जेरुसलेम हे इस्रायलमधील सर्वाधिक मोठे आणि नव्या जुन्याचा मिलाफ असलेले शहर आहे. ज्यूंच्या श्रद्धेप्रमाणे अब्राहम या व्यक्तीला देवाने इ.स. पूर्व १७३८ मध्ये इस्रायलच्या प्रदेशात आपला दूत म्हणून पाठविले. त्यामुळे अब्राहमला सर्व ज्यू आपला पितामह समजतात. अब्राहम या प्रदेशात प्रथम आला तेव्हा जेरुसलेममध्ये स्थायिक झाला. ज्यूंच्या प्रार्थना मंदिरात म्हणजे सिनेगॉगमध्ये जगभरातला कोणताही ज्यू, जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना म्हणतो. प्राचीन काळापासून, साधारणत: इ.स.पूर्व सातव्या शतकात जेरुसलेम शहराभोवती प्रथम तटबंदी बांधली गेली. भूकंप आणि आक्रमकांचे हल्ले यामुळे या िभतीची पुढच्या काळात बरीच पडझड झाल्यामुळे १५३७ साली तत्कालीन ओटोमन सम्राट सुलतान सुलेमान प्रथमने ही िभत पाडून नव्याने बांधायचा आदेश दिला. १५३७ ते १५४१ या पाच वर्षांत बांधली गेलेली ही तटबंदी चार किलोमीटर्स लांबीची, बारा मीटर उंचीची आणि अडीच मीट रुंदीची होती. या िभतीत ३४ ठिकाणी निरीक्षक मनोरे आणि आठ प्रवेशद्वारे होती. या आठ प्रवेशद्वार किंवा वेशींपकी न्यू गेट हे द्वार ख्रिश्चन लोकांनी वापरण्यासाठी १८७७ साली बांधले गेले. बाकीची सात द्वारे सुलतान सुलेमानने सोळाव्या शतकात बांधली.

या आठ प्रवेशद्वारांपकी पूर्वेकडचे गोल्डन गेट तुर्कानी दगडाचे बांधकाम करून कायमसाठी बंद करून ठेवले. ज्यूंची अशी श्रद्धा आहे की, या युगाच्या अखेरीस त्यांचा देव येहोवा, त्यांचा अखेरचा प्रेषित पृथ्वीवर जेरुसलेममध्ये पाठविणार आहे. हा प्रेषित किंवा मसीहा या गोल्डन गेटमधून शहरात येईल, त्या वेळी ज्यूंच्या दफनभूमीतील सर्व मृत ज्यू भाविक शरीरासह जिवंत होतील आणि तेही या मसीहाबरोबर जेरुसलेममध्ये प्रवेश करतील. तत्कालीन तुर्की राज्यकर्त्यांनी या मसीहाने शहरात प्रवेश करण्याचे गोल्डन गेट भीतीने बंदच करून टाकले!

8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
bjp latest news, bjp vidarbh marathi news
विदर्भातील पाच जागांवर भाजपपुढे थेट लढतीचे आव्हान
Meet First Woman Bula Choudhary To Swim Across All Seven Seas and etched her name in history
सात समुद्र पार करणारी ‘दर्याची राणी’; कोण आहे बुला चौधरी? जाणून घ्या…
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?

सध्या उघडय़ा असलेल्या सात द्वारांपकी ज्यू व अम्रेनियन लोकांसाठी झियॉन गेट, वेिलग वॉलकडे जाणारे डंग गेट, दमास्कस गेट, सेंट स्टीफन गेट, हेरॉड गेट, लायन गेट आणि न्यू गेट वापरात आहेत. १९८१ साली युनेस्कोने जेरुसलेमची ही िभत आणि प्रवेशद्वारे जागतिक वास्तु-वारसा म्हणून नोंदवली आहेत.

सुनीत पोतनीस

 

sunitpotnis@rediffmail.com

 

लाकडावर नैसर्गिक नक्षी

बरेच वेळा लाकडी फर्निचरवर आपण नसर्गिक नक्षी बघतो. ही नक्षी म्हणजे ज्या वृक्षापासून ते लाकूड मिळवलेले असते, त्या वृक्षाच्या वार्षिक वाढीचा आलेख असतो. ही नक्षी कशी तयार होते हे बघायचे असल्यास वृक्षाचा करवतीने कापलेला बुंधा बघावा,

त्यावर गडद आणि फिक्या रंगाची वर्तुळे दिसतात. त्या सर्व वर्तुळाचा मध्यिबदू एकच असतो. बुंधा वेगवेगळ्या कोनांतून कापल्यास फर्निचरवर दिसणारी नक्षी दिसून येईल.  वृक्ष उंच वाढत असताना त्याची रुंदीही वाढत असते. ही  रुंदी किंवा व्यास अनुकूल ऋतूत जास्त वेगाने आणि कोरडय़ा ऋतूत कमी वेगाने वाढते. त्यामुळे वर्षभरात जास्त वेगाने वाढलेल्या भागात फिकट आणि कमी वेगाने वाढलेल्या भागात गडद रंगाची वर्तुळे दिसतात. परिणामी एका वर्षांत फिकट-गडद रंगाचे एक चक्र तयार होते. सर्वात बाहेरचे चक्र सर्वात अलीकडच्या – चालू – वर्षांचे असते. म्हणजेच बाहेरून आत चक्रे मोजत गेले तर प्रत्येक चक्र कोणत्या वर्षी तयार झाले हे कळते. त्याचप्रमाणे चक्राच्या फिकट-गडद रंगाप्रमाणे त्या-त्या वर्षांत त्या वृक्षाने अनुभवलेल्या हवामानाचा – विशेषत: दुष्काळी वर्षांचा – इतिहास कळू शकतो. वणव्यात तावून-सुलाखून टिकलेल्या वृक्षांच्या चक्रांवरून त्या वनांतील वणव्यांची वष्रेही ठरवता येतात. इतकेच काय, चक्राची एकच बाजू आक्रसलेली असल्यास वनांतील आग कोणत्या दिशेने पुढे सरकली हेही समजण्यास मदत होते.

वायू प्रदूषणाचा वृक्षवाढीवर परिणाम होतो तेव्हा तो चक्राच्या वाढीवरही होतच असतो. आगीप्रमाणेच त्या वनांतील वृक्षांनी सहन केलेल्या वायू प्रदूषणाची दिशा आणि इतिहास याबद्दल अंदाज बांधता येतात.

अंदाजाचे खात्रीत रूपांतर करण्यासाठी एका वृक्षाऐवजी त्याच वनांतील अनेक वृक्षांचा अभ्यास करणे जरुरीचे असते. पण त्यासाठी अनेक वृक्ष बुंध्याजवळ कापणे शहाणपणाचे नाही. अमेरिकेतील कोलोराडो स्टेट विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बिनखर्चाची पद्धत शोधली आहे. एक सेंटिमीटर व्यासाची, पोलादी, धारदार कड असलेली नळी वृक्षाच्या बुंध्यात, परिघापासून सरळ केंद्राकडे, बुचात स्क्रू पिळतात त्याप्रमाणे घुसवतात. फिरवून-हलवून नळी अलगद बाहेर काढली की बुंध्याचा नळीतला तुकडा बाहेर काढता येतो. वाळू-कागदाच्या साहाय्याने स्वच्छ केल्यावर तो गजासारखा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावर फिकट-गडद रेषा स्पष्ट दिसतात, मोजता येतात, त्यांचे निर्मितीचे वर्ष ठरवता येते. वृक्षाचा, पर्यायाने वनाच्या पर्यावरणाचा इतिहास समजतो.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org