ अशी ४०० वष्रे जेरुसलेमवर शासन केले.

सुनीत पोतनीस

worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
supreme court orders cbi probe into mysterious death of manipuri woman in 2013
२०१३ च्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?

sunitpotnis@rediffmail.com

 

 

दसऱ्याचे सोने – आपटा

कांचनप्रमाणे आपटाही फॅबेसी कुलामधील ‘बॉहिनिया’ प्रजातीतले झाड आहे. आपटय़ाचे शास्त्रीय नाव ‘बॉहिनिया रॅसिमोसा’ दुभंगलेल्या पानांमुळे बॉहिनिया, तर फुलांचे तुरे मंजिऱ्यांप्रमाणे फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारे दिसतात म्हणून रेसिमोसा हे नाव दिले आहे. आपटय़ाची मुळे जमिनीत खोलवर खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठय़ा होऊन खडक दुभंगतात. म्हणून आपटय़ाचे संस्कृत नाव आहे ‘अश्मन्तक’. आपटा खडकाळ, मुरमाड जमिनीतही वाढू शकतो. हा वृक्ष भारत, श्रीलंका, चीनमध्ये आढळतो. भरपूर लोंबत्या फांद्या घेऊन वेडावाकडा वाढणारा आपटय़ाचा वृक्ष २ ते ५ मीटर उंच वाढतो. साल काळसर-तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. त्यामुळे झाड खूप जुने वाटते.

आपटय़ाची पाने कांचनसारखी जोडपत्र, पण कांचनपेक्षा कडक, गोलसर असून वरच्या बाजूला काळपट हिरवी तर खालच्या बाजूने फिक्कट असतात. पानाच्या तळापासून निघालेल्या ७ ते ९ शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.

आपटय़ाचा बहर मार्च-एप्रिलमध्ये असतो. बहरकालात लवयुक्त हिरव्या लांबट पोपटाच्या चोचीप्रमाणे बाकदार कळ्यांचे तुरे डहाळ्यांवर, पानाच्या बेचक्यांतून दिसायला लागतात. मग तुऱ्यातल्या कळ्या पाळीपाळीने फुलायला लागतात. कळी असताना घट्ट मिटलेले निदलपुंज दुभागते नि जणू कळीला उमलायला जागा करून देते, बाहेरच्या दिशेने चक्क गुंडाळले जाते. जेमतेम दीड सेंमी लांबीची पिवळसर-पांढरी फुले आपापले केसाळ दहा पुंकेसर आणि स्त्रीकेसर सावरू लागतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपटय़ा, वाकडय़ा, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात. प्रत्येक शेंगेत १२ ते २० काळ्या, चपटय़ा लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजतात.

आपटय़ाचे लाकूड मजबूत, टिकाऊ असते. त्यात उष्मांक जास्त असल्याने इंधन म्हणूनही ते वापरले जाते. आपटय़ाच्या तंतुमय सालीपासून मजबूत धागे, टॅनीन व िडक मिळवितात. पानांचा उपयोग विडय़ा तयार करण्यासाठीही करतात. म्हणूनच यास इंग्रजीमध्ये ‘बिडी लिफ’ असे नाव आहे. हगवण, जुलाब यांसारख्या रोगांवर आपटय़ाच्या सालीचा रस गुणकारी आहे.

दसऱ्याच्या दिवशी आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटतात. या वेळी या बहुगुणी झाडाची होणारी बेसुमार कत्तल आपण रोखायलाच हवी.

चारुशीला जुईकर (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org